Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण काही मदत नक्कीच करू शकतो

द
दा विन्ची
Tue, 09/29/2015 - 12:08
🗣 5 प्रतिसाद
अर्ध्या तासापूर्वी online चतुरंग किंवा लोकरंग मध्ये मकरंद अनासपुरेचा एक लेख वाचताना माझ्या मनात जो विचार आला तो मी आता आपल्या सर्वाना सांगू इच्छितो. खर तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे चांगले अभिनेते आहेत किंवा नाहीत हा आजचा विषय नाही. पण दोन हजार किमी अंतरावरून मी जेंव्हा त्यांच्या नाम फौन्डेशन च्या कामाविषयी वाचतो तेंव्हा मला आपणपण आपल्या राज्यातील दुष्कालग्रस्तासाठी मनापासून काही तरी मदत नक्कीच करू शकू असे वाटते . कालच माझ्या एका सहकाऱ्याचा वाढदिवस होता. सात जणांचे पूर्णपणे शाकाहारी जेवणाचे बिल रु २२०० झाले . देणारालाही फार काही वाटले नाही व कदाचित मलाही फार काही वाटले नसते. आपण सर्वजण सुशिक्षित व बर्यापैकी सुस्थितीत आहोत. पण विदर्भ व मराठवाड्यातले तरणे तांड शेतकरी अवघ्या ४०-५० हजारासाठी आपले जीवन अकाली संपवत आहेत. खरेच आपल्या संवेदना मेल्या आहेत काय ? आपण या शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक मदत देवू शकतो का ? मिपा कटुंब खूप मोठे आणि विचारी पण आहे. या सूचनेला आपण नक्कीच आणखी फाईन ट्यून करू . मदत द्यावयाची का? कशी? म्हणजे नाम फौन्डेशन की मुख्यमंत्री निधी? का इतर काही जास्त समर्पक पर्याय आहे ? हा सर्व साधक बाधक विचार आपण करूच . आणि हे आपण सर्व काही प्रसिद्धी किंवा अगदी आयकर सवलतीसाठी सुद्धा करणार नाही . आपण सर्वजण (डू आयडी सोडून अंदाजे ५००० जण) आपला दोन दिवसांचा पगार याकामी देवू शकतो का ? मी स्वतः काही रक्कम (२ ते ३ हजार रुपये ) देवू शकतो. सहानुभूती नको , आपण काहीतरी करू . अशा कामामधील जाणकार व्यक्तींना कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत करण्याची आग्रहाची विनंती. याआधीच असा काही विचार मिपा वर झाला असेल तर कृपया माहिती कळवावी .

संपादकीय डिस्क्लेमरः सदर धाग्यातील आवाहन हे लेखकाचे स्वत:चे असून मिसळपाव.कॉमचा त्यात काहीही संबंध नाही किंवा सहभागही नाही. केवळ चर्चेसाठी मंच उपलब्ध आहे. आर्थिक व्यवहार सदस्यांनी आपापल्या जबाबदारीवर करावेत. मिसळपाव.कॉम त्यासंदर्भात कुठल्याही व्यवहाराला जबाबदार राहणार नाही.


प्रतिक्रिया द्या
5045 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मांत्रिक Tue, 09/29/2015 - 12:14 नवीन
मी १००० तरी करू शकतो.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 09/29/2015 - 12:44 नवीन
पण ती गरजूंपर्यंत पोहोचणार कशी?
  • Log in or register to post comments
द
दा विन्ची Tue, 09/29/2015 - 12:50 नवीन
सर ही सगळी साधक बाधक चर्चा आता आपण इथे करूच. काही तरी मार्ग नक्की निघेल सर. मला स्वताला मुख्यमंत्री निधीवर भरोसा नाही. इथले तज्ञ नक्कीच मदत खरोखरच्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतील.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 09/29/2015 - 13:14 नवीन
>>> मला स्वताला मुख्यमंत्री निधीवर भरोसा नाही. इतर निधींबाबत माहिति नाही पण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबत माझा स्वतःचा आणखी अनेक रुग्णांचे अनुभव अत्यंत चांगला आहे. कधीतरी लिहीन याबाबत. याव्यतिरिक्त http://misalpav.com/node/32730 या धाग्यावर काही चर्चा झाली मात्र त्यानंतर पुढची कारवाई करणं राहून गेलं आहे. आता वैयक्तिक अथवा मिपा वरुन एक गठ्ठा काही होणार असलं तर तशी मदत करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची
द
दा विन्ची Tue, 09/29/2015 - 18:04 नवीन
प्यारेजी व इतर, क्षमस्व. नजरचुकीने आधीचा धागा वाचला नव्हता. शिवाय संपादकीय सूचनासुद्धा अगदी महत्वाची आहेच. एखाद्या चांगल्या संस्थेद्वारा यथाशक्ती मदत करणे हे अधिक उत्तम आहे. दुसऱ्या धाग्याच्या जवळपास पुनरावृत्ती बद्दल क्षमस्व. संपादक मंडळाने हा धागा काढून टाकण्यास हरकत नाही हे. वे. सां. न लगे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा