अगुंबे बद्दल माहिती हवी आहे
दिवाळी नंतर ३-४ दिवसांसाठी जाण्याचा विचार आहे, तरी पूण्याहून कसे जावे? राहायची सोय काय?
मालगुडी डेज चे शुटींग इथे झाले ऐकले आहे, जायची इच्छा आहे
💬 प्रतिसाद
(14)
ट
टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 20:05
नवीन
कबीरा स्पीकिंग =))
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sun, 10/04/2015 - 20:21
नवीन
अगदी हेच्च आठवलं होतं!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/07/2015 - 03:46
नवीन
भन्नाट पिक्चर आहे राव तो.
- Log in or register to post comments
ऋ
ऋत्विका
Mon, 10/05/2015 - 03:03
नवीन
पुण्याहून मिरज किंवा कोल्हापूर मार्गे हुबळी आणि तिथून शिमोग्याला जा. शिमोग्याहून अंगुब्याला जा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 10/05/2015 - 06:06
नवीन
पुणे एरनाकुलम पूर्ण एक्स्प्रेस हि आठवड्यातून तीन वेळेस जाणारी गाडी घेऊन उडूपीला उतरा तेथून ५५ किमी वर अगुंबे आहे आणि तेथुन भरपूर बसेस मिळतात ( मणिपाल वाटेत लागते). आठवड्यात दोन वेळेस हि गाडी कराड मिरज वरून जाते त्याने गेलात तर गोव्यात प्रवेश करण्याच्या अगोदर दुधसागर धबधबा पण फुकटात पाहायला मिळेल. आणि आठवड्यात एकदा पनवेल वरून जाणारी असेल तर कोकण रेल्वेचा प्रवास घडेल कोणत्याही मार्गाने गेलात तरी दृष्टी सुख भरपूर मिळेल
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 10/05/2015 - 07:39
नवीन
रोम्युलस व्हिटेकर! तिथे नागराज ऊर्फ किंग कोब्राचे फोटो काढण्यासाठी एकदा जाणार आहे.
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
Mon, 10/05/2015 - 08:48
नवीन
कुठे रहाल?
अगुंबे जरी खूप प्रसिद्ध पर्यटन स्थळ असले तरी तिथे राहाण्याची अजिबात सोय नाही. एकच लॉज आहे (माल्या रेसिडंसी) पण ते खूपचं साधं आहे. फॅमिली सोबत असेल तर तिर्थहळ्ळी/शिवामोगा/उडुपी/स्रिंगेरी ला राहाण्याचा पर्याय निवडावा.
काय बघाल?
अगुंबे घाट ( २१ हेरक्लिप टर्न्स), Agumbe Rainforest Research Station, स्रिंगेरी (मंदिर), कुंदादरी (हिल स्टेशन), कुद्रेमुख (शोला फॉरेस्ट)
खाली दिलेले रस्ते हे खूप दाट जंगलातुन जातात आणि वन्य प्राणी दिसण्याचे खूप चांसेस आहेत,
१) अगुंबे - सोमेश्वर( नागराज साठी प्रसिद्ध)
२) अगुंबे -कुंदादरी - तिर्थहळ्ळी
३) अगुंबे -किग्गा
४) माया घाट
मला नागराज ( किंग कोब्रा) चं एवढं आकर्षण आहे की २ वर्षांपुर्वी मी एकटाच Agumbe Rainforest Research Station ला भेट देण्यासाठी गेलो होतो. ते पण बाईक वर. दुर्दॅवाने तेंव्हा किंग कोब्रा रिसर्च संपला होता आणि व्हिटेकर आणि गवरीशंकर (https://pogirigowrishankar.wordpress.com/) दोघेही नेलोर ल गेले होते.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 10/05/2015 - 11:51
नवीन
हे ठिकाण भारी वाटतंय... आणि ती दोन माणसं, खासकरून. जायला हवं....
२१ हेअरपिन बेंड्स... साउंड्स कूल
- Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर
Mon, 10/05/2015 - 15:45
नवीन
गेले पाच दिवस तिथेच होतो. आजच (५ ऑक्टोबर) दुपारी परतलोय.
बाकी कसे जाल, कुठे राहाल, काय पाहाल याबाबत जाणकार मिपाकरांनी वर उपयुक्त मार्गदर्शन केलं आहेच.
काही विशेष माहिती हवी असेल तर व्यनि करा.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 10/06/2015 - 16:07
नवीन
काय पाहिले आम्हाला पण सांगा ना.
मिपावर काही लोक असे लिहितात वर्णन करतात की प्रत्यक्ष जाण्यापेक्षा त्यांचे लेखच जास्त जिवंत अनुभव देतात. त्यात माझ्या यादीत तुम्हीही आहात.
लेखाची वाट बघतोय.
- Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर
Tue, 10/06/2015 - 17:09
नवीन
वृत्तान्त लिहिणारच आहे. पश्चिम घाटातलं जीववैविध्य भाग ३. लिहायला सुरुवात करतोच आहे. जरा वेळ लागेल..
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 10/06/2015 - 21:39
नवीन
तुमच्या लेखाची.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 10/06/2015 - 22:42
नवीन
+११११११
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 10/07/2015 - 03:47
नवीन
नूलकारांच्या लेखाच्या प्रतीक्षेत!
- Log in or register to post comments