दुष्काळ वणवा
पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे,
दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे,
उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना,
तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना,
चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना,
सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना..
विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले,
मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले,
उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले,
भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे...
पुढे वाढवली तरी चालेल..
💬 प्रतिसाद
(3)
च
चांदणे संदीप
Sun, 10/11/2015 - 07:21
नवीन
काव्यरस = रौद्ररस??
लेखनविषय = विनोद?? आणि
"पुढे वाढवली तरी चालेल" हे सोडून कविता चांगली आहे.
Sandy
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 07:29
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
माहीराज
Sun, 10/11/2015 - 07:47
नवीन
धन्यवाद .मी अजून लहान आहे ..नविन आहे या क्षेत्रात ..आपणाकडून शिकतोय.
- Log in or register to post comments