शब्दात नाही गुंतायचं!
कशाला कुणाला दुखवायच?
शब्दांच्या जाळ्यात अड़कायच?
थोड़ स्वतःत राहायच...
जगण सुंदर करायच!
निसर्ग... प्राणी... पक्षी असतात;
ते कुठे आपल्या भाषेत बोलतात?
स्वतःत ते मग्न असतात..
त्याचं जगण सुंदर करतात!
त्यांच्याकडून थोड़ शिकायच.
जगण्याला जीवन बनवायचं...
मात्र शब्दात न गुंतता...
आयुष्याला हिरवं बनवायचं!
💬 प्रतिसाद
(3)
ए
एस
Wed, 10/21/2015 - 20:03
नवीन
कवितेतला भाव छान आहे. पण कविता अजून खुलवता आली असती असे वाटले.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 10/22/2015 - 04:33
नवीन
शब्दांत नाही गुंतायच
हे शब्दांनीच का सांगायच?
पापण्यांची लवलव पुरे अन्
जरा ओठांनी हसायचं!
- Sandy
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
गुरुवार, 10/22/2015 - 08:30
नवीन
असं नाही लिहायचं
बोअर नाही करायचं
कशाला कुणाला दुखवायचं
बँडवीड्थ सेव करायचं..!
- Log in or register to post comments