तुझ्या आठवणीत. ..
सजलेेली लाट.. नटलेले पाणी...
तुझ्या आठवणीत गातो पुन्हा सुचलेली गाणी..
दुर उठलेल्या लाटेचे किनार्याशी गोड नाते..
ते पाणी खारट थोडे अमृताहुन ही गोड वाटे..
ओल्या सांजवेळी किरणे वाळुत शिंपडावी..
ध्यानी मनी नसताना तु किंचीत जवळ यावी...
मी बावरताना.. तुला लाज यावी...
विसरून जग सारे तु कुशीमधे शिरावी...
हा माझाच भास होता ..पण हळूच जाग आली..
परतीच्या लाटेसवे आस वाहून गेली..
मन माझे फुलते आहे पुन्हा नव्या कळ्यांनी
तुझ्या आठवणीत गातो पुन्हा सुचलेली गाणी..
एकांतवेळी मने साथीत दंग व्हावी,
माडांच्या आडोशात प्रित दाटून यावी,
तुझ्या कुशीत असताना रात विसरुन जावी,
आशा ही मनाची स्वप्नात पुर्ण झाली,
उलटून रात सारी किंचित जाग आली,
मंञमुग्ध झालो त्या आसावल्या क्षणांनी अन्...
तुझ्या आठवणीत गातो पुन्हा सुचलेली गाणी..
… mahi Raj……
💬 प्रतिसाद
(1)
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 10/22/2015 - 18:16
नवीन
छान आहे
आवडली
- Log in or register to post comments