Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जमलंच तूला तर....!!

च — चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू, Sun, 10/04/2015 - 11:23
जमलंच तुला...... तर जमलंच तुला...... तर करुण दू: खानं ओथंबलेल्या डोळ्यांना धागा (सुखाचा) दे विसावण्यासाठी या लोकशाहीला थोड़ी जागा दे प्रसवण्यासाठी त्यामुळं उघड्यावर होणारे तिचे प्रसव टळतील नाहीतर उगाच लोक बड़बड़तील काहीही अन कुठेही ? जमलंच तुला...... तर कान फूंक त्या बलातकाय्रांचे दे पाणी त्यांना मर्दानी कर्तुत्वाचं ! एरवी गंज चढलाय त्यांच्या माणूसपणाला पौरुषत्वाची एक ठिणगी असते कायम पण तीही पेट घेते फ़क्त वासनेच्या वाय्रानेच त्यांचा पुरुषार्थ शोभून दिसतो टेबलावरच्या कागदी फुलांच्या ताटव्यांत अगदी गुबगुबीत, गुलाबासारखा ना गंध, ना वास! फूल आहे, तेवढा भास ! जमलंच तुला...... तर दे निवारा त्यांना ज्यांच्या झोपडितला प्रकाश घासागणिक गिळला जातो अंधरानं जीव पिळला जातो मग त्यांचंही अवसान गळायला लागतं यातलं थोडं थोडं कळायला लागतं पण सांगणार कुणाला? कि आमच्या धारदार तलवारी चोरल्या जातात छातीवर शिलालेख कोरल्या जातात काळोखाच्या अजरामरतेचे... जमलंच तुला...... तर हाणून पाड त्या बहुरूपी गिधाडांना..... जे हुडकतात माणसांच्या वस्त्या माणुसकीचे लचके तोडण्यासाठी हृद्यातल्या 'माणुसपणा'वर असते त्यांची नजर माणूस दिसला....कि हे चोच मारायला हजर हे दयाळा !! इथे खुलेआम हिंडतात मवाली गळे कापत मानवतेच्या पुजाय्राचे.... पिंडाला शिवण्यासाठी कावळे शोधावे लागतात...... मरणासाठी स्मशानाचे परवाने लागतात..... माणसाअभावी वसाण पडलेल्या वस्त्यांना लागतेय वाळवी.... तुझ्या साक्षीने...जातियतेची, धर्मांधतेची कवी:निवृत्ती पां हागे,पुणे

प्रतिक्रिया द्या
960 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा