Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असे का ते सांगाल का ??

म
माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/24/2015 - 13:58
🗣 13 प्रतिसाद
(आमच्या काही परममित्रांच्या प्रोत्साहनातून हा धागा उजवला गेला आहे… कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही ह्याची नोंद घेण्यात यावी… ) तर मुख्य मुद्दा असा की ब्राह्मण (बोलीभाषेत "बामण") आणि त्यांच्या जीवनमूल्यांवर आणि एकूणच स्वभाववैशिष्ट्यांवर राळ उडवणे हा सध्या बऱ्याच ठिकाणी प्रचलित असलेला प्रकार आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे या समाजावर भाष्य करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज लागत नाही तसेच त्याला कोणत्याही कायद्यान्वये अथवा संविधानात बंदी घातली गेलेली नाही. ब्राह्मण समाज सोशिक, मितभाषी आणि सहनशील असून इतरांना तोशीस न लागू देता आणि कोणत्याही आधाराशिवाय आपली प्रगती करीत आहे तसेच सद्य परिस्थितीत शब्दशः अल्पसंख्याक असून तो इतर समाजाशी नेहमीच मिळून मिसळून राहतो… गमतीची गोष्ट म्हणजे ब्राह्मणांवर शरसंधान करणारे मात्र सोयीस्कररीत्या आपल्या मुलाने ब्राह्मणाची मुलगी प्रेमविवाहातून सून म्हणून आणली किंवा आपल्या मुलीने ब्राह्मण नवरा केला हे अभिमानाने सांगत असतात ( आता ह्यात काय अभिमान असतो ते देवच जाणे !) माझ्या पाहण्यात अशी कित्येक उदाहरणे आहेत की ज्या लोकांनी आयुष्यभर ब्राम्हणांना नावे ठेवलेली आहेत त्याचाच मुलगा किंवा मुलगी एखाद्या ब्राम्हणाच्या घराशी सोयरिक जुळवून आल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा सूरच बदलतो……… हे असे का बरे??

प्रतिक्रिया द्या
4298 वाचन

💬 प्रतिसाद (13)
न
नाना स्कॉच Sat, 10/24/2015 - 14:07 नवीन
ब्राह्मण समाज सोशिक, मितभाषी आणि सहनशील असून इतरांना तोशीस न लागू देता आणि कोणत्याही आधाराशिवाय आपली प्रगती करीत आहे तसेच सद्य परिस्थितीत शब्दशः अल्पसंख्याक असून तो इतर समाजाशी नेहमीच मिळून मिसळून राहतो… हे नक्की का? फ़क्त महाराष्ट्रियन ब्राह्मण समाजाबद्दल बोलता आहात का? ते तरी समंजस सोशिक वगैरे आपणहुन आहे का कायद्याचा दट्टा आहे म्हणुन? २०व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तरी ब्राह्मण सोशिक वगैरे होते का? ह्याची उत्तरे मिळाली की ठरवू काय ते ('सोम'वेदवेत्ता ब्राह्मण) नाना
  • Log in or register to post comments
प
पीके Sat, 10/24/2015 - 15:54 नवीन
ख्खिक्...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
स
सायकलस्वार Sat, 10/24/2015 - 14:08 नवीन
हा धागा उजवला गेला आहे>>> वा वा! पेढे कुठायेत??
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 10/24/2015 - 14:10 नवीन
आहेत हो आहेत. आक्शी सौदीच्या विहिरी आहेत. पण आता आम्ही नाही पाच दिवस... तोवर चालुदे, उदे गं अंबे उदे!
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 10/24/2015 - 14:16 नवीन
जाता जाता एक निरिक्षण नोंदवुन जातो: आरक्षण मागणारे आपल्या जातीतल्या अतिगरिब लोकांचे दाखले देऊन (धनदांडगे व सुखवस्तू लोकांना लपवून) आपला समाज कसा गरिब आहे हे दाखवत असतात. त्याच्या उलट आरक्षणास विरोध करणारे त्याच समाजातल्या धनदांडग्या आणि लाभार्थ्यांकडे बोट दाखवून आरक्षणाचा दावा कसा फोल आहे हे दाखवत असतात. अनंत काळ चालत आलेल्या चर्चा बघता ह्या देशात सगळ्या जातीधर्मात केवळ 'सगळे गरिब, सोशिक, शांतीप्रीय, अन्यायग्रस्त व सहिष्णु' लोकच राहत आले आहेत असे ठाम मत बनत चालले आहे. :-)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 10/24/2015 - 14:19 नवीन
आधी नेमक ठरवा हे कोण ब्राह्मण(बामण ) आहेत?? कोकणस्थ ,देशस्थ,सारस्वत,घाटावरले,यर्जुवेदी,ऋग्वेदी?? नंतर बाकीच पाहु! (काडी बामण)जेपी
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Sat, 10/24/2015 - 14:21 नवीन
तुम्हाला कंप्लीमेंट्री मसाला पापड ३ (अक्षरी तीन फ़क्त) अन सोडा बॉटल ऑन द हाउस!! करा चैन !! (खट्याळ साकिया) नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/24/2015 - 14:57 नवीन
हा विषय अनेकदा चावून चावू चोथा झाला आहे, हे मिपावरच्या इयत्ता "दुश्ली क" मधल्यांना पण माहीत आहे. तेव्हा, प्रतिसादांचा खच पडेल असे वाटत असल्यास, शुभेच्छा ! Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 10/24/2015 - 16:11 नवीन
काय तीट लाव्लाय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आदूबाळ Sat, 10/24/2015 - 17:01 नवीन
चला दोनशे बोला, दोनशे दोनशे... दोनशे एक. दोनशे दोन. है कोई मा० का ला० ?
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/25/2015 - 09:39 नवीन
बरंय....ह्यातच आलं सगळं.....!!
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Sun, 10/25/2015 - 15:24 नवीन
माझ्या पाहण्यात अशी कित्येक उदाहरणे आहेत की ज्या लोकांनी आयुष्यभर ब्राम्हणांना नावे ठेवलेली आहेत त्याचाच मुलगा किंवा मुलगी एखाद्या ब्राम्हणाच्या घराशी सोयरिक जुळवून आल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा सूरच बदलतो………
हे प्रत्यक्ष जिवनात घडलेले मी ३-४ वेळा बघितले आहे. त्यांच्या बोलण्याचा सूर खरोखरच बदलला, पण काही महाभाग असे दिसले की असे होउनही त्यांची सोयरीक असलेले कुटूम्ब सोडले तर पुन्हा ब्राम्हण समाज्याबद्दल अढी मनात आहेच. मला वाटते, ब्राम्हण आइ वडीलांपोटी जन्म म्हणजे उच्च जातीत जन्म हा धार्मीक (?) समज्/गैरसमज, त्याचबरोबर ब्राम्हण समाजातील अनेकांचा इतर समाजातील अनेकांबाबत अनुभवलेला तुच्छतेचा द्रुश्टीकोन, उघडा पडणारा साळसुदपणा व त्यातुन या समाजाबाबत निर्माण झालेला तिटकारा व उच्च्तेच्या कल्पनांच्या चित्र विचीत्र मिश्रणातुन लेखक म्हणतो तशा भाव भावना अनेकात तयार होताना बघितले आहे. लेखकाला याबाबत भारतीय समाजाने आत्मपरिक्षण करायची गरज वगैरे वाटत आहे का की तो असा का वागत आहे म्हणून ?
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Sun, 10/25/2015 - 15:36 नवीन
आणि हो ब्राम्हण समाज अत्यंत हुशार आहे हा ही एक समज्/गैरसमज एक घटक म्हणून वरच्या विधानातील चित्र विचीत्र मिश्रणाच्यानुशंगाने विचारात घ्यावा लागेल/ घेतला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा