मराठीचे कवतुक
मराठीचे कवतुक
नाही पहिले उरले
उरेल ही बोली भाषा
कोणी मोठयाने बोलिले
"मिपा" सम धन्वंतरी
कशा उगा चिंता वाहे?
शाश्वताच्या वाणीतून
सत्य जणू हुंकारले
इंद्रायणी तीरि पहा
कोण उन्मेष उसळे
ज्ञानेशाच्या काळजात
लक्षदीप उजळले
💬 प्रतिसाद
(1)
द
दिवाकर कुलकर्णी
Mon, 10/05/2015 - 11:12
नवीन
शुध्द लेखना सह दुरुस्तीस पात्र
- Log in or register to post comments