भेट...
छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
दिवस जसा रात्रीला
येऊन भिडतो थेट थेट
मग होते रोजची सकाळ
सूर्य येताे प्रकाशात
दिवसभर थकून भागून
रात्री मिटतो आकाशात
असाच दिवस अशीच रात्र
मला खूप आवडते
मन माझं भेटीच्या त्या
सोनसंध्येला निवडते
आवडेल तुला जीवनात
अशी भेट झाली तर?
रात्री सोबत दिवसाला
नवी पालवी आली तर!?
मैत्रीच्या या फुलामधला
परागकण मी व्हावे
अश्या भेटिच्या पूर्णत्वाला
वर्षे ने ही यावे
.............................
(चित्र:- मीच काढलेले ...)
(चित्र:- मीच काढलेले ...)
💬 प्रतिसाद
(64)
स
सटक
Tue, 09/29/2015 - 15:49
नवीन
प्रसन्न कविता!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 09/29/2015 - 15:54
नवीन
गुर्जी कविता छान! :)
हलकी-फुलकी!
चित्राबद्द्ल माझी एक शंका : तिथे सूर्य आहे का कुणाचे टक्कल चमकतेय? :-/
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 09/29/2015 - 16:20
नवीन
स्यांडया हानतो बघ तुला. गुर्जीना काय बी शंका इचारयाच्या नैत. ;-)
गुरजी मला आवडली बरका कविता. मस्तय.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 09/29/2015 - 16:34
नवीन
आस झाल का? पळतो मग आता कडकडन!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/29/2015 - 15:57
नवीन
हम्म...............
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/29/2015 - 16:01
नवीन
आता उत्तराची वाट पाहणं आलं.... ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 09/29/2015 - 16:08
नवीन
पहिल्या कडव्यावर हसु आवरलेच नाही =))
दिवस जर रात्रीला येवुन छान छान थेट थेट भेटत असेल तर छान छान दिवस जाणारच की =))))
ह्या इथे बहुतेक जुन्या चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या की आता पुढे काही सांप्रदायिक वाचायला मिळनार की काय ते .... पण छ्या , परत एकदा निराशा !
आं =))))
पहा : मॅटिनी शो http://misalpav.com/node/29459 =))
ही वर्षा कोण ?
अवांतर : चमकते टक्कल कुठे आहे ?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 16:29
नवीन
@दिवस जर रात्रीला येवुन छान छान थेट थेट भेटत असेल तर छान छान दिवस जाणारच की >>. दुत्त दुत्त पोपशास्त्री! :D
बाकीच्याचा समाचार लवकरच! ल्लुल्लुल्लुल्लु :-/
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 09/29/2015 - 16:26
नवीन
मग होते रोजची सकाळ
सूर्य येताे प्रकाशात
दिवसभर थकून भागून
रात्री मिटतो आकाशात>>>>>
हे विशेष आवडलं. कडक!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/29/2015 - 16:44
नवीन
>>>> छान छान जावे दिवस
कसं सुचतं ओ???? ;)
-ल्लुल्लुल्लुल्लु कवितेचा रीपिट ऑडियन्स ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 17:00
नवीन
असोच्च! 
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 09/29/2015 - 17:28
नवीन
खूप छान कविता.
अरे तो टका कुठे गेला? त्याला म्हणाव.......
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 17:55
नवीन
संपादक लोक्स.. जरा हे क्लिअर चित्र लावा हो... प्लीज. :)

- Log in or register to post comments
ढ
ढंप्या
Tue, 09/29/2015 - 18:09
नवीन
पहिल्या कडव्याच्या पहील्या दोन ओळी जर पहिल्याच कडव्याच्या शेवटी लिहील्या तर........!!!
(हळू घ्या हो.... नाहीतर चेपायचे... )
- Log in or register to post comments
प
पीके
Tue, 09/29/2015 - 18:17
नवीन
हे तर टक्कलच दिसतयं चमकनारं,.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 18:31
नवीन
माझं चित्र थोडं कमी पडलं हे मान्य करतो..आणि म्हणूनच स्पष्टीकरन देतो. ज्याला तुम्ही टक्कल म्हणता आहात.. तो काव्यगतीनुसार दिवस/रात्रीच्यामधे असलेला सूर्य आहे,असे मी गृहीत धरले आहे.
आणी..
हे चित्राचं विवरण..
तरिही तुम्हाला चित्र पूर्वीसारखच पहायच असेल..तर पहा..मी कमी पडलेली बाजू स्पष्टीकरणातून भरलेली आहे..माझे काम संपले..धन्यवाद. :) __/\__ :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/29/2015 - 18:34
नवीन
>>>> डावीकडे पुरुष चेहेरा उजवीकडे स्त्री
इ तो यम यफ हुसैन से भी बढकर निकला ससुरा!
इन्डिया मे काहे खप रहे हो. इन्टरनैसनल जाओ इन्टरनैसनल. ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 18:51
नवीन
तो पुरुष चेहेरा (चौकिनी कान) आणि स्त्री चेहेरा(गोलसर कान)... बाकि ..असो!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 09/29/2015 - 19:08
नवीन
चित्र पाहिल्यावर त्यातले दोन्ही चेहरे दिसून आले होते, मात्र तुम्ही म्हणताय तसं डावीकडे पुरुष उजवीकडे स्त्री
असं न दिसता बरोबर उलट वाटलं होतं, :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/29/2015 - 18:40
नवीन
=))
कवीवर आपल्या कवितेबद्दल स्पष्टीकरणाची वेळ कधीही येऊ नये इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 18:49
नवीन
हाच्च तो आगलाव्या कपटीपणा! मी स्पष्टीकरण दिलं चित्राबाबत...आणि ह्यांनी कवितेवर आळ आणला.. केला की नै जाणिवपूर्वक खोडसाळपणा
------------------------------
खुर्चीमारातृप्त-फटकफटक आगोबा!

- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/29/2015 - 19:15
नवीन
अहो पण ते चित्र पण कवितेचाच एक भाग आहे की नै?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 19:18
नवीन
ते वाट्टेल ते असो... तुम्ही छळू विपर्यास केला ..हे णक्की!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/29/2015 - 19:23
नवीन
तो तुमचा समज आहे =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 09/29/2015 - 19:56
नवीन
चालू द्या मग नेहमी प्रमाणे
.
।
।
।
।
निरर्थक आत्मकुंथन!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 09/29/2015 - 19:47
नवीन
गुर्जी, चित्र आणि त्यामागची कल्पना दोन्ही आवडले!
शिवाय, हे चित्र मोबल्यावर काढलेले दिसतेय, म्हणजे अजून भारी, कारण त्यातही सर्व आकार यथाशक्ती काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि तो छान साधला आहे! कवितेला समर्पक!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 09/29/2015 - 18:27
नवीन
मस्तं! खूप छान कविता. आवडली.
- Log in or register to post comments
प
पीके
Tue, 09/29/2015 - 18:51
नवीन
>>>> डावीकडे पुरुष चेहेरा उजवीकडे स्त्री...
आत्ता कळल पण मी उलट पाय्हल आणि मधोमध सुर्य नारायन मुकुट घतलेले... आणि वर तिन पक्षि पिवळ्या रंगतले? लय भारी..
- Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky
Tue, 09/29/2015 - 19:00
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 09/29/2015 - 19:35
नवीन
रचना विचार आवडला :-) .
एखादे वेळेस स्पष्टीकरण द्यावे लागलेही तर त्यात कमीपणा कसला. वाचकाचे आकलन कमी पडत असल्यास तो दोष कवीचा नक्कीच नसतो.
- Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत
Wed, 09/30/2015 - 04:11
नवीन
मला कविता आवडली.
चित्राचं म्हणाल तर मला वाटतं चित्रात वैचित्र अवश्य असावं.
मला तर चित्र पाहून, १०१ फ्रिवेवर ७० मैलाच्या वेगाने जाताना डॅशबोर्डवरचा स्पिडोमिटर भासला.
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Wed, 09/30/2015 - 04:33
नवीन
कविता छान आहे, चित्र देखील चांगले आहे. दोन चेहऱ्यांमधला सूर्य देखील लगेच कळला. कळल्या नाहीत त्या शेवटच्या कडव्यामधल्या शेवटच्या दोन ओळी.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 09/30/2015 - 05:14
नवीन
परागकण मी व्हावे - वा! वा! (टाळ्या वाजवणारी स्मायली)
अशा भेटीच्या पूर्णत्वाला वर्षेनेही यावे (कन्फूजवा स्मायली)
तुम आ गये हो, नूर आ गया है - तो चलो, तीनो मिलकर चाय पीते है! असं आहे का काही?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/30/2015 - 05:33
नवीन
प्रीतीचे फूल| >> परागकण| >>> वर्षा (पाऊस) >> वर्षेने प्रेमऱुतू बहरणे फुलणे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/30/2015 - 05:37
नवीन
:)
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Wed, 09/30/2015 - 06:53
नवीन
हलकी फुलकी मस्त आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 09/30/2015 - 07:06
नवीन
छान कविता. पराग कोण माहीत आहे. ही वर्षा कोणे? प्रीती कोणे?
