Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इसीस मध्ये भारतीयांचा सहभाग

त
तुडतुडी
गुरुवार, 10/08/2015 - 12:10
🗣 120 प्रतिसाद
गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती . online जगतात तरुणांना भुरळ घालून त्यांना इसीसकडे आकर्षित करण्याचं हिचं मुख्य काम होतं .तिला अबुधाबीत कुटुंबासह अटक करून भारताकडे सोपवण्यात आलंय .भारतातील ३० पेक्षा अधिक तरुण इसीस मध्ये सामील होण्यासाठी आपल्या संपर्कात होते असं तिने चौकशीत दिलेल्या कबुलीत म्हणलं आहे .तिने 'इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनीटी फ्रेंडली डीस्कशन ' नावाचा फेसबुक ग्रुप तयार केला होता आणि त्याला फोलो करणाऱ्यांची एकूण संख्या ५० हजार होती . हे account बंद करण्यात आलंय . ज्या दिवशी तिने हि कबुली दिली त्याच दिवशी अजून चार तरुणांना दुबीतून परत पाठवण्यात आलं होतं . तिच्या रूपाने इसीसमधील एका भारतीय महिलेचा सहभाग उघड झाला . अश्या अजूनही भारतीय मुली असण्याची शक्यता नाकारता येत नाही . संपूर्ण जग 'इस्लामिक स्टेट 'बनवून आपल्या कायद्यानुसार जगणारा समाज निर्माण करण्यासाठी ,मुस्लिम तरुणींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे . त्यांच्यात सामील होण्यासाठी आलेल्या महिला आणि मुलींची उत्तम बडदास्त ठेवली जाते . सर्व सोयी सुविधा फुकटात पुरवल्या जातात .त्यांना कोणतीही कमी करण्यास सांगितलं जात नाही. तरुणांना भुरळ घालून इसीस मध्ये आणण्यासाठी आणि दहशतवादी वृत्ती असलेली नवीन पिढी जन्माला घालण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत . असंच काम करणाऱ्या दुसऱ्या इसमाचं नाव आहे सलमान मोइउद्दिन . ३२ वर्षांचा इंजिनिअर असलेला हा तरुण काही वर्षे नोकरी करत होता . US return होता . हैद्राबादी असलेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा US मध्ये नोकरी करण्यासाठी निघाला होता . खरं तर तो दुबईला जाणार होता . घरच्यांशी खोटं बोलून . तिथे जावून तो इसीस चं काम करणार होता . त्याचे अनेक महिन्यांपासून इसीस मध्ये सामील होण्याचे प्रयत्न चालू होते . त्यामुळे तो दुबईला जाणार होता . पण त्याला विमानतळावारच अटक करण्यात आली . चौकशी मध्ये त्याच्याकडून इतर अनेक लोकांची माहिती आणि पत्ते उघड झाले आहेत . 'अल्लाहसाठी काम करायला या . जन्नतमध्ये जायला हवं असेल तर इसीस मध्ये या ' अश्या भावनिक आवाहन करणाऱ्या भूलथापांना बळी पडून तरुण तरुणी संघटनेत सामील होत आहेत . भारतीय मुस्लिमांचा त्यात सहभाग योग्य आहे का ?भारतीय सुरक्षा यंत्रणांना सोशल मिडीयावर वॉच ठेवणं , अंतर्गत सुरक्षा सांभाळणं हि महत्वाची कामे करावी लागणार आहेत . त्यांची जबाबदारी वाढली आहे . पण सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का ? जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील .
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
26100 वाचन

💬 प्रतिसाद (120)
द
द-बाहुबली गुरुवार, 10/08/2015 - 13:30 नवीन
टु बी होणेस्ट प्रीटीन वा टीन एज मधे ज्यावेळी धर्म या गोष्टीची मानवी जिवनातील डेप्थ (खोली /व्याप्ती.. स्थान न्हवे) माहीत न्हवती तेंव्हा मलाही वाटायचे मला एखादी ख्रिश्चन वा मुस्लीम गर्लफ्रेंड अस्ती तर बरे झाले असते... समथींग डिफरंट इन लाइफ... नथिंग एल्स. अँड कमॉन व्हाट इज व्रॉन्ग इन लव ऑर फिलींग लव्ड ? अर्थात तो काळच तसा असतो. आणी या वा इतर कोणत्याही कारणाने माझ्यासारखे असे इतर अनेकांनाही ( अगदीच प्रत्येकाला नाही पण बरेच) असेच वाटुन गेले असणेही अगदीच शक्य आहे... तेंव्हा हे असे वाटुन गेलेल्यांची संख्या नक्किच जास्त असावी, जे नैसर्गीकच आहे. पण जसा मी मुलगा आहे. तसेच आपल्या समाजात आपल्याच समाज्यातल्या मुलीही राहतात व ज्या मुली आहेत त्यांनाही असे काही आकर्षण कुल वाटुन जाणेही विशीश्ट वयात तितकेच नैसर्गीक. अशा आकर्षणात चुकीचे ते काय म्हणनार, का तो फक्त पुरुषांचा अधिकार ठरतो ? पण अशा या अविकसीत भावनांचा जेंव्हा प्रेम-धर्मयुध्दासाठी वा धर्मयुध्दासाठी वापर घडत असेल तर ती नक्किच चिंताजनक बाब ठरते कारण की असे घडन्याचे वय वा तशी कृत्ये करताना आपण कीती वल्नरेबल असतो हे फक्त काळ आणी काळच आपल्याला सामजावु शकतो... तेंव्हा हो सामान्य भारतीय नागरिक म्हणून मला अशा प्रकाराची चिंता वाटते. यावर उपाय काय हे जाणकारच सांगु शकतात.
भ
भीमराव गुरुवार, 10/08/2015 - 13:34 नवीन
डोंगरदरीमधी एक गाव होतं. गाव भारी इरसाल नमुन्यांच, त्यात दोनचार धर्माची लोकं एकोप्यानं राहात होती. यांची त्यांची पोरं एकमेकांनमधी मिसळुन खेळायची बागडायची. मोठयालोकांमधी पन तुझमाझं कधीच नवतं. ह्यानच्या जत्रला ती त्यांनच्या ऊरसाला ही, गणपती, ईद, नवरात्र सगळे सण मिळुन साजरे व्हायचे. एकदा गावदेवाच्या मंदीराचा कळस बसवला गेला सव्वा महीना मांसाहार वर्ज होता, त्या वर्षी बकरी ईदला सुदा गावात बकरं पडलं नाही, एकंदर सगळ काही निट नेटकं होतं. पन एक दिवस अचानक काही तरी झालं एकत्र खेळनारी पोरं हातात दगड धोंडे पारी हाथोडे घेऊन गावात चावताळल्यागत फिरु लागली. त्यांची घरं पाडली, गंजी पेटवुन दिल्या, घरावर दगडफेक केली, सारा जमाव त्यांच्या प्रार्थना स्थळाकडे गेला. पाडापाडी एकवेळ चालली असती पन त्या स्थळी पोरांनी नको नको ती घाण केली. अंगातला राग त्वेष भिंतींवर काढुन पोरं आपापल्या घरी गेली. गाव आता गाव नाही राहीलं. यांचा दबाव खुप होता त्यामुळे केस नाही झाली. त्या लोकांनी गावतली घरे वापरायची सोडुन दिली. व आपल्या प्रार्थना स्थळाजवळ सगळे राहु लागले. त्यांचा प्रश्न एकच होता, तुमी अमी रोज बसन्या ऊठन्यातले, ठीक आहे पोरं अजान आहेत, पन मग मोठ्या मानसांनी त्यांना का नाही आडवले? जे काही झालं ते करण्यात आमचा काही हात नवता, आमी तर तुमच्यातलेच, मग याचा राग आमच्यावर का काढला गेला? गावातलं ते एकोप्याचं वातावरण नाही राहीलं. मनावर बसलेले घाव अजुन नाही भरले. यांना वेळीच आधार हवा नाहीतर ही आढी पिढयान पिढयाची. एका सत्य घटनेची कथा. तुडतुडी, आपल्या लोकांना आपन आपलं नाही म्हटलं ना तर ते बाहेरच्या लोकांमधे आपलेपना शोधतात.
ब
बाप्पू गुरुवार, 10/08/2015 - 14:46 नवीन
तुडतुडी, आपल्या लोकांना आपन आपलं नाही म्हटलं ना तर ते बाहेरच्या लोकांमधे आपलेपना शोधतात.
बाबुदादा.... प्रचंड असहमत. या लोक्कांना कितीही आपले म्हणाले तरी त्यांनी पण आपल्याला "आपले" म्हणायला हवे. मुळातच यांचे आपलेपणा ठरवण्याचे क्रैटेरिया फारच वेगळे आहेत. आणि यांना आपल्यापेक्षा काय कमी मिळते इथे? ज्यामुळे त्यांना अश्या संघटना मध्ये भरती होण्याची गरज वाटते ? वर तुडतुडी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे सर्व लोक हे उच्चशिक्षित आहेत. मग थोडा विचार करा, कि जर उच्चशिक्षित मुस्लिम हे पाउल उचलत असतील तर, अशिक्षित किंवा कमी शिकलेला मुस्लिम समाजाला किती सोप्या पद्धतीने जिहाद च्या मार्गावर आणले जाऊ शकते अश्या घटना थांबव्ण्य्साठी आपण (टु बी मोअर स्पेसिफिक - नॉन मुस्लिम) काहीच करू शकत नाही. या घटना थांबवण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, शिक्षणसंस्था (सोप्या भाषेत मदरशे ), मुस्लिम धर्मसंस्था, चित्रविचित्र फतवे काढणारे लोक, मुस्लिम सार्वजनिक मंडळे, मुस्लिम राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन धर्मसंशोधन समाजप्रबोधन, आणि मुस्लिम धर्मातील कालबाय्ह आणि वाईट तत्वे रद्दबातल करून, चांगल्या तत्वांचा प्रसार करण्याची गरज आहे. हे ज्या दिवशी होईल तेव्हाच हे सगळे आपोआप थांबेल. परंतु हे कधीच होणार नाही, किंबहुना ते शक्यच नाहीये. याउलट जग लवकरच यांच्या अल्लाह, खालीफाचे राज्य, जिहाद आणि जन्नत च्या हव्यासापोटी तिसर्या महायुद्धाला सामोरे जाइल.
↩ प्रतिसाद: भीमराव
द
दत्ता जोशी Fri, 10/09/2015 - 14:57 नवीन
अगदी आरस्पानी वगैरे.
↩ प्रतिसाद: भीमराव
त
तुडतुडी गुरुवार, 10/08/2015 - 13:52 नवीन
पण अशा या अविकसीत भावनांचा जेंव्हा प्रेम-धर्मयुध्दासाठी वा धर्मयुध्दासाठी वापर घडत असेल तर ती नक्किच चिंताजनक बाब ठरते कारण की असे घडन्याचे वय वा तशी कृत्ये करताना आपण कीती वल्नरेबल असतो
एकाचं वय ३२ , दुसऱ्याचं ३७ . आजपर्यंत ज्यांना अटक करण्यात आलीये सगळ्यांची वय २५ च्या वर आहेत .
लोकांना आपन आपलं नाही म्हटलं ना तर ते बाहेरच्या लोकांमधे आपलेपना शोधतात.
आपलं म्हणायचं म्हणजे नक्की काय करायचं ?
द
दत्ता जोशी Fri, 10/09/2015 - 15:19 नवीन
आपलं म्हणायचं म्हणजे नक्की काय करायचं ? कसले कसले प्रश्न विचारता हो तुम्ही..! इतका कसं कळत नाही?
↩ प्रतिसाद: तुडतुडी
फ
फुलथ्रॉटल जिनियस गुरुवार, 10/08/2015 - 13:56 नवीन
इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे पाप आहे हे सर्वप्रथम मुस्लिमांनी सम्जून घेतले पाहीजे,जसे तालिबानला मोठे करुन आपली पोळी भाजून अंकल सॅम नामानिराळे राहिले ,तसेच इसिसचे देखील होणार आहे.इसिसचा इस्लामच्या उदात्त आणि मानवतावादी तत्वांशी कोणताही संबंध नाही.पवित्र कुराण ए शरीफला मानणार्यांनी अश्या गैर ईस्लामी व दहशतवादी संघटनेला विरोधच करायला हवा. इन्शाह अल्ला!
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 06:41 नवीन
कधी नव्हे ते आज मुद्द्याचे बोल्लात :)
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
अ
अस्वस्थामा Fri, 10/09/2015 - 14:15 नवीन
लगोलग सत्कार करुन टाका जेपीस सांगून.. परत कधी संधी मिळेल कै म्हैत. ;)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हुप्प्या Fri, 10/09/2015 - 14:52 नवीन
>>इसिसचा इस्लामच्या उदात्त आणि मानवतावादी तत्वांशी कोणताही संबंध नाही. आयसिस ही कडव्या वहाबी वृत्तीच्या अरबभाषक लोकांनी बनवलेली संस्था आहे. त्यांच्या ध्वजावर ला इलाह इल्लिलाह आणि खाली महम्मद रसुलउल्लाह अशी वाक्ये आहेत जी मुस्लिम लोक शिरोधार्य मानतात. आता ते जे करतात ते इस्लामच्या मानवतावादी आणि उदात्त तत्त्वांशी संबंधित नाही असे प्रमाणपत्र देणारे आपण कोण ढुढ्ढाचार्य? आपला इस्लामचा, कुराणाचा कितपत अभ्यास आहे? की केवळ ऐकायला बरे वाटते म्हणून हे आयसिस गैर इस्लामी असल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकलेत? माझ्या माहितीनुसार कुराणात पुरेशी संदिग्धता आहे आणि ती वापरून त्याचा हवा तो सोयिस्कर अर्थ लावणे शक्य आहे. आणि तेच आयसिस करत आहे. असे घडत असताना पुन्हा पुन्हा दिसत असताना प्रत्येक वेळी ते इस्लामी नाहीच म्हणून हात झटकण्याचा प्रकार रटाळ, निरर्थक आणि अविश्वसनीय होत चालला आहे.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
फ
फुलथ्रॉटल जिनियस Fri, 10/09/2015 - 17:50 नवीन
@हुप्प्या ,आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि अरब जगताचे अभ्यासक आहात काय?, मुस्लिम धर्माची प्रतिकं वापरुन त्या धर्माला सहज बदनाम करता येते, नथुराम गोडसे सुंता करुन आणि दाढी वाढवून गांधीहत्या करायला कशासाठी गेला होता? मुस्लिमांना बद्नाम करण्यासाठीच ना? तसेच आहे हे आयसिसचे
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Sat, 10/10/2015 - 06:46 नवीन
माझा अरबी जगताचा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे. एक म्हणजे नथुरामने सुंता केली दाढी वाढवली ह्या आख्यायिका बिनबुडाच्या आहेत. त्याने गांधीना मारले ह्याचे स्वच्छ स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यात तो मुसलमान असल्याचा सुतराम दावा नाही. पण मूळ मुद्दा तो नाही आहे. बिनलादेन वा जवाहिरी सारखे महाभाग हे कितीही वाईट वागले तरी त्यांची इस्लामवरील निष्ठा अपार होती असे त्यांच्या वागण्यातून दिसते. जन्मभर धर्माची साधना करणारे, कुराण तोंडपाठ असणारे, अस्खलित अरबी बोलणारे हे लोक कुराण समजू शकत नसतील मात्र भारतातले ढुढ्ढाचार्य मात्र तो अर्थ जाणतात हे का बरे खरे मानायचे? ते केवळ आपल्याला रुचते म्हणून? उलटा विचार करुन बघा, भारतातील तथाकथित जाणकारांना इस्लाम हा हिंस्र आहे, कुराणातील वा हदिसातील काही आयते ही अत्यंत घातक आहेत असे ते म्हणू शकतील का? तसे केले तर त्यांना मुस्लिम आणि हिंदू दोघांच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही का? आयसिस ही मुस्लिम लोकांना बदनाम करण्यासाठी बनवलेली संघटना आहे? काय वाट्टेल ते! कुठला पुरावा ह्याचा ? उलटे पुरावे भरपूर आहेत. त्यांच्या विविध अधिकार्‍यांची विविध माध्यमातून केलेली विधाने ही सगळी ते कट्टर निष्ठावान इस्लामी असल्याचे दाखवतात. सलाफी, वहाबी असले पंथ अनेक शतके असल्या हिंसक विचारांचा प्रचार करत आहेत. सद्दाम उलथल्यामुळे त्यांना एक हक्काचे मैदान मिळाले इतकेच. माझ्या मते दुसरी शक्यता आहे. सौम्य प्रकृतीचे मुस्लिम लोक कुराणातील जहाल आयतांकडे दुर्लक्ष करतात. कडवे हिंसक धर्मांध मुस्लिम लोक अशा आयतांकडे जास्त लक्ष देतात आणि म्हणून हा फरक होत असावा. पण असे काही कुराणात नाहीच असे ठोकून सांगणे ढोंगीपणाचे वाटते. एक नास्तिक ह्या नात्याने १४०० वर्षे जुना ग्रंथ हा अत्यंत काटेकोर आणि आदर्शवत असेल आणि त्यात कुठलेही व्यंग विसंगती नसेल असे मानणे आततायीपणाचे वाटते. आणि हे कुठल्याही ग्रंथाला लागू आहे. बायबल, गीता आणि वेदही.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
फ
फुलथ्रॉटल जिनियस Sat, 10/10/2015 - 08:16 नवीन
कुराणमध्ये जहाल आयते आहेत? आपल्याकडे काही पुरावा आहे का? कुराणमध्ये जहाल शिक्षा जरुर आहेत, पण त्या ईस्लामची मानवतावादी व आदर्श नैतिक तत्वे न मानणार्यांसाठीच! .
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ब
बॅटमॅन Sat, 10/10/2015 - 12:25 नवीन
जहाल आयते आहेत ना. मासल्यादाखल हे उदा. बघा. सूरा क्र. २, आयत क्र. १९१ ते १९३. सूरा क्र. ३, आयत क्र. ५६. सूरा क्र. ३, आयत क्र. १५१. सूरा क्र. ४, आयत क्र. ९५. सूरा क्र. ५, आयत क्र. ३३. सूरा क्र. ८, आयत क्र. १२. सूरा क्र. ८, आयत क्र. ३९. ही थोडीशीच उदाहरणे आहेत. टोटल १०९ श्लोक तरी तशा थाटाचे आहेत. अधिक माहितीकरिता इथे पहा जीनियस साहेब. http://www.thereligionofpeace.com/quran/023-violence.htm
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/12/2015 - 03:24 नवीन
ब्याट्या असा डायरेक्ट पठाणी सलवारीला हात नै घालायचा रे. फुलथ्रॉटल स्पीडमधे सुटला तर?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अस्वस्थामा Mon, 10/12/2015 - 12:41 नवीन
वाल्गुदेया.. हे घे.. __/\__ .. आता फुजिने प्रतिवाद करावा अन्यथा इतरांना "फुजि उत्तर द्या" मोहिम सुरु करावी लागेल.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
D
dadadarekar Mon, 10/12/2015 - 13:42 नवीन
Quran (3:56) - "As to those who reject faith, I will punish them with terrible agony in this world and in the Hereafter, nor will they have anyone to help." जो माझ्यावर विश्वास ठेवत नाही त्याला मी नरकात ढकलतो.... सनातनवाले , गीता , ब्रह्माकुमारीवाले इ इ हेच व्व्गळ्या शब्दात सांगत असतात. बाकीचेही श्लोक विषादात असलेल्या मरगळलेल्या अर्जुनाला लढाईला उभे करावे त्या प्रकारातील वाटतात. ते दोन चार दिवसापुर्वी मिपावर एक लेख होता ... गेस्टॉल्ट का काय ... तसं आहे हे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 10/12/2015 - 14:05 नवीन
किंवा मग नेहमीचे आवरण तरी ओढून घेतलेय.
"As to those who reject faith, I will punish them with terrible agony in this world and in the Hereafter, nor will they have anyone to help."
त्या वरच्या वाक्यातले अधोरेखित शब्द वाचू नयेत असा आदेश आलाय बहुधा आपल्याला. बाकी
The Quran: Quran (2:191-193) - "And kill them wherever you find them, and turn them out from where they have turned you out. And Al-Fitnah [disbelief or unrest] is worse than killing... but if they desist, then lo! Allah is forgiving and merciful.
हे शांततावादी आहे का? असल्यास दोन प्रश्नः १. तुही यत्ता कंची? २. तुहा ब्रँड कंचा?
↩ प्रतिसाद: dadadarekar
ख
खटपट्या Tue, 10/13/2015 - 06:07 नवीन
धन्यवाद बॅटमॅन. हे असं तोंडावर मारावेच लागते या लोकांच्या...
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
काळा पहाड Mon, 10/12/2015 - 19:49 नवीन
कुराणः 9:5. Then when the Sacred Months (the 1st, 7th, 11th, and 12th months of the Islamic calendar) have passed, then kill the Mushrikun {unbelievers} wherever you find them, and capture them and besiege them, and prepare for them each and every ambush. But if they repent and perform As-Salat (Iqamat-as-Salat {the Islamic ritual prayers}), and give Zakat {alms}, then leave their way free. Verily, Allah is Oft-Forgiving, Most Merciful. 8:67. It is not for a Prophet that he should have prisoners of war (and free them with ransom) until he had made a great slaughter (among his enemies) in the land. You desire the good of this world (i.e. the money of ransom for freeing the captives), but Allah desires (for you) the Hereafter. And Allah is All-Mighty, All-Wise. 9:29. Fight against those who believe not in Allah, nor in the Last Day, nor forbid that which has been forbidden by Allah and His Messenger and those who acknowledge not the religion of truth (i.e. Islam) among the people of the Scripture (Jews and Christians), until they pay the Jizya with willing submission, and feel themselves subdued. 9:33. It is He {Allah} Who has sent His Messenger (Muhammad) with guidance and the religion of truth (Islam), to make it superior over all religions even though the Mushrikun (polytheists, pagans, idolaters, disbelievers in the Oneness of Allah) hate (it). सिरा: Sira, p367: Then he {Kab bin al-Ashraf} composed amatory verses of an insulting nature about the Muslim women. The Apostle said: “Who will rid me of Ibnul-Ashraf?” Muhammad bin Maslama, brother of the Bani Abdu’l-Ashhal, said, “I will deal with him for you, O Apostle of God, I will kill him.” He said, “Do so if you can.” “All that is incumbent upon you is that you should try” {said the Prophet to Muhammad bin Maslama}. He said, “O Apostle of God, we shall have to tell lies.” He {the Prophet} answered, “Say what you like, for you are free in the matter.”Volume 4, Book 52, Number 270; Narrated Jabir bin ‘Abdullah: The Prophet said, “Who is ready to kill Kab bin Al-Ashraf who has really hurt Allah and His Apostle?” Muhammad bin Maslama said, “O Allah’s Apostle! Do you like me to kill him?” He replied in the affirmative. So, Muhammad bin Maslama went to him (i.e. Kab) and said, “This person (i.e. the Prophet) has put us to task and asked us for charity.” Kab replied, “By Allah, you will get tired of him.” Muhammad said to him, “We have followed him, so we dislike to leave him till we see the end of his affair.” Muhammad bin Maslama went on talking to him in this way till he got the chance to kill him. Sira, p368: Kab bin Malik said: Of them Kab was left prostrate there (After his fall {the Jewish tribe of} al-Nadir were brought low). Sword in hand we cut him down By Muhammad’s order when he sent secretly by night Kab’s brother to go to Kab. He beguiled him and brought him down with guile Mahmud was trustworthy, bold. Sira, p463-4: Then they {the tribe of Quraiza} surrendered, and the apostle confined them in Medina in the quarter of d. al-Harith, a woman of Bani al-Najjar. Then the apostle went out to the market of Medina and dug trenches in it. Then he sent for them and struck off their heads in those trenches as they were brought out to him in batches. Among them was the enemy of Allah Huyayy bin Akhtab and Kab bin Asad their chief. There were 600 or 700 in all, though some put the figure as high as 800 or 900. As they were being taken out in batches to the Apostle they asked Kab what he thought would be done with them. He replied, “Will you never understand? Don’t you see that the summoner never stops and those who are taken away do not return? By Allah it is death!” This went on until the Apostle made an end of them. Sira, p515: Kinana bin al-Rabi, who had the custody of the treasure of Bani al-Nadir, was brought to the Apostle who asked him about it. He denied that he knew where it was. A Jew came to the Apostle and said that he had seen Kinana going round a certain ruin every morning early. When the Apostle said to Kinana, “Do you know that if we find you have it I shall kill you?” he said, Yes. The Apostle gave orders that the ruin was to be excavated and some of the treasure was found. When he asked him about the rest he refused to produce it, so the Apostle gave orders to al-Zubayr bin al-Awwam, “Torture him until you extract what he has,” so he kindled a fire with flint and steel on his chest until he was nearly dead. Then the Apostle delivered him to Muhammad bin Maslama and he struck off his head, in revenge for his brother Mahmud. हवं असेल तर पुढं चालू ठेवतो. ठेवू?
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
त
तर्राट जोकर Mon, 10/12/2015 - 19:51 नवीन
आता मनुस्मृतीचेही दाखले द्या की दोन चार....
↩ प्रतिसाद: काळा पहाड
D
dadadarekar Mon, 10/12/2015 - 19:58 नवीन
शत्रूला साम दाम दंड भेदाने संपवावे हे तर महाभारतात आणि चाणक्य नीतीतही आहे . त्याना का हिंस्त्र म्हणत नाही ? आपल्या तो बाब्या ... ?
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 10/12/2015 - 20:01 नवीन
तसंच समजा. बाकी गुजरात बद्दल कशाला बोंबलत असता सतत मग?
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
सुबोध खरे Tue, 10/13/2015 - 05:31 नवीन
ओ हितेसराव महाभारतात आणि चाणक्य नीतीत "शत्रूला" संपवावे आहे. संबंध नसलेल्या व्यक्तीला किंवा त्रयस्थ माणसाला नव्हे. आणी कुरणात जो इस्लामला मानत नाही तो आपोआप शत्रू मानला गेला आहे आणी त्याला ठार मारा असे सांगितले आहे मग त्याचा तुमचा संबंध आहे अथवा नाही. समर्थन लंगडंच केलं पाहिजे असा तुमचा शिरस्ता दिसतो. अभ्यास वाढवा.
↩ प्रतिसाद: dadadarekar
ग
गामा पैलवान Sat, 10/10/2015 - 09:19 नवीन
हुप्प्या, इस्लाम हिंस्त्र असल्याचं तुमचं निरीक्षण अचूक आहे. भारताचा आणि उर्वरित जगाचा इस्लामशी आलेला संबंध कमालीचा रक्तरंजित आहे. भारतातल्या हिंदूंना अभ्यास केल्याविना इस्लामला शांतीचं प्रमाणपत्र द्यायला आवडतं. प्रेषितांच्या नंतर जे चार खलिफे झाले त्यापैकी पहिला खलिफा अबू बकर वगळता बाकीचे तीन तलवारीस बळी पडले. जरा कुठे मतभेद झाले की तलवार उपसायची असते. यावरून जे कळायला पाहिजे ते कळून येतं. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: हुप्प्या
D
dadadarekar Sat, 10/10/2015 - 09:31 नवीन
अरे वा ! तलवारीला बळी पडला की प्रायोपवेशनाने मेला यावर व्यक्तीचा किंवा धर्माचा मोठेपणा ठरतो की काय ! ज्ञानात भर टाकलीत.धन्य्वाद
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/12/2015 - 03:28 नवीन
दरेकर तुम्ही डॉक्टर आहात ना? मग मला आत्महत्त्या आणि हत्त्या मधला फरक सांगा बघु? पटलं नाही म्हणुन थेट तलवारीला हात घालणारा धर्म (मेजॉरिटी पब्लिक इफ नॉट ऑल) सहिष्णु असु शकतो का?
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Mon, 10/12/2015 - 03:37 नवीन
तलवार न घेणारा व दुसर्‍या कोणत्या तरी कारणाने मरणाराही हिंस्त्र , खुनशी असू शकतो. मला हे सांगायचे होते.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ग
गामा पैलवान Mon, 10/12/2015 - 13:36 नवीन
दादा दरेकर, केव्हा ना केव्हा सगळेच मरणार आहेत. मग सगळेच हिंसक झाले का? आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: dadadarekar
ध
धनावडे Mon, 10/12/2015 - 17:08 नवीन
दरेकर दिवसभर फेकाफेकी करुन तुम्हाला झोप बरी येते
↩ प्रतिसाद: dadadarekar
द
दत्ता जोशी Fri, 10/09/2015 - 15:13 नवीन
"इसिस हे अमेरिका आणि इज्राईलचे पाप आहे हे सर्वप्रथम मुस्लिमांनी सम्जून घेतले पाहीजे" तरीच तरीच. नाहीतर कशाला ..... इसिसचा इस्लामच्या उदात्त आणि मानवतावादी तत्वांशी कोणताही संबंध नाही. ते तर म्हणतात कि फक्त तेच खरा इस्लाम जाणतात आणि जगतात. आणि ज्यांना तसा जगायचं त्यांनी एकत्र यावे. इस्लामची सेवा करावी आणि जन्नत मिळवावी . जेणेकरून जगावर उदात्त आणि मानवतावादी लोकांचे राज्य येईल. अरे..! अमेरिका आणि इस्रायेल.... विसरलोच कि!!
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 14:03 नवीन
वरील लेख बहुतांश वर्तमानपत्रीय बातमीसदृश्य आहे. तुमचे स्वतःचे काय मत असेल तर मांडा. चर्चा करायला बरं पडेल. म्हनजे निदान कारणं मांडलीत तर उपाय सापडतील... हवेत तीर चालवून काथ्याकूटाचं खळं होइल...
भ
भीमराव गुरुवार, 10/08/2015 - 14:10 नवीन
तुमच्या सोयीनं वेळ भेटला त विचार करा एखाद्याला आपलं म्हणनं याचा मराठी अर्थ काय ते. आमी एकतर नवीन त्यात लहान, तुम्हा मोठ्या लोकांना या पेक्षा जास्त काय सांगनार?
ज
जेपी गुरुवार, 10/08/2015 - 14:23 नवीन
शंभर पक्के ..कस सुचत कस ..
द
दत्ता जोशी Fri, 10/09/2015 - 15:22 नवीन
टाइम पास ला बरं हाय कि.
↩ प्रतिसाद: जेपी
D
dadadarekar Fri, 10/09/2015 - 03:55 नवीन
भारत पाकिस्तान एकत्र हिंदुराष्ट्र व्हावे असे म्हणणारा गोडसे हिरो ठरतो. दुसर्‍या धर्माच्या व्यक्तीने हेच स्वप्न पाहिले तर तो मात्र क्रिमिनल !
ख
खटपट्या Fri, 10/09/2015 - 05:39 नवीन
काडी क्र. १
↩ प्रतिसाद: dadadarekar
न
नाखु Fri, 10/09/2015 - 05:58 नवीन
विषयात काही माहीती नाही. पण मिपावर instigator disfigured Satanic

ईडीस

डास आहे आणि त्याने डेंग्यू होऊ शकतो तेव्हा
"गप्पी" मासे पाळा आणि हि(र)वाताप टाळा
अखिल मिपा हिरवा ताप प्रतीबंध आणि ईडीस डास निर्मूलन समीतीचा संयुक्त, मिपा वाचक जागर.
↩ प्रतिसाद: खटपट्या
द
दत्ता जोशी Fri, 10/09/2015 - 15:15 नवीन
कधी जॉईन करताय ?
