Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

म्हणता म्हणता ......

श — शिव कन्या, Fri, 10/02/2015 - 04:58
काहीच नाही म्हणता म्हणता चंद्राभवती पडले खळे, खळेच पडले इतके सुंदर चंद्र दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता चाफ्याभवती पान उमटले पानच इतके गर्भरेशमी, फूल दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता बागेभवती जडली माया माया इतकी गर्दसावळी बाग दिसेना त्यानंतर! काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!

प्रतिक्रिया द्या
2335 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रचेतस Fri, 10/02/2015 - 06:10 नवीन
खूप सुंदर कविता. लयबद्ध.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Fri, 10/02/2015 - 06:24 नवीन
अप्रतिम. सुंदर लय!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 10/02/2015 - 07:01 नवीन
लयदारलय! :)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 10/03/2015 - 03:54 नवीन
मला कविता खूप आवडली
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/03/2015 - 04:18 नवीन
क्या बात!!!
  • Log in or register to post comments
C
chetanlakhs Sat, 10/03/2015 - 04:27 नवीन
शब्दरचना छान जमलीय पण शेवटच्या 2 ओळींचा अर्थ लक्षात नाही आला. पहिल्या 3 कडव्यांमधे मांडलेला विचारांची माळ शेवटच्या कडव्यात तुटली असे वाटले
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 10/03/2015 - 05:34 नवीन
अप्रतिम.... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Once Again - 2011 :- Hang Massive
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 10/03/2015 - 16:18 नवीन
आवडलं हे कडवं.
काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा