Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नटरंग

ए — एच्टूओ, Tue, 10/13/2015 - 07:34
हे नटराजा तुझी सोडून मी कधीच दुसऱ्या कशाची  उपासना केली नाही.. पण माझ्या प्राक्तनात आले स्मशानवत बैरागी भोग आणि टाळ्या घेण्याच्या मस्तीची शकले उडून दूरवर जाऊन पडली.. भयावेगात मी जाळून टाकल्या उर्मी आविष्काराच्या आणि ती राख सावडत अश्रू ढाळत बसतो सध्या.. तुझ्या अधिष्ठानाबद्दल कधीच शंका नव्हती मनात माझ्या पण गलितगात्रतेच्या विचारांची धार फोडत गेली माझा निर्धार आणि मी थंडपणे बंद केल्या तुझ्या जाणिवांच्या आकर्षक वाटा तुझ्यापेक्षा मोठे तुझे वेड-पण चौथ्या भिंतीपलिकडे बसलेल्या भेसूर दुःस्वप्नांना मी घाबरतो.. आता रिकाम्या हातांमध्ये बांधून मणाच्या वजनाचे दगड, खुरडतो आहे ठराविक चाकोरीत.. हे नटराजा मला माफ कर-मी निष्ठूर नाही, आतयायी पण नाही, मी एक अस्सल भेकड आहे.. कदाचित अजूनही आहे तुझेे वेड माझ्या पेशींमध्ये आणि तुझ्या अस्तित्वाचा अंश वाहतोय अजूनही धमन्यांमधून माझ्या राखेसोबत तो रूजेल मातीत-जन्मेल पुन्हा एक गुणा कागलकर... नटरंग.

प्रतिक्रिया द्या
1000 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पद्मावति Tue, 10/13/2015 - 07:50 नवीन
सुरेख. कलावंताची मानसिक तगमग छान मांडलीय.
  • Log in or register to post comments
ए
एच्टूओ Tue, 10/13/2015 - 08:05 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा