Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ll गंगास्मरण ll

श — शिव कन्या, Fri, 09/25/2015 - 21:41
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अंतर पुण्यसलिला, मुक्ता माता ये वेगे, जा घेऊन मजला तव तीर्थाचा एक दिलासा, जीवास थकल्या तोच विसावा तू कावेरी, तूच नर्मदा........................ 1 "Ganga Aarti at Varanasi ghats" by http://www.flickr.com/photos/u-suke/ - http://www.flickr.com/photos/u-suke/3156784664/. Licensed under CC BY 2.0 via Commons - https://commons.wikimedia.org/wiki/File:Ganga_Aarti_at_Varanasi_ghats.jpg#/media/File:Ganga_Aarti_at_Varanasi_ghats.jpg (छायाचित्र विकि वरून साभार)

प्रतिक्रिया द्या
12420 वाचन

💬 प्रतिसाद (38)
श
शिव कन्या Fri, 09/25/2015 - 21:51 नवीन
संपा मंडळास विनंती..... जमल्यास या गंगेला साजेसा फोटो लावावा. माझ्याकडे स्वतःच्या संग्रहातील आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे जमत नाहीये.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 09/26/2015 - 02:30 नवीन
व्यनि पाठवला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 06:17 नवीन
पाहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
श
शिव कन्या Fri, 10/02/2015 - 13:26 नवीन
संपादक मंडळाचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
ब
बहुगुणी Sat, 09/26/2015 - 02:29 नवीन
प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अंतर यातला ताल सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 09/26/2015 - 04:05 नवीन
सुंदर, अप्रतिम!!! लय तर झक्कासच आहे!!! बाकी कविता गंगाजलाइतकीच पवित्र!!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 09/26/2015 - 04:17 नवीन
वा! खूपच आवडली! सकाळी सकाळी छान वाचायला दिलत त्याबद्दल धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 09/26/2015 - 07:48 नवीन
फारच छान लिहिलंत! नदी ह्या विषयावर एकच गाणं स्मरणात लख्ख राहिलं आहे, ते म्हणजे 'संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदु:खांची जाणीव तिजला नाही!' नदीला एकीकडे 'माता' म्हणायचं, आणि तिच्यातच सर्व प्रदूषण लोटून द्यायचं असा तर आपला दांभिकपणा!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 12:46 नवीन
आपला दांभिकपणा हा काय वर्णावा! घाण त्यातच करतो, ज्याची पूजा करतो. घाणच करायची तर किमान माता, देवी म्हणू नये. पूजा करू नये. पण तसे होत नाही. बरे, कुठल्या निसर्गाच्या घटकाकडे निव्वळ शास्त्र शुद्ध नजरेने पहावे, त्या नुसार प्रदूषण टाळावे, हे हि आपणास जमत नाही. पलायनवादी लेखन म्हणजे ही कविता, हे मी या कवितेपुरते तरी मान्य करते. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रचेतस Sat, 09/26/2015 - 08:04 नवीन
अतिशय सुंदर इमं में गंगे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमै सचता परूष्ण्या। असिवक्न्या मरूद्वृधे वितस्तयार्जीकीये श्रणुह्या सुषोमया
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 12:48 नवीन
:-) अहंम संस्कृतम नैव जानामि! वरील श्लोक मराठीत केला तर वाचायला आवडेल. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 09/26/2015 - 13:35 नवीन
ऋग्वेदातल्या १० व्या मंडलात असलेले हे सरितास्तोत्र आहे. गंगे, यमुने, सरस्वती, शतुद्रि, परुष्णी, मरुतवृद्धे, असिक्नी, आर्जिकिया, वितस्ता आणि सुसोम ऐका, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा. यातली शतुद्रि म्हणजे सतलज, परुष्णी म्हणजे रावी, असिक्नी म्हणजे चिनाब, वितस्ता म्हणजे झेलम, सुसाम म्हणजे सोहम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 19:23 नवीन
सुंदर ! म्हैती नव्हती ही नावं! आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ए
एक एकटा एकटाच Sat, 09/26/2015 - 08:09 नवीन
वाह!!!!!!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/26/2015 - 08:17 नवीन
फारच सुरेख अतिशय आवडले गंगागीत त्यातली लयबद्धता आणि गेयता फारच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 12:51 नवीन
होय, नदीच्या कवितेला ताल, लय पाहिजेच कि! तर ती नदी शब्द होऊन समोर वाहते. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
व
विवेकपटाईत Sat, 09/26/2015 - 18:01 नवीन
सुंदर काव्य. प्रदूषण हे गेल्या १०० किंवा गेल्या 3० एक वर्षातच जास्त झाले आहे. सन १९८०च्या आधी मी दिल्लीत यमुनेत कित्येकदा अंघोळ केली असेल, पण आज पाण्याला स्पर्श करण्याची हिम्मत हि होत नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 09/26/2015 - 19:05 नवीन
सुरेख लिहिलेय. खूप आवडले.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 19:30 नवीन
यशोधरा... तुमचा गंगेचा धागा अतिसुंदर! इकडे पेष्टा कि!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 19:31 नवीन
यशोधरा... तुमचा गंगेचा धागा अतिसुंदर! इकडे पेष्टा कि!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 19:31 नवीन
यशोधरा... तुमचा गंगेचा धागा अतिसुंदर! इकडे पेष्टा कि!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 09/26/2015 - 20:16 नवीन
फार सुंदर. सुरेख कविता रचलीत. चाल लावली तर अजुन किती छान वाटेल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/27/2015 - 01:33 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 09/27/2015 - 04:06 नवीन
वा! लय ताल न प्रवाही!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 09/27/2015 - 12:45 नवीन
सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 09/29/2015 - 10:08 नवीन
सुंदर कविता. काही वर्षांपूर्वी हरिद्वार येथे झालेले गंगादर्शन अजून स्मरणात आहे.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Tue, 09/29/2015 - 14:02 नवीन
स्वतःची ७ पोरं नदीत टाकलेल्या बाईला का मान द्यायचा ? --- नोकरी करून माहेरी पगार देण्यात अडथळा होतो म्हणून अ‍ॅबॉर्शन करून मूल टाकलेल्या आधुनिक गंगामैय्याचा शंतनूराजा !
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 10/01/2015 - 18:14 नवीन
हितं बाई कुठून आली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Fri, 10/02/2015 - 12:28 नवीन
गंगानदीमैय्याने महाभार्तात शंतनूशी विवाह केला व नंतर स्वतःची सात मुले नदीत सोडून दिली. शेवटी आठव्या वेळेला शंतनू बिचारा रडला व मैय्याने तो पुत्र जिवंत ठेवला. तो म्हणजे भीष्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
य
यशोधरा Fri, 10/02/2015 - 13:58 नवीन
स्वतःच्या प्रवाहात गंगेने आपली अपत्ये सोडली हे माहिती आहे म्हणजे का सोडली हेही वाचलं असेलच की. अगदी हल्लीच्या मिडियासारखं वागून र्‍हायले राव तुम्ही, सोयीचं तेवढं बोलता, आणि पूर्ण तर नाहीच बोलत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Fri, 10/02/2015 - 14:17 नवीन
पण असली फडतूस कारणं मान्य कराअची तर खुनी लोकानाही सोडून द्यावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 10/02/2015 - 14:22 नवीन
तुमच्या दौदला आत्तापरेंत सोडलेत तसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Fri, 10/02/2015 - 14:51 नवीन
गंगा आमची नाही हे आम्ही म्हटले की दाउद आमचा झाला का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 10/02/2015 - 15:03 नवीन
तुम्हीच नेहमी म्हणता तसे ना. :) असो. गंगेसारखा चांगला धागा वाया जायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
श
शिव कन्या Fri, 10/02/2015 - 14:19 नवीन
गंगा-शंतनू-भीष्म ही चावून चोथा झालेली बाळबोध कथा कुणाला माहित नाही? शंतनूचे इतकेच पुत्रप्रेम होते तर, एकापाठोपाठ एक सात पुत्रांचा वियोग मुकाट्याने पाहायचाच नव्हता. थांबवायचे पहिल्या पुत्रापाशीच! पण थांबवले, तर गंगा निघून जाणार ही भीती. बिचारा शंतनू! बरे, विवाहापूर्वी गंगेने घातलेली अटही मान्य करून बसला होता. स्त्रीपाश आणि अपत्यप्रेम या दुहीत अडकलेला राजा! गंगेला मानवरूपात गृहीत धरले तर ती नक्कीच शंतनूपेक्षा वेगळ्या ज्ञातिकुळातील!स्वतःच्या अटींवर एखाद्या राजाशी लग्न करण्या इतपत आत्मविश्वास असलेली! तिचे पुत्र तिने स्वतःच्या प्रवाहात सोडले म्हणजे, स्वतःच्या ज्ञातिकुळात, माहेरी पाठवून दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिला तिच्या मुलांचे काय होते, ते नक्की माहित असणार! प्रश्न शंतनूचा! पुढे राज्याला वारस नाही, आणि गंगा तर पुत्र ठेवत नाही! म्हणून रडला शेवटी! तिनेही पुत्र दिला, आणि कुठल्याही वैभवाचा लोभ न धरता, अटीनुसार निघूनही गेली! कुठे काय ..... पुढे काही माहित नाही! कि स्वतःच्या प्रवाहात, कि माहेरी, कि अरण्यात राहून भीष्माला पहात राहिली, भेटत राहिली .. ........ अनेक शक्यता! जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा. पुराणातील कथा अनेक बाजूंनी पाहता येतात ! ज्याची जशी दृष्टी, तशी तो पाहणार! अशा बाईला मान का द्यायचा..... म्हणून आपण आपले कोतेपण मांडणार? कि आपल्या अभ्यास, विचारांची व्याप्ती वाढवून बघणार? हा ही परत ज्याच्या त्याच्या कुवतीचा, मनोवृत्तीचा प्रश्न! आपल्या प्रतिसादाने लिहिते केले. धन्यवाद दादा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
म
मांत्रिक Fri, 10/02/2015 - 14:54 नवीन
वाह सुंदर स्पष्टीकरण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
ह
होबासराव गुरुवार, 10/08/2015 - 12:11 नवीन
पण बाटग्याने मांडायचा तो उच्छाद मांडलाच ह्याही धाग्यावर. मला त्याला सांगाव वाटतय कि " तु गेलायस ना एकदचा हिंदु धर्म सोडुन ! तर मग नको इतकी चिंता करुस आमचि किंवा आमच्या धर्माचि. आम्हि ज्या धर्माचे आहोत तो काळानुसार आपल्यात बदल घडवतो, अयोग्य अशा गोष्टि त्याजतो आणि नविन चांगल्या गोष्टि अनुसरतो. you keep continue following the medieval or stone age rituals रानटि. शेख अपनि देख" हिंदु हा फक्त धर्म नसुन ति एक जिवन पध्दति आहे असे मानणारा सचिन कुळकर्णि उर्फ होबासराव
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Fri, 10/09/2015 - 03:58 नवीन
मी इथे फक्त हे लिहिले / व्यक्त केले तर तुमचे पोट का दुखते ? तुमच्या नदीची तुम्ही आनंदाने पुजा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा