एक गोष्ट........
एक गोष्ट तुझी
एक गोष्ट माझी
आहे एक गोष्ट
तुझ्यामाझ्या गोष्टीची
एक प्रीत तुझी
एक प्रीत माझी
जुळली एक प्रीत
तुझ्यामाझ्या मनीची
एक आभाळ तुझे
एक आभाळ माझे
भेटले एक आभाळ
तुझ्यामाझ्या प्रेमाचे
एक रात्र तुझी
एक रात्र माझी
सजली एक रात्र
तुझ्यामाझ्या स्वप्नांची
एक चंद्र तुझा
एक चंद्र माझा
साक्षी एक चंद्र
तुझ्यामाझ्या मीलनाचा
एक साथ तुझी
एक साथ माझी
सुटली एक साथ
तुझ्यामाझ्या सोबतीची
एक कारण तुझे
एक कारण माझे
छोटेसे एक कारण
तुझ्यामाझ्या दुराव्याचे
एक हट्ट तुझा
एक हट्ट माझा
जिंकला एक हट्ट
तुझ्यामाझ्या अबोल्याचा
एक सांज तुझी
एक सांज माझी
उगवली एक सांज
तुझ्यामाझ्या निरोपाची
एक वाट तुझी
एक वाट माझी
हरवली एक वाट
तुझ्यामाझ्या परतीची
एक पाऊस तुझा
एक पाऊस माझा
उरला एक पाउस.......
तुझ्यामाझ्या आठवणींचा
एक गोष्ट तुझी
एक गोष्ट माझी
अधुरी एक कहाणी
तुझ्यामाझ्या गोष्टीची
💬 प्रतिसाद
(7)
र
रातराणी
गुरुवार, 09/24/2015 - 20:18
नवीन
!!
पूर्ण कविता ग्राफिटी सारखी आहे. _/\_
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 09/25/2015 - 11:16
नवीन
गोष्टीची सुरुवात ते शेवट..
छान कल्पना आणि कविता.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 09/25/2015 - 11:51
नवीन
आवडली..
सुरेख. अ फुल सर्कल ऑफ लव्ह. वेल... अ स्क्यूड वन.
- Log in or register to post comments
न
निनाव
Fri, 09/25/2015 - 13:29
नवीन
अगदी बरोबर.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Fri, 09/25/2015 - 14:14
नवीन
गोष्ट आवडली!
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 09/25/2015 - 15:58
नवीन
छान कविता
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Fri, 09/25/2015 - 19:01
नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
- Log in or register to post comments