↩ प्रतिसाद: dadadarekar
अ
अजया Fri, 10/09/2015 - 05:44 नवीन
=))शंभर मोजायच्या का?
त
तुडतुडी Fri, 10/09/2015 - 09:09 नवीन
आपली कृत्यं 'आपलं' म्हणण्यासारखी असली कि कुणाची टाप आहे 'आपलं' न मानण्याची ?.भारताशिवाय जगातल्या कुठल्याही देशात अप्ल्पसंख्यांक इतके सुरक्षित नाहीत . पण तेच काहीतरी टुकार उद्योग करून स्वतःला असुरक्षित करून घेतात . तेव्हा त्यांनी आपलं वर्तन सुधारणं आवश्यक आहे
वरील लेख बहुतांश वर्तमानपत्रीय बातमीसदृश्य आहे. म्हनजे निदान कारणं मांडलीत तर उपाय सापडतील
लेखाच्या सुरवातीलाच म्हटलं आहे बातमी वाचण्यात आली . त्या बातमीचा आधार घेवून लेख लिहिला आहे . तो बातमीसदृश्य आहे मुद्दा गौण आहे . लेखातला मुद्दा ध्यानात घ्या . कारणं स्पष्ट आहेत . खलिफाचं राज्य हवं , आमच्या धर्माचं राज्य हवं . आमचा सगळ्यांवर वचक हवा हा हव्यास .मुल्ला मौलवी स्वार्थासाठी धर्मांधता पसरवतात त्याला खरं मानून चालणं .बाप्पू नी म्हटल्याप्रमाणे इतके उच्चशिक्षित लोक सुधा 'इतरांना मारलं तर जन्नत मध्ये जाल' ह्यावर विश्वास ठेवतात ? सांगितली कारणं . आता उपायांवर बोला .
D
dadadarekar Fri, 10/09/2015 - 13:52 नवीन
हिंदूनी मुसलमानांविरुद्ध लढू नये. हिंदूनी गरीबीविरुद्ध लढावे.
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ब
बाप्पू Fri, 10/09/2015 - 14:18 नवीन
साहेब . नरेंद्र मोदी यांनी जो उपाय संगितलय तो भारताच्या प्रगती साठी आहे. आइसिस किंवा दहशतवाद थांबवण्यासाठी नाहीए. आणि फक्त हिंदूंनी गरीबी विरुद्ध लाढून हे जिहाद आणि दहशतवादाचे कारखाने कसे थांबतील ब्वा ? "ज्या ठिकाणी किड लागली आहे तिथेच औषध मारले पाहिजे. ज्या ठिकाणी घाण आहे तिथेच सफाई केली पाहिजे. "
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Fri, 10/09/2015 - 14:32 नवीन
आठशे वर्षापासून तुमचे नेते बोंबाच हाणताहेत. पण गनिम संपलाच नाही. आता तुम्ही प्रयत्न करा.
↩ प्रतिसाद: बाप्पू
द
दत्ता जोशी Fri, 10/09/2015 - 15:16 नवीन
किंवा उलटं..!
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Sat, 10/10/2015 - 12:07 नवीन
१९४७ ला गनिम ४० % होते... फाळणी होऊन एक मोठा भाग आपसूक वजा झाला अन मग हे राष्ट्र हिंदुराश्ट्र झाले.
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
ख
खटपट्या Sat, 10/10/2015 - 13:30 नवीन
काडी क्र. दोन टाकण्याचा क्षीण प्रयत्न...
↩ प्रतिसाद: dadadarekar
व
विनोद१८ Mon, 10/12/2015 - 19:00 नवीन
अरे, गनिम तर केव्हाच संपला कारण ते होते 'तुर्की, इराणी, अरबी, पठाणी'. आता इथे राहिलेत ते केवळ आणि केवळ 'बाटगे' ????? काय, बरोबर ना नाना ????? नाना, तु इथेच मिपावर एका प्रतिसादात स्वत:ला 'पुर्वाश्रमीचा ब्राम्हण' असे म्हटले होतेस, पण तुझ्या बाबतीत असे काय घडले की तुला धर्मत्याग करावासा वाटला ?? नाही म्हटले तरी मला याबद्दल जरा कुतूहल आहे, म्हणून जाणुन घ्यायला आवडेल.
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Mon, 10/12/2015 - 19:11 नवीन
सुनाउंगा एक दिन. सब्र करो
↩ प्रतिसाद: विनोद१८
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/12/2015 - 19:17 नवीन
लिख्खो, लिख्खो । एक लेख लिख्खो मिया । दिल हलका हो जायेगा । दिल, दिमाग और सेहतके लिये आसान हो जायेगा ।
↩ प्रतिसाद: dadadarekar
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा