भुकेल वासरू
माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,
लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं
घाम फुटण्याआधीच मात्र त्याच काळीज तुटलं होतं..
मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही
दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही..
नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही,
गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही..
थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं,
पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं..
डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,
.. माळरानी चालुन चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू खरचं जिवनाला मुकुन गेलं होतं..
💬 प्रतिसाद
(16)
प
पद्मावति
Wed, 10/14/2015 - 09:49
नवीन
आई..ग्ग..
कवीता वाचून अस्वस्थ व्हायला झालंय. प्रभावी लेखन.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 10/14/2015 - 10:18
नवीन
वासराला कधी औताला जुंपलेलं पाहिलं नाही. गोर्ह्यालाही जास्त कष्टाची कामं लावत नसतात. औताला जुपतात ते बैलांना. तेव्हा कवितेत वापरलेली प्रतिमा चुकीची आहे. इथे शब्दशः अर्थ अपेक्षित नाही हे समजतेय, तरीही कवीने आपल्या काव्यातल्या वा लेखकाने लेखनातल्या प्रतिमा वापरताना जागरूक असायला हवे असे समीक्षेच्या दृष्टीने पहायला गेल्यास वाटते.
- Log in or register to post comments
म
माहीराज
Wed, 10/14/2015 - 13:28
नवीन
मग बुवा तुम्हाला ही कविताच समजलेली दिसत नाही .
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 10/14/2015 - 19:15
नवीन
बरोबर आहे. या कवितेची संक्षीस्टाईल चिरफाड करावी असं फार वाटलं. पण जाऊ द्या. तुम्हांला विधायक समीक्षा सहन होत नाही, ती कशी सहन होणार.
पुढच्या रतीबासाठी शुभेच्छा. अजून प्रतिसाद देऊन हा धागा वरती तरंगवत ठेवण्यात अर्थ नाही. चालू द्या.
- Log in or register to post comments
म
माहीराज
Wed, 10/21/2015 - 16:19
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 10/21/2015 - 17:48
नवीन
लिहित रहा! प्रतिकात्मक आहे! कुणाला समजलं नसेल तर तुम्ही त्याला काय करणार? भावना पोहोचल्या!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 10/14/2015 - 17:34
नवीन
:(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 10/14/2015 - 18:19
नवीन
साध्या व सच्च्या शब्दांत लिहिलेली कविता!!! प्रतिकात्मक आहे हे कृपया ध्यानात घ्यावे. व्यवहाराचे कठोर नियम लावले तर प्रत्येक साहित्यकृतीचा चिवडाच होईल.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Wed, 10/14/2015 - 18:23
नवीन
एक दोन ओळी सोडल्यास, क्लास!
- Log in or register to post comments
म
माहीराज
Wed, 10/14/2015 - 19:15
नवीन
ही कविता लिहीताना डोळ्यासमोर आजचा जीवनाला कंटाळेलेला शेतकरी होता...आता या भावनेतून ही कविता वाचा...
- Log in or register to post comments
म
माहीराज
Wed, 10/14/2015 - 19:20
नवीन
त्यातल्याच एका शेतकरर्याच्या मुलावर लिहिली आहे.
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Wed, 10/14/2015 - 19:40
नवीन
खरं म्हणजे कवीला आपल्या कविते विषयी स्पष्टीकरण द्यावे लागू नये असे म्हणतात. काही प्रतिसादा नंतर तुम्ही ते दिलेत. परंतु ते स्पष्टीकरण वाचण्या आधी कविता वाचताना डोळ्यासमोर आली ती मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करणारी छोटी मुले. काही कळायचं आतच ती मुले पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, अस्तित्वासाठी संघर्ष करतात. नशीब जर चांगले असेल तर मोठं झाल्यावर ह्या संघर्षमय परिस्थितून बाहेर येऊन थोडी स्थिरावतात. परंतु असे चांगले नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही.
कविता अतिशय साधी, सोप्या शब्दात लिहिली आहे. अभिनंदन.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Wed, 10/14/2015 - 19:42
नवीन
उत्तम प्रतिसाद!!!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 10/21/2015 - 17:27
नवीन
त्र - t+r+a
कविता पोचली.
आज एस भाउ वेगळ्या मूड मध्ये असावेत. ;)
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Wed, 10/21/2015 - 19:51
नवीन
ओह... मन दुखलं...
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 10/21/2015 - 20:33
नवीन
कामगार पण असाच चेपला गेला..संपवला गेला..पण त्याने जिवन संपवले नाहि..संघर्ष केला
- Log in or register to post comments