सहाचा वडा
प्रेरणा
काय करणार लोकं पण अश्शा जिलब्या पाडतात ना, आवरता आवरत नाही.
सहाचा वडा गरमागरम असतो!
वड्याच्या कव्हरला गुदगुल्या केल्या कि
आपला हात मस्तसा भाजतो,
चटणी हवी काय म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
सहाचा वडा झणझणीत असतो!
शरीराचा रोम न् रोम जागा करतो
जिभेवर लसणीचा स्वाद पसरवतो,
अजून मिरची हवी होती का? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
सहाचा वडा कॅालेजची आठवण असतो !
मनाचा एकदम रिट्रोस्कोप होतो
पण हातातला ग्लास हातातच राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू सहाचा वडा धूसर होतो
डोळ्यातल्या समुद्रापार दिसेनासा होतो
💬 प्रतिसाद
(22)
म
मनीषा
गुरुवार, 10/15/2015 - 12:25
नवीन
६ चा वडा .... जोशी का दिवाडकरांचा ?
बालगंधर्व मधे ( नाटकाच्या मध्यंतरात) मिळणारा वडा पण मस्तं अस्तो बर्का.
आमच्या कॉलेज कँटीन मधे बनवडा नामक उच्च प्रकार मिळायचा -- दाण्याच्या चटणी बरोबर
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 12:33
नवीन
बालगंधर्व जवळच्या जोशांचा, ओफिस सुटलं की बर्याचदा घेतो
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 17:49
नवीन
काय ओ द-मामि, पण तुमचं हापिस डोंगरी का कुठेतरी होतं ना म्हणे?
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 17:58
नवीन
कधी हो???
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 18:07
नवीन
हल्लीच कुठेतरी तुम्ही तसं लिहिल्याचं स्मरतंय ओ.
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 18:08
नवीन
नाव बॅा
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 18:16
नवीन
देऊ का पुरावा? ;)
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 18:18
नवीन
व्यनित द्या पाहू.:)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 18:18
नवीन
घाबल्लात वाट्टं ;)
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 18:19
नवीन
:):):):):)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 18:21
नवीन
=))
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 10/15/2015 - 18:21
नवीन
अर्रर्रर्रर्र!
असं जाहीर विचारायचं नसतं बे वल्ल्या.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 10/15/2015 - 14:06
नवीन
छान !:)
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 10/15/2015 - 15:01
नवीन
आमच्या उत्तम नगर मध्ये पंखा रोड आहे, बाजूला भला मोठा नाला आहे, चहा आणि वडा उचित मार्गाने त्या नाल्यातच धूसर होणार ...
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 16:15
नवीन
वडा खमंग आहे!!!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 16:27
नवीन
ठाणे स्टेशनसमोरच(प) एक खूप प्रसिद्ध वडापाव हाॅटेल आहे. कधीतरी वर्षभरापूर्वी गेलतो मित्रांसोबत. कुणाला आठवतंय नाव? भन्नाट होता वडापाव! अगदी भन्नाट!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 10/15/2015 - 17:23
नवीन
बाकी दादरचा श्रीकृष्णचा आणि कीर्ती काॅलेजच्या बाजूला अशोकचा; पार्ल्याला मिठीबाई काॅलेजसमोर विजयचा आणि बोरिवली पश्चिमेस प्लॅटफॉर्म नं.७ च्या जवळचा मंगेशचा - हेव
म्हणजे मुंबईतल्या वड्यांची चारधाम यात्राच आहे.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 17:38
नवीन
बहुतेक बोकाचार्य! नाव काहीच आठवेना! ठाणे पश्चिमच्या स्टेशनसमोरच आहे. अगदी खत्रा वडापाव असतो.
बाकी मिरारोड स्टेशनजवळ कर्जत वडापाव अगदी खतरा मिळतो. अगदी खमंग, तिखट, झणझणीत असतो. २ महिन्यांपूर्विच गेलतो तिथे. जबराट असतो वडापाव एवढेच बोलतो.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 10/15/2015 - 18:13
नवीन
कुंजविहारचा वडापाव आणि खत्रा???
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 18:20
नवीन
ओ राजे! तुम्ही खाल्लात की नाही? मगच बोला! बाकी मिरारोड स्टेशनचा कर्जत वडापाव विथ मिरची खाऊन बघा! हौस फिटेल पार!
- Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग
गुरुवार, 10/15/2015 - 17:37
नवीन
जोशी वडे वाले दगडूशेठ समोर 13 रू ला आणि पिंपरी
ला 10 रू. ला विकतात. हा भेदभाव का काय कळत नाही बुवा
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 17:40
नवीन
ओ गांधीबाबा! जाऊ द्या हो! काय अगदी कंजंषपणा करताय गांधीबाबांसारखा! चव चांगली असेल तर खायचा बिनधास्त! लै विचार करायचा नै! गंमतीत बोलतोय! रागवू नका!
- Log in or register to post comments