पराजित योद्धा
अपराजित जगज्जेता
पकडले त्याने काळाला.
दंभ अमरतेचा
विजयी गुंगीचा.
कळलेच नाही त्याला
काळ कसा निसटला
सूर्यास्त कसा झाला.
अखेर
हात रिक्तच राहिले
पराजित योद्धाचे.
💬 प्रतिसाद
(2)
स
समीर_happy go lucky
Tue, 10/06/2015 - 19:32
नवीन
पहिल्या चार ओळी अप्रतिमरित्या जमल्या आहेत अन त्या पुढे वाचण्यासाठी उत्सुकता अन अपेक्षा वाचकांची वाढवतात. पण हेच फक्त बलस्थान ठरते कारण नंतर अपूर्ण वाटते काहीतरी असे वाटते कि कवीला पोस्टायची घाई असावी बहुतेक कारण काहीहि संदर्भ लागत नाही पहिल्या चार ओळींशी.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 10/06/2015 - 20:42
नवीन
छान आहे. Alexander विषयी आहे का?
- Log in or register to post comments