तुम्हाला चित्र कळते असे वाटते. रांगोळ्या त्याची साक्ष आहेत. मोबाईलवर काढायचा प्रयत्न करत असाल तर दुसरे काही सॉफ्टवेअर वापरून किंवा स्टायलस वापरून अधिक चांगल्या प्रकारे येतील. त्याचा सराव व्हावा लागेल. लोक हसले तरी चित्रे काढत रहा. हळूहळू सफाईदार येतील. हसतील त्यांचे दात दिसतील! त्यांना आपल्या दंतोत्पाटिका तै बघून घेतील! =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/30/2015 - 07:19
नवीन
कोणाची हिंमत आहे ओ अत्रुप्त सरांनी गुर्जींनी काढलेल्या चित्रांना हसण्याची.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 09/30/2015 - 07:15
नवीन
असा परागकण असेल तर फूल नक्की जंबो साईझ असणार !
(..पळते आता...!)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 09/30/2015 - 08:01
नवीन
कविता मस्तच....
समथिंग व्हिच यू कॅन स्माईल आफ्टर रीडिंग.
मला हे वाचून काहीतरी सुचलं. अगदी विडंबन नाही म्हणता येणार.... इथे पोस्ट करतोय प्रतिसादात.
मला जिथे वाटेल तिथे
घेऊन जाईल थेट थेट
कुठे मिळेल मला असं
जादूचं एक जंबोजेट
माझा मित्र माझा सखा
आठवेल जेंव्हा जेंव्हा मला
करून देईल का ते मग
तेंव्हा त्याची माझी भेट
स्वप्नात दिसतं गाव मला
सत्यात मात्र नसतं ते
स्वप्न आणि सत्यामधलं
उघडेल का हो कधी गेट
आकांक्षेला धीर नसतो
विचारांना नसते घाई
मधल्यामधे मन मात्र
करत राहतं नेहमी वेट
मला जिथे वाटेल तिथे
घेऊन जाईल थेट थेट
कुठे मिळेल मला असं
जादूचं एक जंबोजेट
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 09/30/2015 - 08:05
नवीन
वा वेल्लाभट, क्लासच!!!
झक्कासच!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/30/2015 - 12:50
नवीन
+१
वाह रे वाह वेल्ला भटा
छान लिहीलस पटा पटा!
मायला जिल्बीच पडली वाक्य ल्ह्यायला गेलो आनी! :D
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/01/2015 - 07:08
नवीन
थँक्यूच म्हणजे एकदम :)
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 10/01/2015 - 19:04
नवीन
आवडेश!
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
Wed, 09/30/2015 - 20:59
नवीन
++++1111 बुवा छान छान शुंडर कविटा
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 09/30/2015 - 21:24
नवीन
वा ये बात! अत्रुप्त आणि वेल्ला दोघांनाही.
- Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/01/2015 - 04:05
नवीन
प्रथम अत्रुत्पजी अन नंतर वेल्लाभटजीकडून स्फुरण मिळाल्याने मलापण रहावलं नाही.
छान छान जावे दिवस
छान छान व्हावी भेट
मुलगी जशी आईला
येऊन भेटते थेट थेट
मग होते रोजची सकाळ
बाबा येतात प्रकाशात
आणि
दिवसभर थकून भागून
रात्री भेटतात घरात
अशीच आई असेच बाबा
मला खूप आवडतात
मन माझं भेटीच्या त्या
उत्सुकतेने वाट पहातात
आवडेल तुला नेहमीच
अशी भेट झाली तर?
आई बरोबर बाबांना
जवळ जवळ पाहिले तर?
प्रेमाच्या या कबाबमधे
हड्डी मी न व्हावे
अशा भेटिच्या प्रसंगाना
खंड कधी न यावे
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/01/2015 - 07:16
नवीन
धन्स!!!
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 10/01/2015 - 06:05
नवीन
कवीता आवडली.
आप्ल्या शिषोत्तमाचे इकडे लक्ष्य जावो हि आकाशातल्या बाप्पाकडे प्रार्थना.
समस्त्बुवाप्रेमीमिपावाचक्परिवार्संचालीत जिल्बीकडबोळीचकलीहुकलीतरीखाल्ली महासंघ.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/01/2015 - 06:49
नवीन
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »