Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाडघर (तामसतीर्थ) आणि गुहागर विषयी माहिती हवी आहे....

अ
अ.रा.
Mon, 10/12/2015 - 07:00
💬 12
नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोकणात फिरायला जायचा विचार आहे. 4 दिवसांचा प्लान आहे. तसे लाडघर मनामध्ये निश्चित केलं आहे. कारण लाडघरला याआधी कधी जाणे झाले नाही. तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलंय का? येथे जवळपास बघण्यासारखे काय काय आहे??? किंवा दापोली परिसरात काय काय बघण्यासारखे आहे? खाजगी वाहनाने प्रवास होणार आहे त्यामुळे हाताशी भरपूर वेळ असणार आहे. पुणे-ताम्हीनी घाट मार्गे-दापोली-लाडघर तिथून पुढे गुहागर आणि तसाच किंवा महाबळेश्वरमार्गे परतीचा मार्ग असणार आहे. समुद्रकिनारी हॉटेल्स वा तत्सम राहण्याची व्यवस्था कशी आहे ? कुठे राहावे? या विषयीचा एखादा जुना धागा असल्यास कळवावे.

प्रतिक्रिया द्या
8087 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मांत्रिक Mon, 10/12/2015 - 09:51 नवीन
दापोली मध्ये चंडिकादेवी मंदिर दाभोळचे अगदी मस्ट आहे बघणं. नाहीतर तुमची दापोली ट्रीप वाया गेली समजा. बाकी मुरुड बीच हे एक सुंदर स्थळ.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 10/12/2015 - 10:06 नवीन
ईकडे बघा. मी स्वतः ४-५ वेळेस राहीलो आहे. उत्तम अनुभव. उत्तम लोकेशन, चांगली स्वछता, चविष्ट शाकाहारी, मांसाहारी जेवण, वाजवी किंमत. केशवराज मंदिर, हर्णै बंदरावर भरणारा मासळीबाजार (सकाळी १०-१२, सायंकाळी ३-५), जवळच असणारे दीपगृह, सुवर्णदुर्ग जरुर बघा. लाडघर ते बुरोंडी समुद्रकिनार्‍यावरुन २-२.५ किमी चालत जायला पण खुप छान वाटतं.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 10/12/2015 - 10:16 नवीन
तर बघण्यासारखे खुप काही आहे इथे १. दापोलि किंवा मुरुड ला मुक्काम करुन हे पहा मुरुड्चे देवी मंदीर आणि बीच्,पन्हाळेकाजी लेणी,सुवर्णदुर्ग किल्ला,हर्णे बंदरचा मासळीबाजार, आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती , पुढे जायचे असल्यास केळशीसुद्धा बघता येइल. एक दिवस सकाळीच आसुदचे केशवराज मंदीर बघा. जंगलातुन एक तास चालत जायला लागते. कर्दे बीचवर मुक्काम करु शकाल किंवा मधे दापोलि कृषी विद्यापीठ बघुन पुढे बीचवर जाउन सागर सावली रिसॉर्ट्ला मुक्काम करु शकाला. तिथुन २० कि.मी. वर श्री परशुराम यांचा पुतळा आहे तो बघा. एक दिवस दाभोळची चंडकाई देवी दर्शन करुन पुढे गाडी बोटीवर चढवता येते आणि पलीकड्च्या किनार्‍यावरुन गुहागरला जाता येइल. गुहागर चा उफराटा गणपती आणि नंतर व्याडेश्वरचे दर्शन घ्या. यातच तुमचे चार दिवस सहज पार पडतील.
  • Log in or register to post comments
भ
भाल्या Mon, 10/12/2015 - 10:50 नवीन
हॉटेल सागर सावली, लाडघर समुद्र किनारी आहे … बहुतेक वेळा फुल असते जेवण , मांसाहारी आणि शाकाहारी छान आहे . फिरण्यासाठी : आसूद : श्री केशवराज मंदिर , चुकवू नका , इथे जाताना अनेक घरातून नास्ता , जेवण मिळते , मंदिरात जाताना सांगून जावे आणि येताना आस्वाद घ्यावा . अनेक कोकणी घरगुती उत्पादने इथे मिळतात . आम्ही घेतलेला, हापूस जाम खूपच छान होता . कर्दे : मासळी बाजार , सकाळी आणि संध्याकाळी बंदरां वरती भरतो . कर्दे लाईट हाउस , सभोवतालचा समुद्र वरतून बघायचा असेल तर . परशुराम भूमी , लाडघर . कड्यावरचा गणपती , आंजर्ले गणपती मंदिरासमोर जी लहान दुकाने आहेत , तिथे सोलकढी छान मिळाली होती . आम्ही डिसेंबर १५ ला गेलो खेड मार्गे दापोली , मुबई गोवा , रस्ता चांगला आहे. ताम्हिणी, महाड, दापोली, रस्ता खराब आहे.
  • Log in or register to post comments
स
सन्जय गन्धे Mon, 10/12/2015 - 13:53 नवीन
दापोली कृषि विद्यापीठ मधील कॅंटीन चे जेवण पण चांगले आहे. आणि खूपच माफक रेट्स आहेत. आपण दुपारच्या वेळी जर दापोली मध्ये पोचणार असाल तर इतर हॉटेल्स बघण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय ठरेल.
  • Log in or register to post comments
अ
अ.रा. Wed, 10/14/2015 - 06:50 नवीन
हर्णे आणि आंजर्लेला आधी जाणे झाले आहे. आसूद : श्री केशवराज मंदिरसुद्धा बघितले आहे. अतिशय सुंदर मंदिर. अजून ताम्हिणी घाट वा वरंध घाटात आवर्जून बघण्यासारखे (शिवथरघळ सोडून) काही आहे का? खादाडीची ठिकाणे?
  • Log in or register to post comments
क
कोकणप्रेमी Wed, 10/14/2015 - 11:15 नवीन
महाडजवळ हायवेेवरच गंधारपाले बौध्द लेणी आहेत. तासाभरात बघुन होतात. जाताना किंवा येताना आपण सहज बघु शकता.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 10/14/2015 - 11:34 नवीन
गंधारपाले बौध्द लेणी आहेत.
इथे अजिबात जाऊ नका, सगळ्या लेण्यात गुडूप अंधार असतो. आणि वटवाघळाने कलेल्या घाणीचा सहन न होणारा दर्प येत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोकणप्रेमी
अ
अ.रा. Wed, 10/28/2015 - 11:21 नवीन
लाडघर (तामसतीर्थ) तर नक्की केलंय. तरी अजून काही कर्देसारखा सुंदर किनारा आहे का आसपास रत्नागिरीमध्ये? किंवा अजून खाली सिंधुदुर्गपर्यंत ? कि जिथे आवर्जून भेट द्यायला हवी ? तसे तारकर्लीला आणि सिंधुदुर्ग किल्ला जाणे झाले आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 10/29/2015 - 09:30 नवीन
रेडी बीच (रेडी गणपतीच्या मागच्या बाजुचा नाही) यशवंतगडाच्या शेजारचा. अप्रतिम बीच. नितळ पाणी. लाटा वगैरे असणारा, मोठा किनारा असणारा बीच बघायचा असेल तर शिरोडा बीच. (निव्वळ बीचची तुलना केली तर शिरोडा बीच कलंगुटला मागे टाकेल. येथे नुसते २-३ तास जाऊन परत आल्यामुळे राहण्याच्या सोयींबद्दल माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अ.रा.
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 10/29/2015 - 19:10 नवीन
Dapoli : Dabhol Side - Chandika Mandi, Dabhol Jetti,Tamas Tirth, Parashuram Monument Harnai Side : Murud Beach, Karde Beach, Keshavraj Temple, Harnai Port(Evening Sunset), Kadyavarcha Ganpati temple Anjarla You can go to Guhagar from Dabhol Jetti via Pheriboat along with your Car... Guhagar : Velneshwar Beach (Safe Plus Less crowdy and clean), Guhagar Beach, Wadeahwar Temple, Hedvi Ganesh Temple
  • Log in or register to post comments
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 10/29/2015 - 19:13 नवीन
Pure Veg Lunch plus Stay @ Dapoli contact :98 50 518081 Jayram Phatak Or else near Karde Beach Sagar Savali ( Mr.More) Both is suitable for family
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा