तिला काट्यात घर सापडले
तिला काट्यात घर सापडले
बाभळ तिथे गवसतो म्हणे...
गिधाडांची काळी ज्वाला
सतत असतो लचक्याचा घाला....
तिचा आत्मा गुहेत अडकून राहिला
काळ सरून देऊळ पडून गेला...
तिने हाती मग फुल उजळले
त्यात आत्मीक अत्तर गवसले…
सोडविना तो गंध नेई चंद्रापलीकडे
तेथे असतो राणा सांगती सगळे….
ती निघाली लाटेच्या हाकेवरती
जो घेऊन गेला कमळ डोईवरती…
तिच्यात आला निघून काळ आडोश्याला
पाझर फुटला चंद्र माखला आज वसुंधरेला…
💬 प्रतिसाद
(2)
ज
ज्योति अळवणी
Sun, 09/27/2015 - 12:00
नवीन
अह... नाही जमली हो...
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 09/27/2015 - 12:29
नवीन
काही ओळी लक्षवेधी आहेत. पण एकूण कविता कशाबदल आहे वगैरे नीटसे कळले नाही.
- Log in or register to post comments