Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्थसाक्षरता

द
दिवाकर कुलकर्णी
Mon, 10/12/2015 - 20:30
🗣 71 प्रतिसाद
भाचीला नवी स्कूटर घ्यायची होती. एका शो रूममध्ये गेलो होतो. गाडीची किंमत सांगितली 54851 रुपये, हप्त्याने घेतल्यास रोख रु. 20230 पहिल्यांदा, आणि एकतर 1971चे 24 हप्ते - म्हणजे 47304, एकूण 67534; किंवा 1477चे 36 हप्ते - म्हणजे 53172, एकूण 73402. पहिल्या केसमध्ये वर्षाला फक्त (?) व्याज पडते म्हणे ६५०० रु. तर दुसर्‍या केसमध्ये वर्षाला व्याज पड़ते ६२०० रू. त्यांच्या दॄष्टीने. व्याज होते म्हणे ११.३० किंवा ११.८५ टक्के त्यांच्या दॄष्टीनं ते फक्त होते. इतंकच व्याज कसं होतं सांगा म्हटल्यावर त्या सेल्स गर्लनं आम्हाला, कंपनीनं तसंच सांगितलंय एवढच उत्तर होतं. मी स्वतःच हिशोब केल्यावर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा रोख दिलेली रक्कम त्यांनी सोईस्कररित्या हिशोबात धरली नव्हती. शिवाय दर महिन्याला लोन हप्ता दिल्यामुळं कमी झालेला लोन बँलन्सही त्यांनी विचारता घेतला नव्हता. प्रत्यक्षात लोन अमाउंट होतं केवळ ३४६२१ रु दर महिन्याला हप्त्याने ती फेडत असल्यामुळे निम्मंच क़र्ज़ वापरलं असं होतं. त्यामुळे कर्ज खरं तर फक्त १७३१०रु. होतं, त्यावर हे ६२०० किंवा ६५०० व्याज आकारणार, म्हणजे व्याजाचा दर पडला वर्षाला जवळजवळ ३५ टक्के.. हे सर्व बेहिशोबी होतं. ही सरळसरळ लूट होती. पण अर्थसाक्षरतेच्या अभावामुळे फ़ायनान्स कंपन्यांचं फावतं. हप्त्याने वस्तूच्या भूलभुलैयाख़ाली लोकाना या कंपन्या गंडवतात. गाड्यांच्या त्या शो रूममध्ये एक फायनान्स कंपनी दुकानच मांडून बसली होती. दोघांचं नक्कीच साटंलोटं असणार. शो रूम मालकालाही गाड्या रोखीनं विकण्यात स्वारस्य दिसलं नाही. राजन व्याजाचे दर कमी करतात, इथं आलम दुनिया मात्र बेख़बर असते अशा तर्‍हेने घेतलेली 'प्लेझर' प्लेझरदायी नव्हती, भाचीला मी एक सहकारी बँक गाठून दिली.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
14160 वाचन

💬 प्रतिसाद (71)
क
कानडा गुरुवार, 10/15/2015 - 14:40 नवीन
SBI चा सध्याचा व्याजदर ९.३५% आणि जर अ‍ॅग्रीमेंट्वर स्त्रीचे नाव पहिले असेल तर ९.३०% आहे.
SBI चा बेस रेट ९.३५% आहे. होम लोन चा रेट ९.५५ (९.५०) आहे.
जेव्हा RBI व्याजदर करते तेव्हा SBI व्याजदर कमी करण्यात सर्वात जास्त तत्परता दाखवते.
बरोबर.
शिवाय कर्जदाराच्या असहायतेचा फायदा घेऊन पॉलिसी, क्रेडीट कार्ड गळ्यात मारायचे प्रकार करत नाही.
हे मात्र तितकेसे खरे नाही. मी होम लोन तर नाही पण कार लोन SBI कडुन घेतलय. त्यावेळी आधी माझ्याकडुन १. एक सेव्हिंग अकाऊंट ओपन करुन घेतले. २. क्रेडिट कार्ड गळ्यात बांधले. ३. Property insurance साठी खुप मागे लागले. ४. Property insurance नकोच म्हटल्यावर मग ईतर प्रकारचे ईंशुरंस प्रॉडक्ट्स साठी खुप मागे लागले. पहिले दोन मला हवेच होते म्हणुन मी भाव खाऊन करून घेतले. आधी भाव खाण्याचा फायदा हा की माझे अकाऊंट ५ मिनिटात तर कार्ड application पुढच्या ५ मिनिटात झाले. माझ्याकडे कागदपत्रांच्या कॉपीज नव्हत्या तर त्या त्यांनीच काढुन घेतल्या. नंतर मात्र अशी सर्व्हीस SBI मधे मिळत नाही. BTW, माझा कार लोन चा रेट ९.७५% झाला आहे जो एक वर्षापुर्वी घेतांना १०.५०% होता. यासाठी काहिही फी दिलेली नाही. --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
अ
अस्वस्थामा गुरुवार, 10/15/2015 - 13:29 नवीन
सध्या माझे लोम HDFC चे आहे. SBI ला कर्ज शिफ्ट करण्यासाठी सगळ्या प्रोसेसीम्गची फिस २५-३० हजार तरी पडेल असे वाटतेय. इकडे HDFC १०-१२ हजार टाकले तर ९.९ चा व्याजदर ९.६५ करुन देतेय.
पिरा, माझेही HDFC चेच लोन आहे आणि मलाही याबद्दल सांगितले होते. मला SBI ला कर्ज शिफ्ट करणे सध्या शक्य नसल्याने याची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की वेरिएबल व्याज दर हा वेरिएबल असाच आहे (म्हणजे दर ३ महिन्यांनी अपडेट होणार असा) पण नवीन अग्रीमेंटअद्वारे तुमचे हप्ते कमी होतात आणि इफेक्टीव व्याज दर कमी बसतो. म्हणजे असं की व्याजदर ९.९% असेल आणि तो ९.६% जानेवारीमध्येच होईल पण आता टोटल हप्ते समजा २०० होते ते १८० झाले. अजून टेक्निकल माहिती माझ्याकडे दिलेल्या इमेलमध्ये सविस्तर आहे की ज्यामुळे मी हे एग्रीमेंट करायला तयार झालो. आत्ता हाती असलेल्या पत्रात खालील मजकूर आहे, कोणाला जास्त माहित असल्यास मलाही सांगा. loan converted From : Housing Loan-variable rate-monthly rest (with 3 monthly interest rate revision cycle) spread of MINUS 6.00% over RPLR To: housing loan-variable rate-monthly rest (with 3 monthly interest rate revision cycle) spread of MINUS 6.65% over RPLR
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/15/2015 - 13:33 नवीन
म्हणाजे थोडक्यात सेम रेट फक्त ३ महिने आधी करुन घेतला असंच ना? सौंदाळा, आता जरा काढते माहिती... करायला हवं हे काम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
क
कानडा गुरुवार, 10/15/2015 - 14:09 नवीन
थोडक्यात : नाही. HDFC चा जो रेट असतो तो Base Rate+spread असा असतो. रेट आपोआप ३ महिन्यांनी revise होतो. पण spread बदलुन घ्यायचा असेल तर processing fee compulsary घेतात. मार्च पर्यंत माझा spread -6.75 होता. तो मी एप्रिल मधे फी भरून ६ करुन घेतला. SBI चा होम लोन रेट ९.५५ (महिलांसाठी ९.५) आहे. ९.३५ हा त्यांचा बेस रेट आहे. --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कानडा गुरुवार, 10/15/2015 - 14:11 नवीन
करेक्शनः -६ चा चेंज करुन -६.६५ करुन घेतला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
अ
अस्वस्थामा गुरुवार, 10/15/2015 - 14:17 नवीन
कानडा : हेच ते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/15/2015 - 14:30 नवीन
हे स्प्रेड बद्दल मी अनेकदा ऐकलय नवर्‍याकडुन पण लक्ष न दिल्याने काहिही समजले नाही. कुणीतरी हे ही समजावुन सांगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
क
कानडा गुरुवार, 10/15/2015 - 15:15 नवीन
स्प्रेड समजावण्याईतक ज्ञान मला नाही पण खालच्या लिंक वाचुन समजू शकता. http://www.nitinbhatia.in/home-loan/floating-home-loan-bplr-vs-base-rate/ BTW, जर तुम्ही फी देऊन रेट कमी करायचा ऑप्शन वापरणार असाल तर Women Power scheme बद्दल नक्की माहिती काढा आणि कदाचित त्याच फी मधे ते जर करुन मिळाले तर करुन घ्या म्हणजे तुम्हाला ०.०५% कमी रेट लागेल. The above ROI is applicable for cases where a woman is an owner/co-owner and an applicant/co-applicant to the loan. All loans at the sole discretion of HDFC Ltd. अवांतर (मनातल्या मनात)
हे स्प्रेड बद्दल मी अनेकदा ऐकलय नवर्‍याकडुन पण लक्ष न दिल्याने काहिही समजले नाही.
हे भगवान!!! पिरा ताई हे काय बोलुन गेल्या. याचा अर्थ हा की नवरे जसे बायकोच बोलण (सगळच) काही ऐकत नाहीत (रेफरंस : छि_ _ धागा) तसच बायकासुध्दा नवर्‍यांच काही (सगळच) ऐकत नाहित. [डोळा मारा ची smiley (ही कशी टाकायची हो???)]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 10/16/2015 - 06:46 नवीन
अर्र्... सिक्रेट आहे हो ते आमचं...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
स
सौंदाळा गुरुवार, 10/15/2015 - 15:22 नवीन
माझा होम लोन रेट या ५ - ऑक्टोपासुन ९.३५ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
क
कानडा गुरुवार, 10/15/2015 - 15:33 नवीन
माझा SBI Home Loan चा इन पर्टीक्युलर स्वतःचा अनुभव नाही. मी फक्त बातम्या आणि SBI च्या वेबसाईट वरुन माहिती घेतली होती. SBI च्या साईट ची ही लिंकः https://www.sbi.co.in/portal/web/interest-rates/home-loans-interest-rates --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
द
दिवाकर कुलकर्णी Wed, 10/14/2015 - 21:12 नवीन
जर थोडी जोखिम घ्यायची तयारी असेल तर म्युच्युअल फड व शेअर्स चा पर्याय आहेच. पण त्यात जाणकाराच्या सल्ल्याबरोबर स्वताचाहि थोडा अभ्यास हवा.पण त्यातल्या त्यात सेफ़ गेम म्हणजे म्युच्युअल फंड.सिस्टेमँटीक इन्वेस्टमेंट प्लान किंवा SIP चांगला,या मध्ये मार्केट च्या प्रत्येक अवस्थेत(तेजी वा मंदी )गुंतवणूक होते,जी दीर्घ मुदतीत फायदेशीर ठरू शकते नियम ७२ चा गुंतवणूकीचा मूलमंत्र आहे.मिळणार्या व्याजाच्या आंकड्याने ७२ ला भागल्यास , रक्कम कधी दुप्पट होईल ते कळते. मुद्दल वाढवत राहाणे (ग्रोथ) हे गुंतवणूकीचे उद्दिष्ट असले पाहिजे. रक्कम स्वस्थ पाडून ठेवणे उदा. घरी,लॉकर मध्ये किंवा सेंव्हिग खात्यात या सारखी मोठी चूक नाही.डेड इन्व्हेस्टमेट टाळून पैशाला अॉलवेज ऑन द टोज् ठेवलं पाहिजे . Created using Quillpad Touch Sent from my iPad
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 10/15/2015 - 15:20 नवीन
उत्तम चर्चा सुरू आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/15/2015 - 18:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
कानडा Fri, 10/16/2015 - 05:52 नवीन
एक प्रश्न : कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. होम लोन हे जास्त मुदतीचे असणे चांगले कि लवकर फेडलेले चांगले? १. लोन रेट हा कायम एफ.डी. रेट पेक्षा जास्त असणार त्यामुळे लोन सुरु ठेऊन वाचलेले पैसे एफ.डी. मधे ठेवणे फायद्याचे नाही. तसेच एफ.डी. च्या ईंटरेस्ट वर टॅक्स देखील लागणार. पण Mutual fund वगैरे सारखी गुंतवणुक करुन जास्त फायदा मिळु शकतो. २. पण होम लोन असतांना ईन्कम टॅक्स वर दोन सवलती मिळतातः (अ) ८०C अंतर्गत १.५ लाख पर्यंत, (आ) २,००,०००/- पर्यंत च्या होम लोन व्याजावर (जवळपास २२,००० ते ६६,००० रू वर्षाला वाचतील). ८०C तर ईतर मार्गांनी सहज पूर्ण होते पण दुसर्या सवलतीसाठी काही ऑप्शन आहे का? --- कानडा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2015 - 07:21 नवीन
कानडा साहेब ८० C या कलमाखाली तुम्हाला १.५ लाखापर्यंत कराची वजावट मिळते. जर तुमचा कराचा दर ३० % असेल (म्हणजे उत्पन्न १० लाखाच्या वर असेल) आणी कर्जाच्या व्याजाचा दर ९ टक्के असेल तर तुम्हाला त्यातून ३० % करा वजावट म्हणजे २. ७ % कमी होतात. म्हणजेच तुम्हाला कर्ज हे ६. ३% ने मिळते. थोडक्यात दीड लाख व्याज आणी २०,०००/- मुद्दल यावर कर वाचतो. १,७०,०००/- रुपये हा आपला वर्षीक हप्ता असेल तर त्यातून तुम्हाला ५१ हजार रुपये कर वाचतो. किंवा १४१६६ रुपये महीना हप्ता असेल तर त्यातील ४२५० रुपये वाचतात. म्हणजे आपल्याला ९९१६ रुपये हप्ता पडतो. माझ्या १५ लाखाच्या कर्जाचा हिशेब हा असा होता. माझा साधा हिशेब हा होता जर मला कुणी ६. ३ टक्क्याने कर्ज देत आहे तर ते मी खिशातील पैसे भरून कशाला फेडू. अतिरिक्त पैसे मी शेअर बाजारात टाकून त्यातून मी साधारण १५ टक्क्याने करमुक्त उत्पन्न कमावले आहे. म्हणजे माझा नक्त नफा ८.७ % आहे तर मी कर्ज मुदती अगोदर का फेडू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
क
कानडा Fri, 10/16/2015 - 07:42 नवीन
खरे साहेब, कृपया मला साहेब म्हणु नका. मी काही ईतका मोठा नाही. (मी मात्र तुम्हाला म्हणणार कारण तुम्ही तेव्हडे मोठे आहात हे मला ज्ञात आहे).
जर तुमचा कराचा दर ३० % असेल (म्हणजे उत्पन्न १० लाखाच्या वर असेल) आणी कर्जाच्या व्याजाचा दर ९ टक्के असेल तर तुम्हाला त्यातून ३० % करा वजावट म्हणजे २. ७ % कमी होतात. म्हणजेच तुम्हाला कर्ज हे ६. ३% ने मिळते.
हे मला लक्षात आले नाही. तरी ओव्हरऑल लक्षात आले आहे की गृह कर्ज सुरु ठेऊन ईतर गुंतवणुकीतुन जास्त फायदा मिळु शकतो. (आता शेअर बाजारात खरच व्यवस्थीत अभ्यास करुन इनव्हेस्ट करावेच लागेल). प्रतीसादाबद्दल धन्यवाद. --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बिहाग Fri, 10/16/2015 - 09:36 नवीन
जर तुमचे वार्षिक गृह कर्ज व्याज हे १.५ लाखाच्या आत असेल आणि तुमचा कडे प्राप्तीकर वजा करून ६.३ पेक्षा पेक्षा जास्त उत्पन्न देणारा खात्रीशीर मार्ग असेल तर गृह कर्ज चालू ठेवा. नाहीतर फेडा. माझा अनुभव आसे सांगतो कि पहिले ३ ४ वर्ष व्याज हे बहुतांशी १.५ लाख पेक्षा जास्त जाते , त्यामुळे पहिली ३-४ वर्षे शक्य तेवढे प्रीपेमेंत करवे , नंतर व्याज १.५ चा जवळ आले कि ( दुसर्या घराचा मोह न करता ) मग मार्केट मध्ये पैसे टाकावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
P
palambar Fri, 10/16/2015 - 16:23 नवीन
=PMT(9.5%/12,300,5000000,0) फोर्मुल्या ला एर्रर का येते आहे?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 10/16/2015 - 16:28 नवीन
कुठे येतीये? (43,685) उत्तर येतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
च
चतुरंग Fri, 10/16/2015 - 16:32 नवीन
करुन टाकत असलात तर कदाचित शेवटचा पूर्णविराम '.' येत असेल एक्सेलमधे त्याने एरर येऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा