Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माणसांना पालवी नाही ..

D — drsunilahirrao, Tue, 10/13/2015 - 16:47
चेहर्यावर टवटवी नाही वाटते,माझी छवी नाही दूरवर नुसतेच रण आहे माणसांना पालवी नाही बालकांचे अर्भकांचेही हास्य आता लाघवी नाही हाक देवाला नका मारु भाव त्याचा वाजवी नाही तू कधी येशील तेव्हा ये ही प्रतिक्षाही नवी नाही हा कुणाचा चेहरा आहे आज काही चौदवी नाही डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
4086 वाचन

💬 प्रतिसाद (17)
च
चांदणे संदीप Tue, 10/13/2015 - 18:37 नवीन
गजल मस्त! आवडल्या गेली आहे! (दोन्ही थंब्स वर)
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 10/14/2015 - 04:43 नवीन
आभार संदीपजी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ए
एकजटा अघोरी Tue, 10/13/2015 - 19:14 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 10/14/2015 - 04:42 नवीन
खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकजटा अघोरी
प
पैसा Tue, 10/13/2015 - 19:38 नवीन
कविता आवडली. ही गझल आहे का?
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 10/14/2015 - 04:40 नवीन
हो, ही गझल आहे. खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मांत्रिक Tue, 10/13/2015 - 19:58 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 10/14/2015 - 04:47 नवीन
खूप खूप आभार मांत्रिकजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
स
सौन्दर्य Wed, 10/14/2015 - 05:03 नवीन
छान लिहिली आहे. अगदी वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 10/14/2015 - 09:53 नवीन
धन्यवाद सौंदर्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
म
मदनबाण Wed, 10/14/2015 - 06:25 नवीन
छान...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 10/14/2015 - 10:07 नवीन
खूप खूप आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ए
एस Wed, 10/14/2015 - 10:13 नवीन
डॉक्टरसाहेब, प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन आभार मानण्यापेक्षा एकच प्रतिसाद लिहून त्यात सर्वच वाचकांचे व प्रतिसादकांचे एकत्रितच आभार मानले तर ते जास्त योग्य वाटते. तसा नियम नाहीये, पण आंतरजालावरील एक संकेत आहे असे म्हणणे योग्य ठरेल. बाकी कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: drsunilahirrao
व
वेल्लाभट Wed, 10/14/2015 - 12:05 नवीन
क्लास! मस्त जमलीय. वैयक्तिक मला मराठी रचनेत हिंदी/उर्दू शब्द रुचत नाहीत त्यामुळे छवी, चौदवी... सोडून बाकी ग़ज़ल छान
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Wed, 10/14/2015 - 17:18 नवीन
हेच नि असेच म्हणायचेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
D
drsunilahirrao गुरुवार, 10/15/2015 - 07:19 नवीन
@एस, आपल्या सुचनेचे मनापासून स्वागत आहे :) धन्यवाद वेल्लभट जी, छवी हा शब्द मराठीत बर्यापैकी प्रस्थापित आहे.मात्र चौदवी हा शब्द नक्कीच खटकणारा वाटू शकतो. खूप खूप धन्यवाद. शिव कन्या, आभार !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 10/15/2015 - 08:13 नवीन
छवी नाही; पण छबी ऐकलाय मी मराठीत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: drsunilahirrao
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा