विखुरलेलं चांदणं
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं,
ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण
हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं,
मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं.
हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं,
त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं.
हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं,
मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं.
हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं,
तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं?
(नाव सुचलंच नाही कवितेला.)
💬 प्रतिसाद
(20)
व
वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 10:37
नवीन
पहिल्याच कडव्यात यमकाचा घोळ झालाय. बाकी काव्यातले भाव उत्तम.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 09/24/2015 - 10:45
नवीन
अगदी हेच वाटले मलाही!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 09/24/2015 - 11:11
नवीन
असे चालेल का ?
..कविता मस्त.
'विखुरलेलं चांदणं' हे नाव चालेल का ?
- Log in or register to post comments
र
रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 14:41
नवीन
अर्रर घोळ घातला का मी!
ताई शीर्षक आणि बदल दोन्ही आवडले
हळवा + समुद्र + उधाण हे कोम्बिनेश्न्च जबरा आहे!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 09/24/2015 - 10:53
नवीन
उधाणलेल्या समुद्राला आता हळू हळू भान येणं असं केलं तर? बाकी १ नं.
- Log in or register to post comments
र
रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 14:46
नवीन
धन्यवाद! हाही बदल छानच आहे!
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 09/26/2015 - 10:56
नवीन
माझ्यामते असेच हवे होते. यमकही जुळेल आणि चेतनगुणोक्ती अलंकारामुळे काव्यात्मकता आणखी वाढेल.
क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराची मात्रा लुप्त दाखवायचा असल्यास तिथे अनुस्वार देतात. उदा. येणे/येणं. ह्याला अपवाद म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्ता स्त्रीलिंगी असेल तर शेवटची मात्रा लुप्त होत नाही. उदा.ती आंबा खाते. इथे 'खाते' चं 'खातं' होत नाही. हा नियम काही विशेषणांनाही लागू पडतो. उदा. कसेबसे/कसंबसं.
ह्यामुळेच येणं आणि उधाण हे यमकात बसत नाही. त्याऐवजी उधाणणं असे क्रियापद वापरले तरी चालू शकेल.
- Log in or register to post comments
न
निनाव
गुरुवार, 09/24/2015 - 16:55
नवीन
Kavita khoop aavadli. Chhaanach vtakta jhaale aahe.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 09/24/2015 - 17:22
नवीन
कविता आवडली
- Log in or register to post comments
र
रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 19:52
नवीन
धन्यवाद!
मला बदल करून देतील का कुणी सासं
पहिल्या कडव्याची दूसरी ओळ
ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण
अशी करायची आहे आणि शिर्षक विखुरलेल चांदण द्यायच आहे.
स्नेहाताई खूप खूप आभार इतके छान बदल सुचवल्याबद्दल!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 20:40
नवीन
डन
- Log in or register to post comments
र
रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 20:36
नवीन
अरे वा! कुणी बदललं? मनापासून धन्यवाद सा सं !
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 21:45
नवीन
सा सं ना पावर नाय म्हनतेत. हे काम त्याच संपादिकेचं दिसतंय ज्यांनी चांदणं बिखरवलं आहे.
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 09/24/2015 - 21:51
नवीन
एक मजला सोडून वरती बघा की!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 09/24/2015 - 22:36
नवीन
मायला. आय माय स्वारी बरका.
कोण सं, कोण सा सं, कोण स्व सं आणि कोण काय करतंय काही कळत नाही राव.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 09/24/2015 - 20:46
नवीन
सुरेख रचना
- Log in or register to post comments
म
मनीषा
Tue, 10/06/2015 - 10:57
नवीन
सुंदर !
- Log in or register to post comments
म
माहीराज
Fri, 10/09/2015 - 14:31
नवीन
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं,
तुझ्या स्वप्नातलं माझं ते तुझ्यात हरवुन जाणं..
हे कसं वाटतंय. .
- Log in or register to post comments
र
रातराणी
Fri, 10/09/2015 - 22:16
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 10/09/2015 - 22:19
नवीन
वा! छान कविता.
- Log in or register to post comments