Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विसंगती सदा घडो...

त
तर्राट जोकर
Sun, 10/11/2015 - 19:24
🗣 11 प्रतिसाद
लोकांना आपल्याच वागण्यातली विसंगती कळते का कधी..? दोन अ‍ॅक्टीवास्वार, एक युवती व एक म्हातारे काका वीसफुटी रस्त्याचा डावा अर्धा भाग आवरून गप्पा हाणित उभे.. मी सरळ त्येंच्या अंगावर फोर-वीलर घातली. बाकी रस्ता मोकळा असूनही वळसा घातला नाही. ते हटेपर्यंत शांतपणे कार त्यांच्यासमोर उभी ठेवली. त्यांच्या आरामाच्या गप्पांमधे खंड पाडल्याने माझ्या कडे भयंकर क्रुद्ध नजरेने पाहत होते. जणू मीच मोठ्या गाडीची मस्ती दाखवत होतो. हे आपल्या भारताचे सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय नागरिक, जे जाता-येता 'इस देश का कुच नै हो सकता' आळवत असतात, दुसरे कसे चुकीचे वागतात यावर धीर-गंभीर चर्चा झाडत असतात. रस्त्यातच उभे राहून 'लोक कसे ट्रॅफीकचे नियम पाळत नाहीत' असल्या चर्चा हिरिरीने करत असतील.... असे अनेक आठवतात. रस्त्यावर पिचकार्‍या घालणारे सिग्नल तोडणार्‍याला शिव्या घालतात. गाडीला कट मारणारे हॉर्न वाजवणार्‍याला शिव्या घालतात. फोनवर बोलत ड्रायविंग करणारे अचानक रस्ता क्रॉस करणार्‍याला शिव्या घालतात. अचानक रस्ता क्रॉस करणारे कचरा टाकणार्‍याला शिव्या घालतात. कचरा टाकणारे भरधाव गाड्या हाकणार्‍यांना शिव्या घालतात. भरधाव गाड्या हाकणारे ट्रॅफिक जॅमला शिव्या घालतात. आणी असंच बरंच.... तुम्हाला अजून काही आठवतं का...? किंवा आपणच असं कधी विसंगत वागतो असं जाणवतं का...? आजवर दुसर्‍यांकडे बोट दाखवणे केलंय. आज आपल्या स्वतःकडे बघणार का?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
5433 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ज
जव्हेरगंज Sun, 10/11/2015 - 19:30 नवीन
चांगला विषय आहे. मांडणी योग्य!!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 10/11/2015 - 21:09 नवीन
दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान ... स्वतः मात्र कोरडे पाषाण!
  • Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी Sun, 10/11/2015 - 21:14 नवीन
बिलकुल सही ।
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 10/11/2015 - 21:35 नवीन
मला वाटतं आपण सर्वच लोक कधी ना कधी थोडंफार तरी विसंगत वागत असतो, बोलत असतो. स्वत: आईवडिलांशी तरुणपणी उद्धटपणे वागुन झाल्यानंतर आपली मुलं वयात आली की त्यांना '' मातृ देवो भव, पितृ देवो भव" चे पाठ द्यायला लागणे. किंवा चीझ पिझा खाता खाता डायटिंग वर नॉन स्टॉप बोलणे वगैरे वगैरे....
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 10/11/2015 - 21:37 नवीन
मला वाटतं आपण सर्वच लोक कधी ना कधी थोडंफार तरी विसंगत वागत असतो, बोलत असतो. स्वत: आईवडिलांशी तरुणपणी उद्धटपणे वागुन झाल्यानंतर आपली मुलं वयात आली की त्यांना '' मातृ देवो भव, पितृ देवो भव" चे पाठ द्यायला लागणे. किंवा चीझ पिझा खाता खाता डायटिंग वर नॉन स्टॉप बोलणे वगैरे वगैरे....
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/12/2015 - 03:13 नवीन
हिपोक्रसी इझ इन्सेपरेबल पार्ट ऑफ अ ह्युमन माईंड. बाकी शुक्रवारी संध्याकाळीच एका टुरिस्ट पासिंग इंडिकावाल्याला सिग्नलवर हॉर्न स्पॅम केला आणि नंतर ओव्हरटेक करताना कट मारुन गेला म्हणुन मौल्यवान धडा शिकवलेला आहे. आता परत असं कधी करेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 10/12/2015 - 04:49 नवीन
दुनियाभरचे काळे धंदे करुन देवांना सोन्याच्या पादुका सिंहासन करणारे लोक जाम डोक्यात जातात! पेशंटना नाडून पैसे कमवणारे डाॅक्टर स्वतः आजारी पडून एखाद्या हाॅस्पिटलला अॅडमिट असतात तेव्हा ते हाॅस्पिटल कसे लुटारू आहे हे आपल्याला निर्लज्जपणे सांगतात तेव्हा यांना विसंगतीतला व गिरवायला शिकवावेसे वाटते खरे! आमच्यासमोरचा स्वच्छता अभियानवाला कधीही कचरा गाडीत कचरा टाकत नाही.हातात डबा घेऊन बाहेर येणे त्याला लाजिरवाणे वाटते.मग दुपारी त्यांची कामवाली तो कचरा पुढेच रस्त्यावर फेकते.आता तिथे सर्व लोक कचरा टाकू लागले आहेत.निट मोठा ढिग झालाय.तिथे गोमाता पिशव्या खायला येतात.त्यांना सकाळी हात लावून बरेच जण नमस्कार करत असतात.असो!
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 10/12/2015 - 11:46 नवीन
हेच का ते स्वच्छ भारत अभियान? http://www.loksatta.com/pune-news/no-toll-for-bjp-activist-1149377/
  • Log in or register to post comments
भ
भैड्या Mon, 10/12/2015 - 18:50 नवीन
नाव बदल श्यान्या, धागा झोपलाय तुझा.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 10/12/2015 - 19:01 नवीन
तुला रं का काळजी...? झोपू दे का उठू दे. ज्याला आवडलं तो लाइक करल.. नाही तर गेले चुलीत. तुझं नाव बग की आंदी... जरा कानामात्रा हिकडं तिकडं झालं तर म बोलाय्चं काम न्हाय सांगून ठिवतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भैड्या
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/12/2015 - 19:07 नवीन
शनिवारी रात्री एशियाडने प्रवास करत होतो. बस चालू असतानाच मागच्या सीटवरून एकजण आपल्या दोनेक वर्षांच्या मुलाला घेऊन दरवाजात गेला. दरवाजा बंदच होता. मुलाला तिथेच सूसू करायला लावली. ते सगळं बसमधेच पडलं, अर्थातच. कंडक्टर नव्हता, पण तिथे बसलेले दोघेही ओरडले त्याला तर, 'एवढ्याशा पोराची कसली घाण? आणि मुतून किती असा मुतेल तो? तेवढ्याकरता कशाला उगा बस थांबवून खोळंबा करायचा?' असं शांतपणे बोलून पोराला काखोटीला मारून परत आपल्या जागी जाऊनही बसला तो गडी. हाच गडी एरवी सरकार, पोलीस वगैरेंच्या भ्रष्टाचारावर तावातावाने बोलत नसेलच याची काहीच ग्यारंटी देता येणार नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा