गांधीजयंती निमित्त गझल
बापू
जिकडे तिकडे हिंसा आता दिसते बापू
जनतेला या गरिबी अजून पिसते बापू
जेव्हा जेव्हा लूट पाहतो मी सत्याची
तुझीच प्रतिमा मनात माझ्या वसते बापू
शेतीचाही कणा मोडला दुष्काळाने
शेतकय्रांचे जीवन झाले सस्ते बापू
मातीमोल रे तुझी अहिंसा झाली आता
सदा मनाला चिंता याची डसते बापू
भिंतींवरचे फोटो नुसते नावापुरते
जनता तुजला जयंतीलाच पुसते बापू
खोटे नाटे सारे हे व्यवहार चालती
कुठे कुणीही आज कसे रे फसते बापू?
खरेच जर तू आठवला असता देशाला
खून, दरोडे, बलात्कारही नसते बापू
चुकलो आम्ही घे पदराला गुन्हे आमचे
दाव खर्याचे सर्वांना तू रस्ते बापू
मला दिलासा नको कुणाचा जगण्यासाठी
हेच मला आधार जगाचे "हसते बापू"
अजून देशोन्नतीच झाली असती जर का
पुन्हा महात्मा बनून आले असते बापू
गझलकार:चिमणराव वरवंटे(निवृत्ती पांडूरंग हागे)
💬 प्रतिसाद
(9)
च
चांदणे संदीप
Sun, 10/04/2015 - 14:00
नवीन
छानच गजल!! :)
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 10/05/2015 - 11:49
नवीन
वा!
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 10/05/2015 - 11:54
नवीन
अप्रतिम रॉ मटेरीयल =))
- Log in or register to post comments
द
दमामि
Mon, 10/05/2015 - 11:55
नवीन
:)
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 10/06/2015 - 07:58
नवीन
मालाअवरील बांधकाम पाहण्यास उत्सुक.
हा टका कुठेय आणि जेपी दिसेना !!!!
शोधू कुठं .
प्रतिक्षार्थी नाखु
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 10/05/2015 - 11:54
नवीन
काव्य म्हणून उत्तम आहे.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Mon, 10/05/2015 - 12:15
नवीन
अप्रतिम
- Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी
Mon, 10/05/2015 - 13:27
नवीन
भन्नाट!क्या बात है!
- Log in or register to post comments
च
चिमणराव वरवंटे…
Mon, 10/05/2015 - 19:25
नवीन
सगळ्याईचे मनापासून आभार मानते हा चिमणराव
- Log in or register to post comments