देवाचा 'सुपर कंप्युटर'
सहज अस वाटल,कि देवा जवळ समजा सुपर कॉम्प्यूटर असला तर तो किती बिझी असेल,म्हणजे पहा ना प्रत्येकाच्या पाप अन पुण्यांचे हिशेब ठेवण प्रत्यक्ष देव जरी असला तरी लोकसंख्या इतकी आहे कि त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी सुपर कोम्पूटर असेलच .e.g. या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पुण्य केल आहे त्याला या जन्मात हे सुख द्या या दुसर्या व्यक्तींनी मागच्या जन्मात हे पाप केल होत याला हे दु:ख द्या किती जिकिरीच काम असेल .जर कविता लिहू असे म्हटले तर किती खतरनाक सब्जेक्ट होईल
देवाचा 'सुपर कंप्युटर'
देवाचा हिशेब कसा असेल
मला पडला होता प्रश्न
उत्तर शोधता शोधता उत्तर गवसलं
अन चक्क भेटला वरचा सुपर कम्प्युटर
विचार करा किती त्रासला असेल तो
देवाचा 'सुपर कंप्युटर'
कारण म्हणे हिशेब ठेवण नसते जोक
खास करून अजिबात नाही 'वर'
या व्यक्तीने केल फक्त इतकच पुण्य
याला आता घडवा हा दैवयोग
अन त्या व्यक्तीचे हे पाप
याला आता फक्त योगायोग
यांनी हि सेवा
केली होती त्या वेळेस
म्हणून याचं काम
अडायला नको या वेळेस
बर देवही नसेल पक्का
आपल्याच निर्णयावर
दर वेळेस त्याचीच कमांड फिरते
चित्रगुप्ताच्या कोणत्याही डिसिजनवर
कुणाजवळ उपलब्ध असते
केलेल्या पापांना डिलीटचे ऑप्शन
कुणाला तोही पर्याय नाही
उरते यमाचे फक्त लांच्छन
कधी मी असा विचार करतो कि
मी चित्रगुप्त नाही हे किती बरय
अप्पर व्ह्यू ने ब्रॉड गोष्टी
बघाव्या लागत नाहीत हे किती चांगलय
'हा' म्हणे मागच्या जन्मात
होऊच शकायचा नाही एकाग्र
मग त्याला या जन्मात
बनवा एकदम कुशाग्र
'हिचा' म्हणे मागच्या जन्मात
देवावर नव्हता विश्वास
या जन्मात देवाला
वाटली पाहिजे भक्ती खास
हा होता मागच्या जन्मात
अगदीच जीवन वेस्ट
याला बनवा या जन्मात
अगदी समकक्ष बिल गेट्स
'हा' म्हणे मागच्या जन्मात
होता राजकीय पण अपयशी कार्यकर्ता
याला म्हणे मग या जन्मात
बनवा त्याच पक्षाचा सर्वेसर्वा
मग वेळ आली कि
मीच त्याला थांबवल
म्हटल तुझी आपबिती बस झाली
आता माझ डोक गरगरल
मला भारतीय नोकरशहांची सवय
म्हटल बोल मित्रा काही जमते का?
माझ पाप असेलच हिशेबात
पुण्यात बदलण शक्य वाटते का
मग शेवटी तो म्हटला
म्हणे इथे होत नाहीत कोणतेच काम भ्रष्ट
म्हणे देवाचा पूर्ण वचक आहे
विचारहि करू नका नतद्रष्ट
समीर
💬 प्रतिसाद
(12)
अ
अद्द्या
Sat, 10/10/2015 - 11:32
नवीन
हिशोब ठेवायला सुपर कम्प्युटर .
आणि खाली चित्रगुप्ताचाही उल्लेख आहे . .
बहुदा मीच चुकतोय . . गरगरतय डोकं . .
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 10/10/2015 - 11:37
नवीन
अरे चित्रगुप्त आता पाप-पुण्याच्या नोंदी डायरीत न करता सुपर काँपुटरमध्ये करत असेल. एखादी "प्राणीमात्र पाप पुण्य नोंद प्रणाली" बनवून घेतली असेल स्वर्गात गेलेल्या भारतीय संगणक अभियंत्याकडून.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Sat, 10/10/2015 - 11:40
नवीन
हो सक्त है. कुछ भी हो सकता है .
रच्याकने. .
डेटाबेस आणि सिस्टम मेंटेनन्स साठी माणूस लागेलच न . कुठे अप्लाय करायचं म्हणे
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 10/10/2015 - 11:44
नवीन
ते ऑफशोअरींग करत नसावेत. "ऑनसाईटला" जावे लागेल त्यासाठी. ;)
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Sat, 10/10/2015 - 12:24
नवीन
रिटर्न तिकीट कन्फर्म असेल . तर जायला काही हरकत नाही .
तेवढाच प्रोफ़ाइल मध्ये वाढवता येईल . काय म्हणता !!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/10/2015 - 18:35
नवीन
ते ऑफशोअरिंग परमनंट बेसीसवर असते... दोनचार महिने/वर्षांसाठी नसते. ;)
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 10/10/2015 - 11:43
नवीन
तुझं काम फक्त जोडणी करायचं आहेना तेच कर ना !! उगा सुपर कम्प्युटर मध्ये बघू नकोस बरे. ते आप्ल्या सामान्यांसाठी नैच मुळी.
पाठक भाऊ तुम लढो. हम कपडे संभालते है !!
निरक्षर नाखु
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 10/10/2015 - 11:46
नवीन
हे वाचून मला गीतेचा "तू फक्त तुझे विहीत कर्म कर" हा संदेश आठवला.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 10/10/2015 - 11:53
नवीन
नाही ते यमक प्रसीद्ध "जुळवे" वेगळे
आणि हे जोडणी करणारे वेगळे,हे लाईन टाकातात, मारत नाहीत ते ......
खुलासा संपला.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Sat, 10/10/2015 - 12:27
नवीन
he चुकीचं ए काका .
नव्क्विना प्रोत्साहन द्यायचं दूर राहिलं .
आमच्या सारखा तरुणांना तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांचे अनुभव घेण्यापासून थांबवता आहात .
ये गलत है जी . .हम इसके खिलाफ आवाज उठेंगे . धरना देंगे जंतरमंतर पे
- Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky
Sat, 10/10/2015 - 11:34
नवीन
वाचल्याबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 10/11/2015 - 15:22
नवीन
आवडले. बाकी च्यायला गेल्या वर्षीच चित्रगुप्ताने पुन्हा धक्का देऊन पृथ्वीवर परत पाठविले आणि म्हणाले आता तरी परत जाऊन काही तरी करा खा(?) प्या(?) आणि मजा करून परत या. पाहू काही जमतंय का?
- Log in or register to post comments