Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्मरण शक्ति लयाला जात चालली आहे काय

द
दिवाकर कुलकर्णी
Tue, 10/20/2015 - 07:47
🗣 57 प्रतिसाद
शाळेत ३० पर्यंत पाढे असत.ई.६वी७वी,तच १२/१५चे पाढे विसरले, ते पूना:पाठ करण्याचा प्रयत्न झाला नाही, आवश्यकताहि पडली नाही. १९, २९ चे पाढे शिक्षकांनाही येत नसत . पावकी , सवायकि, औटकी हा प्रकारहि पूर्वीच्या प्राथमिक शिक्षणात होता, तेहि सोइस्कररित्या विसरलं गेलं.अर्थात त्याची फारशी गरजहि पुढच्या आयुष्यात कधी लागली नाही. पण मनातल्या मनात ते करता यायचं,४७ निम्मं,६८ पाव ,किंवा ९२ सव्वा ६० दीडं, जेव्हां एकदम सांगायचो तेव्हां समोरच्याला आश्रर्य वाटायचं. माहीत नाही ,इंग्रजी माध्यमाच्या शाळातून पूर्वी किती पर्यंत टेबल शिकवली , जायची म्हणजे पाठांतर करून घ्यायचे आज किती ,व काय असते ,कसे असते, अभ्यास क्रमात .थोडे तरी पाठांतर शिल्लक आहे कि नाही. तरूण पिढीला,साध्या सोप्या हिशोबाला कालक्युलेटर लागतो ,ऊद्या काँम्युटर लागल्यास नवल वाटायला नको . या नवीन गाजेट्सनी स्मरण शक्ती लयाला चालली आहे. कोणत्याहि मोठ्या बेरजा मी हातीच करतो ,माझ्या पत्नीला ,आजहि २९ पर्यंतचे पाढे तोंड पाठ आहेत . या विषयावर चर्चा व्हावी असे मला वाटते .
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
14232 वाचन

💬 प्रतिसाद (57)
अ
असंका Wed, 11/11/2015 - 18:24 नवीन
आणि ह्यासाठी स्मरणशक्ती ची काहीही आवश्यकता नाही, असे कसे म्हणता येइल ?
असं म्हणतंयच कोण? मुळात आपण जो प्रश्न विचारत आहात तो ९८१ वाला, तो असे फसवे प्रश्न मुद्दाम विचारले जातात तस्ल्या प्रकारचा आहे- ते मेंदूला फसवणारे प्रश्न आहेत. १०० मधले ९० लोक अशा प्रश्नांना चुकीची उत्तरं देतात. त्यांचा इथे संबंधच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/11/2015 - 18:03 नवीन
आमच्या हॅकिंग आणि बेटिंगच्या धंद्यात फक्त बोटाच्या इशार्‍यांना महत्त्व असते. कशाला मरायला ते पाढे आन पाठांतर. पाठांतर, पाढे ह्या मध्ये मास्टर असल्याने कोणी लगेच आकाशाला गवसणी घालत नाही आणि येत नसेल तर अपयशाच्या गर्तेत कोसळत नाही. प्रत्येकाच्या स्मरणशक्तीचा, बुद्धीचा एक आवाका असतो. उगा चार पोर तीस पर्यंत दट्ट्या हाणतात म्हणजे आपल्या पोराने पण हाणायला पाहिजे असे काही नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 11/11/2015 - 18:13 नवीन
जौदे हो, यशाची मध्यमवर्गीय स्वप्ने आहेत ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/11/2015 - 18:15 नवीन
यशाची मध्यमवर्गीय स्वप्ने
चपलख __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/11/2015 - 19:20 नवीन
बाकी, हे 'स्मरणशक्ति लयाला जात चालली आहे काय?' काय प्रकार आहे? म्हणजे 'लयाला जात आहे काय?' किंवा 'लयाला चालली आहे काय?' यापैकी एक पाहिजे ना? नै काही लोक एक अक्षर इकडचं तिकडे झालं की आकांडतांडव करतात, त्यांच्या हे अजून लक्षांत कसें आलें नांही म्हणतों मीं?
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि गुरुवार, 11/12/2015 - 00:51 नवीन
९८१ भागिले ९ हा फसवा प्रश्न कसा काय म्हणता येईल ? साधा भागाकार आहे तो ! ! फसवा प्रश्न असा असतो --" एक चादर वाळण्यासाठी जर दोन तास लागतात , तर चार चादरी वाळण्यासाठी किती तास लागतील ? " यात सुद्धा उत्तर देणारा असा उपप्रश्न विचारु शकतो कि चारही चादरी एकाच वेळी वाळत घातल्या की वेगवेगळ्या वेळी ? " त्यानुसार उत्तर बदलू शकते ! !
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 11/12/2015 - 04:43 नवीन
म्हणजे आपल्यापुरता आपण ह्या धाग्याच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर मिळवलेलं आहेत- की स्मरणशक्ती लयाला जात चालली आहे का? तर नाही, ती आधीच लयाला गेली आहे. जितक्या लोकांना हा प्रश्न विचारलात त्या सगळ्या लोकांची स्मरणशक्ती नष्ट झालेली आहे, म्हणूनच त्यांनी या साध्या भागाकाराचं चुकीचं उत्तर दिलं ना? माझं म्हणणं बरोबर आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा