जे न देखे रवी...

वेड हे रक्तात माझ्या...

Primary tabs

वेड हे रक्तात माझ्या वादळाशी झुंजण्याचे
जे किनार्‍याचेच प्रेमी वेगळे सगळेच त्यांचे

पेटले वणवे विखारी ज्यात मी झोकून देई
वाचवाया कातडी ना, कौल मिळती काळजाचे

होऊ दे उध्वस्त आयू, होऊ दे जखमी जटायू
घ्येयपथि हे घातलेले गालिचे ही कंटकांचे

जो लढे लोकार्थ त्याला भुलविती ना शब्दलेणी
दार मौनाचे खुणावी आतले हृदयांतरीचे

नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज
रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे

--अशोक गोडबोले, पनवेल.

प्राजु

अशोक राव,
अप्रतिम गजल... संदीप खरे यांच्या "जपत किनारा शिड सोडणे... नामंजूर" या कव्वालीचे आठवण झाली.

नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज
रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे

या ओळी विशेष भावल्या...

- प्राजु.