( बाराची बिअर )
आमुची प्रेर्ना
ऑक्टोबरमासी जो कोणी होरपळतो एव्हरी इअर .....
बैठकीत दोस्तांबरोबर होऊन-देतो तो एक बिअर
बाराची बिअर थंडगार असते,
बाटलीच्या बुचाला उचाकावलं कि आपला हात मस्तसा भिजवते,
चखणा हवा काय म्हणून मिश्कीलपणे विचारते !
बाराची बिअर सोनेरी सुंदरी असते
गळ्याखाली उतरताना, पोळलेल्या शरीराचा, रोम न् रोम थंडावते
जिभेवर माल्टचा स्वाद पसरवते,
लिंबाची फोड हवी होती का? म्हणून खोडीलपणे विचारते!
बाराची बिअर कॅालेजची आठवण असते !
मनाचा एकदम रिट्रोस्कोप करते
पण हातातला ग्लास हातातच ठेवते
............ हळूहळू बाराची बिअर धूसर होते
डोळ्यासमोर फाटलेल्या स्वप्नांआड दिसेनाशी होते
बाराची बिअर निव्वळ एक पळवाट असते !
अपयशाचं कडवटपण सेलिब्रेट करवते
म्हणते फेस लाइफ़, व्ह्याय फिअर ?…
घोटाबरोबर गिळून संकट, आगे बढ, करते चिअर …
💬 प्रतिसाद
(12)
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 10/15/2015 - 14:02
नवीन
चिअर्स,,,
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 14:02
नवीन
चिअर!
व्हाय फिअर?? :)
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/15/2015 - 14:09
नवीन
बाराच्या गोष्टी असतातच इंटरेस्टिंग!! आता एमेच बाराच बघा ना!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 10/15/2015 - 14:09
नवीन
जब्रा :)
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 14:21
नवीन
तो दिवस तेराला साज्रा झाला म्हणे!:)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 10/15/2015 - 16:34
नवीन
???
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 14:21
नवीन
जबराट!
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 10/15/2015 - 14:29
नवीन
चांगलय.
फक्त ते आंग्ल शब्द miss केले.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
गुरुवार, 10/15/2015 - 14:37
नवीन
ह्म्म
- (धूसर) सोकाजी
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 10/15/2015 - 14:47
नवीन
चारच्या चहा नंतर ६ चा वडा झाला पण ८ चा वरण भात राहिला आहे. इच्छुकांनी नोंद घ्यावी
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 10/15/2015 - 15:04
नवीन
चान!
'बाराची'मधे उदाहरणार्थ श्लेषपण साधलाय!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 16:14
नवीन
मस्तच! चिअर्स पगलाजी!
- Log in or register to post comments