ती
ती धरित्री ती जीवन दायिनी
ती शक्ती ती भक्ती
ती विद्या ती प्रज्ञा
ती अर्धागिनी, ती कन्या
ती वीज , ती नीज
ती काळजी , ती प्रीत
ती प्रेरणा , ती ज्योत
ती ममता, मायेच स्त्रोत
ती हळवी, अन तरी ती खंबीर हि
ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि
तीची ओंजळ नेहमी रिक्त,
तीचे जगणे कधी मनमुक्त
ती पावसची रिमझिम बरसणारी धारा
अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा
ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली
तरी स्वत्व स्वताचे जपलेली
ती स्वतंत्र अन ती कणखर
ती स्वताला सावरणारी , सांभाळणारी
स्वतची काळजी स्वताच घेणारी
मला, अभिमान आहे मी "ती" असल्याचा
प्रत्येक दिवस माझ्या साठी स्व-सन्मानाचा
अपेक्षा तर काहीच नाही कुणाकडून
स्त्री म्हणून सन्मान अन माणूस म्हणून
आदर दाखवा हीच आशा आहे समाजाकडून
मला अभिमान आहे , मी स्त्री असल्याचा
आणि हा अभिमान माझ्या आई वडिलांना पण आहे
Save a girl Child
-शीतल
--
💬 प्रतिसाद
(4)
म
मांत्रिक
Wed, 10/14/2015 - 17:10
नवीन
सुंदर!!!
एक शाक्त म्हणून तर खूप आवडली!!!
जगदंबा हीच श्रेष्ठ!!! ब्रह्मा विष्णु महेशापेक्षा!!!
- Log in or register to post comments
श
शीतल जोशी
गुरुवार, 10/15/2015 - 08:45
नवीन
धन्यवाद !!!!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/15/2015 - 09:09
नवीन
तुमची कविता छानच.
रँडम थॉट्स आहेत, पण स्त्री किंवा पुरुष विषयक काहीही वाचलं की हे नेहमी जाणवतं की हिस्टॉरिकली आपण हा भेद करत आलेलो आहोत. अजूनही तू मुग्गा आहेस आणि रडतोस? असं लहान मुलाला म्हणताना ऐकलं की वाटतं की अरे काय? लहानपणापासून तुम्ही सतत हे डिफरन्शिएशन करत रहाणार का? परवा एक नातेवाईक सांगत होते, त्यांना चहा करताना बघून त्यांचा मॉटेसरीतला मुलगा म्हणाला त्यांना, 'ए बाबा, तू बॉय आहेस तू किचन मधे काय करतोस?' वेल.. आय डोन्ट नो याला आळा कसा घालायचा.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 10/15/2015 - 16:10
नवीन
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla
- Log in or register to post comments