नागाला दुध पाजण्याची आहे आपली रिती
शत्रूच्या गोळ्यांनी
शहीद सैनिक किती.
ओघळणाऱ्या रक्ताची
किंमत शाई पेक्षा कमी.
कसुरी नागाने
विष ओकले किती.
दही -दुधाच्या नवैद्य
आनंदी दाखविला जी.
शिवबाची लेकुरो हो
कशाला करता राडा.
गुलाम संगीत ऐकुनी
ताल धरा हो त्यावरी.
एका गालावर चापटी
दुसरा गाल पुढती.
नागाला दुध पाजण्याची
आहे आपली रिती.
आपण मात्र त्यांच्या कलाकारांचे पायघड्या घालून स्वागत करतो आणि त्यांच्याद्वारे अप्रत्यक्षरित्या अतिरेक्यांना मदत करतो.हे कस काय होत नेमकं ? मी गुलाम अली यांच्या गाण्याचं तिकीट काढुन जातो. पैसा इथले आयोजक तबलजी त्यांचे गुलाम अली आणि मंडळी इ. संच आदित विभागला जातो. अतिरेकी कुठे आले एकदम मध्येच ? कळल नाही जरा विस्त्तार करता का ?