Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अतूट काही...

प — प्राची अश्विनी, गुरुवार, 10/01/2015 - 14:50
पाप पुण्य अन् काल आजच्या पल्याडही जर असेल काही, अनादि, आदिम त्या तत्वाशी नाळ जोडली आहे माझी ... काळाची विक्राळ कातरी कापू पाहते त्या धाग्याला.. जळजळीत कधी चटके देतो तीव्र अतीव दु;खाचा प्याला.. गळ्यात बेडी अंध भक्तीची प्राण तिचे कंठाशी येती.. डोळस, निर्दय नास्तिकतेचे घाव बैसती माथ्यावरती .. पण अतूट आहे टिकून अजुनी जीर्ण बकुळीसम ती ताजी.. अनादि आदिम त्या तत्वाशी नाळ जोडली आहे माझी..

प्रतिक्रिया द्या
1955 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मांत्रिक गुरुवार, 10/01/2015 - 17:11 नवीन
पाप पुण्य अन् काल आजच्या पल्याड असेल जर ते का काही, आदीम अनादी त्या तत्वाशी नाळ जोडली आहे माझी ... विक्राळ कातरी ती काळाची कापू पाहते त्या धाग्याला.. जळजळीत कधी चटके देतो तीव्र अती दुःखाचा प्याला.. गळ्यात बेडी अंध भक्तीची प्राण तिचे कंठाशी येती.. डोळस, निर्दय नास्तिकतेचे घाव बैसती माथ्यावरती .. पण अतूट आहे टिकुनी अजुनी जीर्ण बकुळीसम ती ताजी.. आदीम अनादी त्या तत्वाशी नाळ जोडली आहे माझी.. माफ करा! थोडा बदल केला! पण आता लयीत बसतेय असं वाटतंय मला! पुन्हा गुणगुणून बघा पाहू! बाकी उत्तम!!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/03/2015 - 04:20 नवीन
तसंही चालेल, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
द
दमामि Fri, 10/02/2015 - 03:24 नवीन
अरे वा! मांत्रिक भौ, तुम्हास्नी बघून बरं वाटलं.:)
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Fri, 10/02/2015 - 17:15 नवीन
चालतंय रे दमामि! भांडणं वादविवाद सगळीकडंच होतात! मिपा तरी का वर्ज्य त्याला? आपण त्यातून मॅच्युअर होत जाणे महत्वाचं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Sat, 10/03/2015 - 03:37 नवीन
हं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
व
विवेकपटाईत Fri, 10/02/2015 - 16:55 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/03/2015 - 04:20 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा