..अळणी..
..अळणी..
तसं माझं आयुष्य असं काही खास नाही..
घेतलेल्यांपैकी अनेकात चुकलेला एकही श्वास नाही..
दिवस येतो दिवस जाते..रेंगाळणारी रात नाही..
किती बोललो तरी देखील..आठवणारी बात नाही...
ओळखीचे तसे बरेच जण..कुणाशी दोस्ती ..वैर नाही..
कधी देतो कधी घेतो..पण वागणे मुळीच स्वैर नाही...
आभाळ तसं निरभ्रच कधी जमतात काही ढग..
उगा उगा हळवं वाटत तेव्हा मात्र सारं जग..
अगदीच भुरभुर बरसतो...कुठे कोसळणारा मेघ नाही..
संथ वाहणारं पाणी सारं..त्याला कुठे आवेग नाही...
कधी कधी आयुष्य हे फार फार अळणी वाटतं.
थुंकता न येणारी धरलेली..तोंडात मीठाची गुळणी वाटतं..
तेवढ्यापुरतेच..पुन्हा त्यापाण्यानेच मी गुळण्या टाकतो..
आईस्क्रीमने सुजलेला घसा पुन्हा पुन्हा शेकत राहतो..
हरलो..जिंकलो..समजत नाही..तसाच चालत जातो..
मान..अपमान..समजत नाही..उगाच बोलत राहतो..
काळजावर बसलेला खोल कधी कुठे घाव नाही...
जिंकलेला वा हरलेला असा कुठलाच डाव नाही...
स्वप्नात देखील मन माझं...कधी कुठे जात नाही...
जागेपणी देखील मला ते कधी सुध्दा खात नाही..
तसा जगतोय की हो शहाण्यासारखा..अगदी सरळ..
पण बहुदा मी जगतोय..हे कुणालाच ज्ञात नाही...
----योगेशु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र