दे दे दे श्री गणपती
अम्हा दिना दिना सन्मती
भितीस भ्रांतीस निरसूनीया
गणपती सुख अती
मज मती दे दे दे.
नाश करूनी विघ्नांचा
सन्मती देई तू सकला
गणपती सुख अती
मज मती दे दे दे.
हे फार जुने मेळ्यातले पद आहे.
आम्ही आमच्या घरच्या आरतीत याचा समावेश केला आहे .
याखेरीज दोन फारशा परीचीत नसलेल्या आरत्या पण आहेत.
त्या ब्लॉगवर टाकतो आणि दुवा देतो आणि दुवा घेतो.
"सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची...' ही गणेशाची आरती यंदा चक्क भारताच्या राष्ट्रपती भवनात ऐकायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये...
दरबार हॉलसह या भव्य वास्तूतील सव्वातीनशेहून अधिक भव्य दालनांमध्ये तब्बल ७७ वर्षांनी आणि इतिहासात प्रथमच गणेशाचा जयघोष दुमदुमणार आहे...
..."सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची...' ही गणेशाची आरती यंदा चक्क भारताच्या राष्ट्रपती भवनात ऐकायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये...
दरबार हॉलसह या भव्य वास्तूतील सव्वातीनशेहून अधिक भव्य दालनांमध्ये तब्बल ७७ वर्षांनी आणि इतिहासात प्रथमच गणेशाचा जयघोष दुमदुमणार आहे...
...एकूणच गणेशोत्सवात रोज दोन वेळा होणाऱ्या आरतीच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना यंदा प्रथमच मोदक-खिरापतीची चवही यानिमित्ताने चाखायला मिळेल ! ...
मंगलमुर्ती मोरया !!!!!!!!!!!!
अरे कोणी तरी गणपतीची आरती येथे लिहा व एमपी थ्रीचा दुवा देखील द्या रे लेकांनो ;)
साक्षी साहेब ,
सुंदर मुर्ती व आसपासची फुले देखील !!!
धन्यवाद इतक्या सुंदर मुर्तीचे दर्शन घडवलेत येथे बसून !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
गणपती हे असे एक दैवत आहे जे विविध रुपात तितकेच लोभस दिसते...
छायाचित्रांबद्दल धन्यवाद!
अरे कोणी तरी गणपतीची आरती येथे लिहा व एमपी थ्रीचा दुवा देखील द्या रे लेकांनो
हा घ्या दुवा. यातील "सुखकर्ता दु:खहर्ता" दुव्यात नेहमीच्या सर्व आरत्या आहेत.
दे दे दे श्री गणपती
अम्हा दिना दिना सन्मती
भितीस भ्रांतीस निरसूनीया
गणपती सुख अती
मज मती दे दे दे.
नाश करूनी विघ्नांचा
सन्मती देई तू सकला
गणपती सुख अती
मज मती दे दे दे.
हे फार जुने मेळ्यातले पद आहे.
आम्ही आमच्या घरच्या आरतीत याचा समावेश केला आहे .
याखेरीज दोन फारशा परीचीत नसलेल्या आरत्या पण आहेत.
त्या ब्लॉगवर टाकतो आणि दुवा देतो आणि दुवा घेतो.
गणपती बाप्पा मोरया!
अतिशय सुंदर अन् सुबक मुर्ती....अन् सुरेख छायाचित्रे!
(दर्शनाने कृतकृत्य झालेला) टिंग्या
असेच म्हणतो. अगदी प्रसन्न मूर्ती आहे. आम्हांला घरबसल्या गणरायाचे दर्शन घडवल्याबद्दल अनेक आभार.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर गणेशमूर्ती !
अगदी प्रसन्न वातावरण दिसतेच आहे.घरच्या गणपतीची आठवण करून दिलीत.
स्वाती
अतिशय प्रसन्न वाटलं अशी षोडशोपचार केलेली मूर्ती पाहून.
धन्यवाद सर्वसाक्षी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
फारच सात्विक मूर्ती आहे सर्वसाक्षी, धन्यवाद!
(स्वगत - रंगा, गणपतीच्या पुढे किंवा हातात मोदक दिसत नाहीये, 'सर्वसाक्षी'ने मटकावलेला दिसतोय! ;) )
चतुरंग
गणपती बाप्पा मोरया!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
गणपती बाप्पा मोरया ...
धन्स सर्वसाक्षी !
सकाळ मधील ही बातमी वाचा.
काही इंटरेष्टींग ठळक बाबी :-)
सुंदर मुर्ती.
मन प्रसन्न झाले.
श्रींची मुर्ती अतिशय सुंदर आहे आणि छायाचित्रेही मस्त आली आहेत...मन एकदम प्रसन्न झाले....
इथे प्रकाशित केल्या बद्दल धन्यवाद....
(मंगलमुर्तींच्या आगमनाने आनंदलेला) पांथस्थ
गनरायांच्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार.
वा सर्वसाक्षी, सुंदर दर्शन घडविलेत.
धन्यवाद.
चित्रे सुंदर आहेत.
...पेणची का हो ?
किती सुरेख, प्रसन्न मूर्ती!! गजाननाच्या चरणी साष्टांग नमस्कार.
फोटो अतिशय सुरेख आणि अतिशय छान सजावट.
गजाननाचे दर्शन घडवल्याबद्दल आभार.
छान फोटो, छान मूर्ती आणि छान सजावट.
(मला माझ्या आजोळच्य गणपतीची आठवण झाली.)
--लिखाळ.
सुबक आणि गोजिरवाणी मूर्ती आहे. घरच्या गणपतीची आठवण झाली.
साधारणतः असेच म्हणतो, पण घरच्या गणपतीची आठवण नाही झाली. कारण आत्ता घरी समोर जो गणपती दिसतो आहे, तो असाच सुबक आणि गोजिरवाणा आहे !!
इंडिया कॅश अँड कॅरी की जय !
मोरया !!! ह्या तेलगू दुकानदारांना उदंड आयुष्य द्या !!!!
-- सर्किट
मनोहारी रुपडे आहे.पेणच्या थाटाची मूर्ती आहे.
धन्यवाद.
वा साक्षी!
सुरेख मूर्ती आणि सुरेख फोटू...
उद्या जमलं तर घरी दर्शनकरता नक्की चक्कर टाकतो...
गणपतीबाप्पा मोरया!
साक्षीच्या गणपतीचा विजय असो,
लालबागच्या राजाचा विजय असो...!
तात्या.
मोरया!!!!!!!
(गणेशभक्त)बेसनलाडू
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!
गणेश मुर्ती आणी सभोवतालची आरास ही मस्त
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
बाप्पाचं दर्शन घडवल्याबद्द्ल!
फारच गोड रूप आहे!
रेवती