Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी असा त्या बासरीचा सूर होतो

ब — बाजीगर, Sat, 10/17/2015 - 03:06
व्हाॅट्सप वर ही कविता पावली, सुरेश भटांची म्हणे. सुरेश भट मी असा त्या बासरीचा सूर होतो! नेहमी ओठांपुनी मी दूर होतो! प्रीतही आली फुलांच्या पावलांनी हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो! राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता... मी घरोब्याचे जुने काहूर होतो! तू किती केलास भेटीचा अचंबा.. भूतकाळाचा जणू मी धूर होतो! मी न साधी चौकशी केली घनांची ऐन वैशाखातला मी पूर होतो! कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ? जीवनाला मीच नामंजूर होतो! तेवते आहेस तू पूजेत कोठे? एकदा मीही तुझा कापूर होतो! मला असे वाटले हे कवी जन "Lateral Thinking" करतात. म्हणजे आपण नेहमी विचार करतो तसे क्रमश: न करता, आधी कवितेची चवथी ओळ लिहीतात मग 3री ओळ, मग 2री ओळ, शेवटी पहीली ओळ लिहीत असावेत. मी पध्दतशीर यमके जमा केली. स्फूर्ती वगैरे किही नाही. ठणठणीत जुळवाजुळवी. आतुर होतो मजबूर होतो भरपूर मगरूर ढाराढूर होतो नुपूर मजकूर शूर हूरहूर माझे जोडकाम/शालू ला ठिगळ-काम स्पर्श तो मखमली कधी मी मागतो? ये तुझ्या पायीचा मी नुपूर होतो वाहुनी गेले अता नये वाचता नजरेतल्या पत्रातला मी मजकूर होतो बोललेले अर्थ ना मी जाणतो शब्द तुझा या कानी तर होतो संतूर होतो भेट ती स्वप्नातली पुन्हा कधी ना पाहतो काळ मजसाठी किती निष्ठूर होतो प्रीती चा ना इजहार केला, जाणते तू मी कधी इतका शूर होतो हासुनी तू पाहता दुसरीकडे, जीव हा नुसता असा हुरहूर होतो

प्रतिक्रिया द्या
1881 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चांदणे संदीप Sat, 10/17/2015 - 03:22 नवीन
मालक... तुमच्या जोडकाम/शालूला ठिगळ कामात वृत्तबित्त लावले असते तर जमले असते. इथे काय चाललय नो आयडिया!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 10/17/2015 - 03:45 नवीन
तुमच्या एकंदरित लिहिण्यावरुन गजलेबाबत तुम्ही फार विचार केलेला नसावात असे दिसते. माझे नम्र सांगणे आहे की भटसाहेबांसारख्या उच्च गजलकाराने लिहिलेले गजलेबद्दल चार शब्द वाचा विचार करा आणि मगच लिहा. फक्त कोणतीतरी यमके इकडून तिकडून पकडून आणली आणि जुळवली की गजल होत नाही. गजलेचे शेर हे कित्येक दिवस मनात घोळू शकतात. शेरातल्या दोन ओळींपैकी कित्येकदा फक्त पहिली किंवा दुसरी ओळच जमून येते आणि मग उरलेली ओळ जमणे ही तगमग असते. असो. www.sureshbhat.in या वेबसाईटवर भटसाहेबांनी गजलेची बाराखडी लिहिलेली आहे ती वाचा. शुभेच्छा! :) -चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 10/17/2015 - 03:57 नवीन
खरं तर असं लिहून तुम्ही सुरेश भटांचा नकळत अपमान करताय. नक्की काय हेतू आहे तुमचा?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा