शब्दाचा अर्थ हवा आहे..
नमस्कार,
मी 'सोजर' या शब्दाचा अर्थ शोधत आहे. आज आमच्या whatsapp समुहावर प्रत्येकाने आपापल्या नावाचा अर्थ सांगणे हा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. समुहातील एका भगिनीचे नाव सोजर असे आहे, आणि त्यांनी आव्हान दिले आहे कि त्याचा अर्थ शोधून दाखवा. मी खूप शोधाशोध केली पण मला काही अर्थ सापडेना. मला थोडी शंका वाटते कि, सोजर - सूर्य किरण असा अर्था असावा, किंवा सूर्याशी संबंधित असावा.
कृपया मार्गदर्शन करावे.
आभार,
सुचिकांत
💬 प्रतिसाद
(15)
त
तर्राट जोकर
Wed, 10/14/2015 - 11:59
नवीन
सोज्वळ असण्याची शक्यता आहे. पण तुम्ही त्या नावाची पार्श्वभूमी म्हणजे ती कोणत्या प्रांतातली, भाषेची आहे ते कळलं तर बरे होइल..
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/14/2015 - 12:13
नवीन
हा शब्द बार्शीत आहे. या नावाची मोठी शिक्षणसंस्था आहे. मराठा समाजाच्या चेअरमनच्या मातोश्रींचे नाव सोजरबाई. हे नाव मराठवाडा आणि प. महाराश्ट्राच्या सीमेवर जास्त दिसते. मला माहीती आहे तसा अर्थ साजरी ती सोजर असा असावा. सोज्वळ पण नाव बरेच जवळ जाते.
अजून एक शक्यता आहे पण या नावाबाबतीत ती नसावी. इकडे काही जमातीत पोलीस, मेजर, जवान, फौजदार, बॅटर्या, सिमेट्या अशी कागदोपत्री नावे आहेत. सोल्जर पण एकले आहे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 10/14/2015 - 12:58
नवीन
ते सोजिर म्हणजे सोल्जरचा अपभ्रंश...
सोजरबाई असे नाव प.म. मध्ये आहे म्हणजे अर्थ सोज्वळच असावा असा ९९% विश्वास आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 12:12
नवीन
अर्धा ल टाकला तर मी सांगतो :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/14/2015 - 12:21
नवीन
आता एक रिक्वेस्ट बर्का तुम्हालापण. तिकडची आव्हाने कशी इकडे घेऊन येता तसे एक हिकडून घेऊन जावा.
तुमच्या ग्रुपातल्या सगळ्या मेंबरानी त्यांच्या त्यांच्या नावाचे काय अर्थ सांगितलेत हे इकडे टायपा. आम्हालाबी जरा ओळख नव्या नव्या शब्दांची अन रत्नांची.
बादवे, तुम्ही तुमच्या नावाचा काय अर्थ सांगितला म्हणे? दाभण???
- Log in or register to post comments
स
सुचिकांत
Wed, 10/14/2015 - 12:34
नवीन
मिपा वरील अभ्यासपूर्ण लेखांचे, त्या त्या लेखकाची परवानगी घेऊन आम्ही समुहात टाकत असतो. नक्की, सर्व नावांचे अर्थ सांगीन.
@अभ्या - होय, हे नाव एका सोलापूरच्या ताईंचे आहे.
- Log in or register to post comments
स
सुचिकांत
Wed, 10/14/2015 - 12:35
नवीन
मिपा वरील अभ्यासपूर्ण लेख, असे वाचावे...
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/14/2015 - 13:20
नवीन
ह्या विनंतीला पण मान द्या.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/14/2015 - 13:28
नवीन
त्यांच्या नावाचा पण अर्थ सांगेनात ते सुडक्या.
मला तर सूची म्हणजे सुई अन सुईचा कांत म्हणजे दाभण एवढेच माहीत आहे
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 13:31
नवीन
अर्रे ते "सुचि का अंत" असेही असू शकेल की...जरुरी थोडीच आहे कि प्रत्येक वेळी अर्थ मराठीतच हवा =))
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/14/2015 - 13:42
नवीन
मी आणखी विग्रह केला असता, पण पाँईटलेस धागा शंभरी गाठेल.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Wed, 10/14/2015 - 13:52
नवीन
त्यासाठी माझा कोणताही धागा वापरू शकता
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/14/2015 - 13:57
नवीन
कित्ती तो सोस =))
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/14/2015 - 14:20
नवीन
या* आता!!
* म्हणजे निघा.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Wed, 10/14/2015 - 13:17
नवीन
तसा शब्द dictonary मध्ये नाहीये
- Log in or register to post comments