Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोडे, डोके, प्याला, आशा आणि निराशा..

न
निमिष सोनार
Fri, 10/23/2015 - 09:07
🗣 31 प्रतिसाद
जरा "डोके" चालवा आणि "कोडे" सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला "प्याला" आणि त्यासंदर्भातला "आशा"वाद/"निराशा"वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो. त्यानंतर आपण थोडे पुढे जाऊ आणि त्यात चार शक्यता येतात. (A) समजा एक आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो - (1) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही. (2) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो. (B) समजा एक निराशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा अपूर्ण" असे मानतो - (3) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही. (4) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो. मग A(1) आणि B(4) याना काय म्हणाल? आशावादी कि निराशावादी? आणि का?
वर्गीकरण
कोडे

प्रतिक्रिया द्या
6597 वाचन

💬 प्रतिसाद (31)
य
याॅर्कर Fri, 10/23/2015 - 09:21 नवीन
B4 म्हणजे आशावादी विचारांचा कर्तबगार प्राणी. म्हणतात कि"ठेविले अनंती तैसेची रहावे"हे प्रचंड गैरलागू होणारं वाक्य आहे सध्याच्या काळामध्ये.
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Fri, 10/23/2015 - 09:29 नवीन
A -1 शामच्या आइचा नको इतका प्रभाव असणारा माणूस. (अप्रत्यक्ष निराशावादी) B -4 यु कॅन विनचा नको इतका प्रभाव असणारा माणुस. (अवास्तव आशावादी) A -1 भाहेरच्यांना सुखीप्राणीच भासेल B -4 अंतर्बाह्य असंतुष्ट भासेल पण शक्य आहे.. ही कूड विन अ लॉटरी.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/23/2015 - 10:01 नवीन
ही सगळी चर्चा करताना ग्लासातल्या द्रवाच्या चवी बद्दल कोणीच बोलत नाहीत. नुस्ती चर्चा अर्धा भरलाय की रीकामा आहे यावरच. त्यातून तहान भागणार नाही. फक्त कंठषोश होणार. आयुष्य चवीनं जगणारे असल्या चर्चेत भाग घेत नाहीत.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 10/23/2015 - 11:42 नवीन
विजुभौ शीं दणकुन सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
निमिष सोनार Fri, 10/23/2015 - 12:57 नवीन
एकदम "दणकून" सहमत झालात तर, प्याला "दाणकन" आपटून फुटेल ना? हो नं तं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
न
निमिष सोनार Fri, 10/23/2015 - 12:57 नवीन
दीरानं नाही. चुकून टाईप झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार
न
निमिष सोनार Fri, 10/23/2015 - 10:19 नवीन
प्रतिसाद द्या ... मजेनं!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 10/23/2015 - 10:39 नवीन
निसो रॉकस वाचक शॉक्स !!!!!
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Fri, 10/23/2015 - 10:45 नवीन
जर दारुचा असला तर ?
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Fri, 10/23/2015 - 11:31 नवीन
ग्लासात अजून काहीतरी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारूला तूर्तास बाजूला सारू. आपण दारू ला बाजूला सारू !!
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Fri, 10/23/2015 - 11:38 नवीन
चला कविता करू!!!! चला कविता करू!!!! दारूला तूर्तास बाजूला सारू! पाण्याची शक्यता गृहीत धरू! चर्चेच्या विषयावर नका हो पांघरून धरू! ग्लासाकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा धरू! फरक पडत नाही ग्लासात पाणी असो कि दारू? तरीही ग्लासातल्या द्रव्याबद्दल चर्चा होत राहिली मी तरी काय करू?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 10/23/2015 - 11:41 नवीन
निसोभाऊ, यात "पेल्यातलं द्रव्य हवंहवंसं आहे" हे लपलेलं गृहितक आहे. जर पेल्यात कोणतंतरी नकोसं द्रव्य आहे असं मानलं तर ए१ ते बी४ पर्याय तेच राहतील का?
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Fri, 10/23/2015 - 12:58 नवीन
सांगा तसं!
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Fri, 10/23/2015 - 13:56 नवीन
निरर्थक चर्चा टाकु नका इतकाच त्याचा मतितार्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार
त
तर्राट जोकर Fri, 10/23/2015 - 15:02 नवीन
अर्धा पेला हे उदाहरण भल्याभल्यांना गंडवत आलेलं आहे. अर्धा पेला हे मानवी जीवनाचं प्रतिबिंब आहे. दु:ख आणि सुख अशीच हातात हात घालून असतात. जीवनात, प्रत्यक्ष आयुष्यात कायम एका डोळ्यात हसू दुसर्‍यात आसू असे असते. त्याकडे पाहण्याचा कुणाचा काय दृष्टिकोन असावा ह्यासाठी कुणीतरी हे अर्धापेला उदाहरण काढले. इथे तो भरावा, रिकामा करावा इत्यादी प्रकार नाहीयेत. फक्त कसे बघावे हाच मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे बाकीचे प्रश्न गेले खड्ड्यात. उदा. १. तुमचे शिक्षण झाले पण नोकरी नाही. २. तुम्हाला नोकरी आहे पण तुमचे लग्न झाले नाही. ३. लग्न झाले पण मूलबाळ नाही. ४. मुलगा आहे पण अपंग आहे. ५. अपंग आहे पण अतिशय हुशार आहे. ही सगळी पाचही उदाहरणे अर्धापेल्याची आहेत. यातल्या कोणत्याही एका विधानामुळे दुसर्‍या विधानाच्या अर्धपेला असण्यात फरक पडत नाही. त्यामुळे पेला भरण्याचा वा रिकामा करण्याचा प्रश्न येत नाही. जेव्हा भरायला जाल तेव्हा तो परत अर्धाच होत आहे हे लक्षात येत जाईल. जे सतत भरायला जातात तेही रडतात, रिकामा करायला जातात तेही रडतात. खुश तेच राहतात जे या फंदात पडत नाहीत. तेव्हा साक्षीभाव ठेवून पेल्याच्या अर्धा भरलेला असण्या-नसण्याने मनावर परिणाम करून घेण्यापेक्षा आयुष्य मजेत जगा.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 10/23/2015 - 17:43 नवीन
तर्राट जोकर यांच्या अतिशय समंजस प्रतिसादाशी प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Sat, 10/24/2015 - 08:22 नवीन
अर्ध्या पेल्याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे टमरेल गळकं आहे आणि तुम्हाला बद्धकोष्ठ आहे. वेळेत उपयोग केला नाही तर पंचाईत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 14:58 नवीन
खरेसाहेब, उदाहरण चुकतंय असं वाटतंय.... टमरेल गळकं असणं आणि बद्धकोष्ठ असणं यातली नेमकी कुठली गोष्ट चांगली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Sat, 10/24/2015 - 19:48 नवीन
वा वा! मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
क
कंजूस Fri, 10/23/2015 - 16:17 नवीन
सगळी गणेश लेखमाला वायाच गेली की काय? मला काथ्याकूट नाही करायचा मला अभ्या.. व्हायचंय. घ्या A/B १,२,३,४ वगैरे आकडे टाकून.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 10/23/2015 - 19:19 नवीन
कंजूस काका नका बनू अभ्या. . आईबापाला तरास पोरगे असे का जगते. भावाबहिणीला चिंता ह्याचे कसे व्हायचे. मित्रांना काळजी हा अजून काय करतो की म्हणून. होणारी बायको तर धसका घेऊनच. मिपावाल्याना काळजी हा उद्या बॅनर करतो की नाही म्हणून. बुवांना काळजी अजून कसला फोटो टाकेल म्हणून. . एवढे अपेक्षांचे प्याले रिकामे ठेवून आपला पेला भरत बसायला लैच कोडगे मन लागते बहुतेक :( असो चीअर्स.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्यारे१ Fri, 10/23/2015 - 19:31 नवीन
अभ्या.. लेका आता घेतलाय ना वसा. सोडायचा नाय. बाकी तू ये तुला फुकट देईन म्हणून 'आपली' कुठंही धंद्याला लावू नकोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मार्मिक गोडसे Fri, 10/23/2015 - 18:13 नवीन
. जे सतत भरायला जातात तेही रडतात, रिकामा करायला जातात तेही रडतात. खुश तेच राहतात जे या फंदात पडत नाहीत
. आवडले आणि पटलेही.
  • Log in or register to post comments
म
म्हसोबा Fri, 10/23/2015 - 19:34 नवीन
तुमचा प्याला (कुठला ते विचारू नका) रिकामा आहे म्हणून असे काथ्या कुटत आहात. प्याला अर्धा जरी भरला असता तर काही अर्थपुर्ण लिहिले असते तुम्ही. :)
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Sat, 10/24/2015 - 03:35 नवीन
आमच्या पोटापाण्याचा विषय अन आम्हीच बोलणार नाही, असे होईल? ग्लास अर्धा आहे की पुर्ण हे संध्याकाळी सहा ला बसले की ८ पर्यंत येणाऱ्या उन्मनी अवस्थेत ठरवावे , गिर्हाइके तर ते ठरवू शकत नाहीत मग आम्ही त्यांच्या गाडीच्या किल्या ठेऊन घे किंवा विमान झाले असल्यास ते लँड कर असे प्रयोग करतो (बाराश्रमाधिपति) नाना स्कॉच (सिंगल मॉल्ट पंथीय)
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Sat, 10/24/2015 - 07:57 नवीन
प्याल्याचा आकार काय ? आत काय आहे ? सर्वसाधारण ग्लास हा ३०० ते ३६० मी लि असतो - म्हणजे हाफ झाली कि ?? किती लोक एकही हल्फ खाली करून ऎक्दम पितात ? सो चीप !! म्हणून चांगली सिंगल malt जरी नीट घेणार असले तरी ( शॉट ग्लास मासेल तर) ग्लास फार थोडा भरावा लागतो .... त्यामुळे A(1) छोट्या ग्लास मध्ये सिंगल maltपतियाला पेग बनवून पीत असावा .किंवा १२० मी लि - तो सर्वांवर खुश आहे . B(4) ची बैको बघत असेल आए तिने त्याला १ च "ग्लास " प्याची परवानगी दिली असेल . दुसरा नाही . म्हणून तो मोठ्यात मोठा ग्लास बनवायचा प्रयत्न करीन असेल . ( असे माझे झाले होते - बायको घरी ऎकच ग्लास प्याची पेर्मिस्सिओन द्याची तेवा मी अक्खी क्वार्टर ओल्ड मंक ची कोला मिसळून मोठ्या बिअर ग्लास मध्ये प्यायचो )
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/24/2015 - 08:04 नवीन
बाळ निम्मू... झालं - की सांग हं!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/24/2015 - 08:14 नवीन
वरच्या प्रति सादात माई मोड़ ऑनऑफ़ गृहीत धरावा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभ्या.. Sat, 10/24/2015 - 08:17 नवीन
आम्ही तुम्हालाच गृहित धरलय. लिव्हा काय बी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 08:25 नवीन
मग आपण धुवायला बोलवू कोणालातरी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ह
होबासराव Mon, 10/26/2015 - 11:37 नवीन
बाळ निम्मू... झालं - की सांग हं! :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा