चापण्याचा हव्यास
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
कळले मग~ मजला~ की, तो गळ्याचा फास होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे
बा~यको अन् माझे~ होते, प~क्ष वे~गवेगळे
ती~ उपाशी ठेवू पाही, खाणे~ मज, जल्लोष होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता
वा~टला जो स्वाद मजला, अजीर्णाचा नाद होता
पो~कळितल्या खर्जातुनी, तक्रारीचा आवाज होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो
सुगंधावर त्यां पक्वानांच्या, भाळूनी मी आनंदलो
रक्तांत जमल्या शर्करेचा तो मुका आक्रोश होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
जगुनी खाण्या, खाऊनी जगण्या, पिसे मला ते लागले
जगुनी खाण्या, खाऊनी जगण्या, पिसे मला ते लागले
म्हणे अरुण~ तो~ जिभेचा, फुकट अट्टाहास होता
जिभे~स ह्या वेळोवेळी चा~पण्याचा हव्यास होता
💬 प्रतिसाद
(11)
द
दमामि
Fri, 10/23/2015 - 12:09
नवीन
कच्चा माल!!!!
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 10/23/2015 - 12:18
नवीन
काय दमामि, आज बर्याच दिवसांनी उगवला/ली/ले त?
- Log in or register to post comments
द
दमामि
Fri, 10/23/2015 - 12:33
नवीन
अरे सुडूक , जिलबी पाडण्याइतके घट्ट पीठ दुर्मीळ झालय रे!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 10/23/2015 - 13:08
नवीन
+१
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sat, 10/24/2015 - 22:30
नवीन
ही ~ भानगड काय आहे~ ... आपलं... ?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 10/25/2015 - 02:29
नवीन
डाइबेटिक अरुणनाद { आर्त~नाद }.
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Sun, 10/25/2015 - 02:00
नवीन
काय कविकल्पना वैगेरे असते का नाय?
इतकेही दगड नाहीय हो आम्ही!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 10/25/2015 - 04:40
नवीन
हे कशाच विडंबण आहे.
मस्त वाटलं!
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 10/25/2015 - 07:16
नवीन
'~' याच्या अतिरेकामुळे तुमची टपरी बसली. एरवी इतके चांगले लिहिता, हे मध्येच काय झालं तुम्हांला?
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Sun, 10/25/2015 - 07:50
नवीन
आमच्या एका मित्राने "मनास ह्या काहीतरी, शोधण्याचा ध्यास होता" ही सुंदर गझल लिहीली. तिला संगीतात सजवून एक सुरेल गाणे दुसऱ्या मित्राने तयार केले, व ते आमच्या येथील गायिकेने "काव्यस्वरांजली" ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात गायिले. ह्यात आमच्या शब्दगंध ह्या स्वरचित कविता गटाच्या कविताना इथल्या संगीतकारांनी संगीत बद्ध केले होते.
त्यातल्याच एका गझलेचे हे विडंबन.
~ चिन्ह हे गाणे गाताना स्वर लांबविण्यासाठी दिले आहे.
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Sun, 10/25/2015 - 20:21
नवीन
खाणे,मुळे कमी होईल इतरत्र पहाणे,हा 'त्यांचा' कयास होता
नाहीतरी कोणता शौक आम्हास ह्या वयास होता
वाटले मग मजला की, तो सोन्याचा घास होता
पण कारण हेच जाण्या अवतार लयास होता.
(बसवा ठोकून मीटर मध्ये)
- Log in or register to post comments