।।गंगास्मरण।। ( अर्थात राम तेरी गंगा मैली)
प्रेरणा
तू उर्वशी तू मर्यादा , गीता रिता ज्युली शांती
तुझीच सारी अनंत रूपे, यास्मिन किंवा मंदाकिनी ती
अग्निरथी तू दुग्धदायिनी,
तुलाच नमितो कपूर राजीव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
"बॅाली"वुडचे भक्त चिरंजीव
स्नानार्थं जलपातगामिनी
तुझ्या पल्लुचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या दर्शने शांत गळाले
प्रणयसंगम तूनळी रंजन
तिथेच फिरते चक्र निरंतन
विशालसुंदर आम्र निरंतर
तिथे विरावे माझे अंतर
प्रणयसलिला मुक्ता कांता
ये वेगे, जा घेऊन मजला
मम तीर्थाचा तुला दिलासा,
जीवास थकल्या होई विसावा
तू उर्वशी तू मर्यादा...........
अज्ञानी बालकांसाठी संदर्भ -
उर्वशी -प्यार करके देखो
मर्यादा - देशवासी
गीता -लड़ाई
रिता - आखरी बाज़ी
ज्युली - जिते है शान से
शांती - मेरा साथी
तुनळी - युट्युब
💬 प्रतिसाद
(54)
द
दमामि
Fri, 10/09/2015 - 14:41
नवीन
ते काय आहे, " दैनिक गती , किंवा क्ष घन " वृत्तात(की वृत्तीत) बसत नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 14:50
नवीन
प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन
हे बसू शकेल, काय म्हंटा?
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 10/09/2015 - 14:55
नवीन
बॅट्या , भावा,जिंकलंस की रं!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 10/09/2015 - 20:04
नवीन
@प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन>> :-D या मेल्या खाटुकाला ना, सरळ लटकवून ठेवले पाहिजे,ते ही दिवसा!!! :-D
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2