साहित्यः
२२५ ग्रा. ताजे पनीर, किसलेले
१ कंडेन्स्ड मिल्क टिन ( मी ३/४ वापरला, आपल्या चवीप्रमाणे प्रमाण कमी-जास्तं करावे)
२ टेस्पून रोज सिरप (रंग आणि चवीसाठी)
१/२ टीस्पून पिस्तापूड
१/२ टीस्पून वेलचीपूड
पिस्त्याचे काप सजावटीसाठी
पाकृ:
नॉन-स्टीक पॅनमध्ये पनीर व कंडेन्स्ड मिल्क एकत्र करावे.
मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत रहावे.
१५-२० मिनिटांनी मिश्रण थोडे दाट होईल, तेव्हा त्यात रोझ सिरप मिक्स करावे.

सतत ढवळत रहा.
मिश्रणाला घट्टपणा येईल आणि मिश्रण कडेने सुटू लागेल, छान रवाळ दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करावा.
मिश्रण अति कोरडे करु नये, पनीर चिवट होईल नाहीतर, त्यात थोडा ओलसरपणा हवा.
त्यात पिस्तापूड व वेलचीपूड घालून मिक्स करणे.

तुपाने ग्रीझ केलेल्या थाळीत मिश्रण ओतावे व चमच्याने छान पसरवून घ्यावे.
त्यावर पिस्त्याचे काप लावून हलके दाबावे.
थोडे गार झाल्यावर सुरी फिरवून चौकोनी आकारात कापावे पण कलाकंद लगेच उचलू नका, सेट होऊ द्या.
पूर्ण गार होऊ द्या.

हा रोझ कलाकंद खाण्यासाठी तयार आहे.
फ्रिजमध्ये ठेवल्यास ३-४ दिवस चांगला राहतो.
आवडत असल्यास ह्याला मोदकांचा आकार ही देता येईल.
पाककृतीत कंडेन्स्ड मिल्कचा गोडवा पुरेसा आहे.
गणपती बाप्पा मोरया !!
__/\__
शेवटचा फोटू फार आवडला.
शेवटचा फोटू फार आवडला. कलाकंदाला रंग छान आलाय.
कहर फोटो आहे. कलाकंद...
कहर फोटो आहे. कलाकंद... स्लर्प....
आहाहा काय सुरेख रंग आलाय
आहाहा काय सुरेख रंग आलाय.मस्तच...
देव सानिकेच्या पाकृ खरंच खात
देव सानिकेच्या पाकृ खरंच खात असावा! काय देखणी पाकृ आणि सोपी पण.
देव सानिकेच्या पाकृ खरंच खात
.....अगदी, अगदी.
काय सुरेख रंग आलाय. मस्तं सुटसुटीत पाककृती.
जबरी, अॅंड दि अवाॅर्ड गोज टु
जबरी, अॅंड दि अवाॅर्ड गोज टु ........... सानिका !!!!!!
आईग्गं !!! एवढा सुंदर! !!
आईग्गं !!! एवढा सुंदर! !!
खूप्प आवडला :)
नेहमी प्रमाणे मस्तच!!
नेहमी प्रमाणे मस्तच!!
मस्तच
मस्तच
झक्कासच!
झक्कासच!
खल्लास !!
खल्लास !!
वारलो!!
वारलो!!
लुभावना रंग
तोंडाला पाणी सुटलंय, प्रतिसाद टंकणं कठीण जातंय..
जबरदस्त!!
जबरदस्त!!
मस्तच
खूप आवडली पाककृती.
आहाहाहा
चवदार असणार ह्यात शंकाच नाही.
व्वा..
सुरेख दिसतो आहे कलाकंद!
स्वाती
जबराटच... भारी. सुंदर दिसतोय
जबराटच... भारी. सुंदर दिसतोय कलाकंद. __/\__
मला नाव वाचतानाच माहित असतं
मला नाव वाचतानाच माहित असतं की हा पदार्थ कधी करणार नाही. पंण तुमचं सादरीकरण आणि खास करुन फोटो आवडतात म्ह्णून धागा उघड॑ते आणि कधीच निराशा होत नाही. नेहमी प्रमाणेच सुंदर .
मस्तच
मस्तच
नेहमीचेच समजुन घे.
नेहमीचेच समजुन घे.
सानिकाताय दुत्त दुत्त !
सानिकाताय दुत्त दुत्त !
कलाकंद पनीरचा असतो?
कलाकंद पनीरचा असतो? अरारारारारा...
होय कलाकंद पनीरचाच असतो :)
होय कलाकंद पनीरचाच असतो :)
कलाकंदात साखर नाही? रोझ सिरप
कलाकंदात साखर नाही? रोझ सिरप गोड असतो का?
अतीव सुंदर!
स्वॅप्सः
पाककृतीत कंडेन्स्ड मिल्कचा गोडवा पुरेसा आहे.साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्क
साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्क वापरले आहे, ते ही गोडचं असतं :)
(भारतात मिठाई-मेट किंवा मिल्कमेड मिळतं ते वापरु शकता)
रोझ सिरप ही गोड असतं पण वरील पाककृतीत कंडेन्स्ड मिल्कचा वापर गोडव्यासाठी केलेला आहे.
अच्छा. ते कंडेन्स्ड मिल्क काय
अच्छा. ते कंडेन्स्ड मिल्क काय असतं हे माहीत नव्हतं. धन्यवाद.
फारच सुंदर!!!
.
जगात भारी.
जगात भारी.
मी अजयशी सहमत आहे.सुर्रेख्च.
मी अजयशी सहमत आहे.सुर्रेख्च.
निव्वळ म्हणजे निव्वळ चवदार
निव्वळ म्हणजे निव्वळ चवदार प्रकरण.
माझं लाळेरं कुठं गेलं??
लवकर शोधायला पाहिजे..
काय त्रास आहे या बाईंचा. फोटू
काय त्रास आहे या बाईंचा. फोटू बघुन खूप त्रास होतो हो. एकदा म्मिपा कट्टा करुन सगळ्यांनी असे पदार्थ खायला घाला मग द्या काय पाकृ द्यायच्या त्या
आहाहा... :)
आहाहा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॉय फ्रेंड... गर्ल फ्रेंड... Na Na Na Na... :- J Star
अप्रतिम
जबरदस्त रंग उतरलाय..
सध्या तरी फक्त रंगाबद्दलच बोलू शकतो.. आय्य्याया.. :*(
पाकृ सुरेखच आहे
पण कलर खत्रा आलाय.
क्लास!!
क्लास!!
क्लास....
भारी आहे रेसिपी. पण 2टे. स्पून रोझ सिरप खूप जास्त आहे का? मी मँप्रोचं घेतलंय.
धन्यवाद चांगली पा.कृ. वर आणलीत.
नाही, रंग कसा हवा त्यावर अवलंबुन आहे, फ्लेवर साठी नाही. खरपुस कॅरमल चव कलाकंदची खासियत आहे.