एक कविता_व्हॅलेंटाईन डे
प्रपोज केले तुला फालतू
साॅरी म्हणाली मला काल तू
झाले गेले विसरून जातो
रूप तुझे ते चुलीत घाल तू
तुझा ध्यास तो घडीभराचा
मुंडासा बांधला वराचा
वधू ठिकाणी तुला पाहिले
डोळे केले उगा लाल तू
होतो मी प्रेमवीर मानी
प्रेमाची साधना तूफानी
लाजवाब हा नकार देऊन
मनात केलीस उलाढाल तू
होती नव्हती सरली आशा
उठल्या नाकावरच्या माशा
खोट्या साय्रा शपथा घालून
तरसविले मज सालोसाल तू
खरी चूकी माझीच असावी
फसलो तव जालात कसा मी
फिरलो सदैव मागे मागे
जनावरासम तुझ्या पालतू
कवी:चिमू(निवृत्ती)
💬 प्रतिसाद
(3)
च
चांदणे संदीप
गुरुवार, 10/08/2015 - 21:08
नवीन
येकदम नया जमान्याची फेश कविता!
आवडली!
(अवांतर: रॉ मटेरियल! ;) )
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/08/2015 - 21:19
नवीन
ह्या ह्या ह्या! :-D
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 10/08/2015 - 21:31
नवीन
बालदिनाची कविता ८ जानेवारी ला पोस्टणार का?
- Log in or register to post comments