Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घरचा बगिचा

स
सखारामगटणे
Sun, 10/25/2015 - 09:50
🗣 28 प्रतिसाद
अलिकडे घरांमध्ये छोटेखानी बाग बनवण्याचा ट्रेंड वाढत आहे . ह्या मागणीला अनुसरून मी व माझ्या काही मित्रांनी अश्या सर्व होतकरू लोकांसाठी एका सुविधा सुरू करण्याचे योजले आहे . नवीन बाग करू इच्छिणार्या बऱ्याच लोकांना येणार्या काही अडचणी ज्या आम्हाला दिसल्या विविध लोकांशी बोलल्यानंतर त्या खालील प्रमाणे १. शात्रीय पद्धतीने पण रासायनिक खाते न वाप्राता झाडांची काळजी कशी घेतली जाऊ शकते २. शोभेची बाग बनवण्यापलीकडे उपयुक्त वनस्पतींची मी घरी लागवड करू शकतो का ३. जर अश्या झाडांची घरी लागवड केली तर त्यांच्यामधून पुरेसे उत्पादन मिळण्यासाठी कोणत्या प्रजातींची निवड केली पाहिजे? ४. चांगल्या दर्जाची सेंद्रिय खत कुठून मिळतील ५. दूर्मिळ औषधी वनस्पती किंवा गवती चहा etc सारख्या रोजच्या वापरातल्या वनस्पती घरी लावण्यासाठी त्यांची रोपे कुठे मिळतील आणि बरेच असे प्रश्न पडतात आणि आश्या लोकांचा उत्साह मावळतो . पण ह्या लोकांसाठी DIY Kit स्वरूपात बागकाम विषयक सुविधा मिळाल्या तर ते नक्कीच एक चांगली बाग बनवू शकतात. आम्ही सुरुवातीला ज्या सुविधा देणार आहोत त्या खालील प्रमाणे १. सर्व प्रकारची रोपे - शोभेची , औषधी , फळे व भाज्या २. सेंद्रिय खत आणि इतर गोष्टी ज्या तुम्हाला झाडांची काळजी घेण्यासाठी लागू शकतात ३. on demand माळी सर्विसेस ४. माती व कुंड्या उपलब्ध करणे DIY kit example: गव्हांकूराच्या आठवड्याच्या लागवडीसाठी लागाणार्या सर्व गोष्टी,फ़ुलपाखरांचे संगोपन आणि त्यांना पुरक झाडे हे सर्व सध्या पुणे शहरासाठी प्रायोगिक तत्वावरती राबवणार आहोत. पुर्ण प्रकल्प for profit असला तरी आम्ही ह्याकडे एक फक्त बिझनेस म्हणून न पहाता घरगुती बगिचा ह्या विषयामध्ये disruption कसे आणता येइल ह्यासाठी प्रयत्नरत असू. मिसळपाव वरती हा काथ्याकुट टाकण्याचा उद्देश असा की - १. हा उपक्रम susitanable बनू शकतो का ? २. जी आम्हाला गरज वाटते आहे ती खरच गरज आहे का? (तुम्हाला ही अश्या अडचणी येतात का ?) ३. ही सुविधा परिपुर्ण्र होण्यासाठी अजून काही गोष्टीं चा वरील सुविधांमध्ये अतंर्भाव करावा असे तुम्हाला वाटते

प्रतिक्रिया द्या
8598 वाचन

💬 प्रतिसाद (28)
म
मारवा Sun, 10/25/2015 - 10:39 नवीन
पुर्ण प्रकल्प for profit असला तरी आम्ही ह्याकडे एक फक्त बिझनेस म्हणून न पहाता घरगुती बगिचा ह्या विषयामध्ये disruption कसे आणता येइल ह्यासाठी प्रयत्नरत असू. महोदय मी आपले विचार समजु शकलो नाही. डिसरप्शन कसे म्हणताय ? तुम्हाला काही दुसर सुचवायच आहे का ? माझ्या मामुली इंग्रजी ज्ञानानुसार Disruption म्हणजे disturbance or problems which interrupt an event, activity, or process. उदा. "the scheme was planned to minimize disruption" तुमचा उद्देश असा नसावाच बहुधा नेमकं काय म्हणायचय ?
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Sun, 10/25/2015 - 15:42 नवीन
त्यांना डिस्रप्ट अथवा डेसरप्टीव म्हणायचे असावे... ज्याचा सर्वसाधारण अर्थ इमर्जिंग टेक्नोलोजी असा गृहीत धरला जातो, थवा जे आहे ते सोडुन काहीतरी नवीन तयार करणे ( बोलेतो इनोवेशन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सखारामगटणे Sun, 10/25/2015 - 17:36 नवीन
exactly! धन्यवाद बाहुबली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
क
कंजूस Mon, 10/26/2015 - 03:06 नवीन
pathbreaking नवीन पायंडा, out of the rut चाकोरीबाहेर, groundbreaking संपूर्ण नवीनच नाहीतर सरळ diversionचालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
म
मारवा Sun, 10/25/2015 - 18:20 नवीन
बाहुबली जी गटणे जी धन्यवाद लक्षात आणुन देण्यासाठी माझा गैरसमज झाला अर्थाविषयी तुमची कल्पना रोचक वाटली.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 10/25/2015 - 18:41 नवीन
घरातल्या बगिच्यासोबत घरगुती बायोगॅस सिस्टम सुद्धा द्यावी. जेणेकरुन घरातील कुजणारा कचरा योग्य तर्‍हेने वापरला जाईल आणि घरातल्या बागेला उत्तम असे द्रवरुपी खतसुद्धा मिळेल. बगिचा पारंपारिक पद्धतीने फुलवण्यापेक्षा गॅलरी, रेलिंगवर बॉटल गार्डन सारख्या संकल्पना राबवून पहा. कमीत कमी वेळ देऊन उत्तम असा बगिचा कसा फुलवता येईल याबद्दल प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करा.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/26/2015 - 06:13 नवीन
पिगू शेठ असा प्रकल्प कुठे केला कार्यरत आहे या बाबत मला आपले मार्गदरशन हवे आहे कृपाभिलाषी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Mon, 10/26/2015 - 09:20 नवीन
नाखु, तुम्ही बायोगॅस सिस्टम घरीच बनवू शकता. अधिक माहितीसाठी खालील व्हीडियो पहा: https://www.youtube.com/watch?v=9kKRdlAFuZw बॉटल गार्डन घरीच बनवणार होतो, पण आमच्या मातोश्री आणि सौ यांनी मिळून सगळा उपक्रमच हाणून पाडला. बॉटल गार्डनसाठी जुन्या शीतपेयाच्या प्लास्टिक बाटल्या वापरणार होतो आणी नेमका तोच स्टॉक मातोश्रींनी भंगारवाल्याकडे सुपूर्द केला. अधिक माहिती खालील दुव्यावर मिळेलचः https://www.youtube.com/results?search_query=bottle+garden मी जरा वेगळी पद्धत वापरणार होतो. इतकाच फरक आहे. एक दोन दिवस मोकळा वेळ मिळाला, तर बॉटल गार्डन तयार करुन सविस्तर माहिती इथेच डकवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ए
एस गुरुवार, 11/05/2015 - 06:06 नवीन
प्रतीक्षेत. कधी लिहिताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू गुरुवार, 11/05/2015 - 07:07 नवीन
तुम्हाला बरेच दिवस वाट पाहायला लागेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sat, 06/04/2016 - 09:07 नवीन
काही अपडेट्स असतील तर कृपया द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
अ
असंका Mon, 10/26/2015 - 06:51 नवीन
भारी आयडीया!!! आत्ता अ‍ॅमेझोन वर बघितलं ५ किलो माती दोन्शे एक्काहत्तर रुपयाला! वर एकशेपन्नास रुपये पोस्टेज! म्हणजे आपण जे अन्न खातो त्यापेक्षा महाग ही माती विकली जातीये!! खतं बितं वेगळी! हौसेला मोल नाही त्यामुळे प्रोस्पेक्ट्स चांगले असावेत. अर्थात हे वरवरचं मत झालं. तुम्ही पायलट रन करताय तेच योग्य!! थोडी अवास्तव अपेक्षा वाटेल, पण आता बाकी सगळं इथे पब्लिकली सांगित्लंच आहेत, तर पायलट रनचे सुरुवातीचे निकाल कसे आलेत तेही सांगता आलं तर बघा. अजून सुविधा म्हणजे, बगिच्यातल्या जास्तीच्या पाण्याचं ड्रेनेज. त्याची काय सोय करता आली तर बघा. प्रकल्पासाठी अनेक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 10/26/2015 - 09:36 नवीन
उपक्रम खूप चांगला आहे . आज याची खूप गरज आहे . काही सुचना/ मते/ शंका १ कुंड्यां ऐवजी मागे कुणीतरी मिपावरच टाकल्यप्रमाणे अपसायकल केलेल्या वस्तू सुशोभीत करून वापरता/पुरवता येतील का ? २ घरातील ओला कचरा जर खत म्हणुन वापरायचा असेल तर त्याला वास येइल का? ३ ओल्या कचर्‍याची माती किंवा खत बनवणारे यंत्र देता येइल का?
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 10/26/2015 - 10:51 नवीन
१ कुंड्यां ऐवजी मागे कुणीतरी मिपावरच टाकल्यप्रमाणे अपसायकल केलेल्या वस्तू सुशोभीत करून वापरता/पुरवता येतील का ? कुंड्यांऐवजी तुम्ही शीतपेयांच्या मोठ्या बाटल्या, जुने प्लास्टिकचे ड्रम वापरता येतील. २ घरातील ओला कचरा जर खत म्हणुन वापरायचा असेल तर त्याला वास येइल का? ओल्या कचर्‍याची माती किंवा खत बनवणारे यंत्र देता येइल का? तुम्ही शुन्य कचरा प्रकल्प घरी राबवा. अधिक माहितीसाठी खालील दुवा पहा: http://wearable-tech-news.blogspot.in/2011/04/shunya-kachra.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्रमोद्तम्बे गुरुवार, 06/02/2016 - 16:09 नवीन
कुंड्यांऐवजी तुम्ही थर्मोकोलचे रिकामे चौकोनी रिकामे खोके वापरु शकता. ते वजनाने खुपच हलके तर असतातच शिवाय पाण्याने कुजतही नाहीत. मी माझ्या घराच्या गच्चिवर अशा खोक्यातुन मातीविरहित बाग फुलवली आहे. सोबत फोतो देत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/04/2016 - 07:55 नवीन
छान ! माहितीबदल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्तम्बे
P
palambar Mon, 10/26/2015 - 19:45 नवीन
उपयुक्त माहिति.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 10/27/2015 - 09:55 नवीन
सर्वप्रथम या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. खालील गोष्टी अतिशय आवश्यक आहे. १. आदर्श घरबाग लेखक श्री. नांगरे प्रकाशक कॉन्टिनेण्ट्ल प्रकाशन हे पुस्तक आणणे आणि वाचणे. २. फेसबुक वर सेंन्द्रिय परसबाग हा ग्रुप आहे त्याच्याशी सलंग्न होणे. ३. पुण्यामध्ये रु १०० मध्ये ५ किलो कम्पोस्ट खत मिळते. पत्ता नंतर कळवितो. ४. प्रयोग करत राहणे. काही माहिती हवी असल्यास व्यनि / मुख्य पानावर विचारणे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 11/04/2015 - 18:58 नवीन
ओला कचरा जर उन्हात कड़कड़ित वाळवला तर थेट कुंडित वापरता येतो. कोणतीही घाण येत नाही. यामागचे गणित असे की कचर्यात जवळजवळ ८०% पाणी असते . वाळवल्यावर २०% राहते . म्हणजेच एक किलोचा कचरा २०० ते ३०० ग्रामचा बनतो . तो तुम्ही फेकून दिलात तरी थोड्याफार प्रमाणात निसर्गाचे ऋण तुम्ही फेडलेले असते
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/04/2015 - 19:49 नवीन
ओक्के. ओला कचरा, म्हणजे गणपतीच्या दिवसात जमा झालेले निर्माल्य आम्ही भाज्या आणि फुलझाडांच्या कुंड्यांमध्ये घातल्यावर इतके किडे आणि चिलटे आली की अजूनही जात नाहीयेत. कढीपत्ता तरीही थंडीचा बाहेर नको म्हणून घरात आणल्यावर दोन दिवसात चिलटांचे घर होऊन बसले. शेवटी कुंडी पुन्हा घरातही नाही आणि बाहेर थंडीतही नाही अशा ठिकाणी ठेवावी लागली. अर्थात हे काही दिवसांपुरते असणार आहे. नंतर खूप थंडीत कुंडी घरातच आणावी लागेल. ओला कचरा सुकवून जर यात फरक पडणार असेल तर ठीक आहे, नाहीतर चिलटांचा फार त्रास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
प
पिंगू गुरुवार, 11/05/2015 - 07:05 नवीन
निर्माल्य ओले असल्यास चिलटांचा त्रास होणारच. तेव्हा निर्माल्य सुकवून वापरले, तर उत्तम. घरी मोठी आणि हवेशीर गच्ची असेल, तर ओला कचरा बारीक करुन बंद प्लास्टिकच्या पिंपात टाकून त्यापासून खत बनवू शकता. अधिक माहितीसाठी संदीप चव्हाण यांचे डॉ. बगिचा हे ईबुक वाचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कलंत्री Fri, 11/06/2015 - 12:38 नवीन
ओला कचरा उन्हात आणि पावसात भिजायला नको. आवश्यक तितका ओलावा असणे आवश्यक आहे. कचरा कुजणे अत्यावश्यक आहे. त्यात किडे, चिलटे, गांडूळे होणे सुद्धा गरजेचे आहे. त्यासाठी गच्चीवर अथवा एखाद्या कोपर्‍यात असा कचरा कुजवायला हवा. अश्या ठिकाणी सुक्ष्म पर्यावरण होत जाते. उन्हात सुकलेला कचरा सुध्दा जमिनीत कुजणे आवश्यक आहे. प्रयोगप्रेमी, कलंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
र
रुपी Wed, 11/25/2015 - 21:02 नवीन
दुव्यासाठी धन्यवाद पिंगू! रेवतीताई, मलाही वाटते की ओला कचरा पूर्ण कुजवून वापरला तरच चांगले. मी चार वर्षांपासून सगळा ओला कचरा बागेसाठीच वापरते. मिरचीचे एक देठसुद्धा वाया जाऊ देत नाही. आधी आम्ही बागेतच एक खड्डा करुन त्यात ओला कचरा टाकायचो. आता सिटीकडूनच "कंपोस्ट जार" मिळतात सवलतीत, तो वापरतो. तीन-चार दिवसांचा ओला कचरा टाकून मग वरुन वाळलेली पाने, गवत वगैरे. म्हणजे बागेत चिलटे, दुर्गंध असे त्रास होत नाहीत. पाऊस असेल तर ठीक, नाहीतर अधून-मधून पाणी घालतो आणि महिन्याभरातून एक-दोन वेळा काठीने जरा वर-खाली करतो. खड्डा पूर्ण भरला असेल तर मग काही आठवडे / महिने आणखी ओला कचरा न टाकता कुजू द्या. "जार" असेल तर त्यात काही काळाने खालून आधी तयार झालेले खत काढण्यासाठी झापड असते. पर्यावरणाचे रक्षण वगैरे आहेच, पण हे खत घातल्याने फळे जास्त मोठ्या आकाराची, रसरशीत; तसेच फुलेही उठावदार रंगाची, जास्त काळ टवतवीत राहणारी येतात, हे मी स्वतः अनुभवले आहे. खरे तर तयार झालेले खत बागेला पुरत नाही, त्यामुळे बर्‍याच वेळा शेजारुन-पाजारुन पण ओला कचरा आणावा की काय असे वाटते :) कूजवणे वगैरे नको असेल तर काहीजण ओला कचरा मिक्सरमध्ये अगदी बारीक करुन, बर्‍याच पाण्यात मिसळून ते पाणी कुंड्यांत घालतात. पण हे मी करुन नाही पाहिले. मागे "पलाश" यांनी "कंजूस" यांच्या धाग्यावर त्यांच्या प्रयोगांबाबत लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
भ
भंकस बाबा Fri, 11/06/2015 - 15:26 नवीन
वाळुन कोळ झालेला कचरा शेणखत व् माती समप्रमाणात वापरल्यास उत्तम परिणाम मिळतो. अर्धवट ओला कचरा हाताळायला घाण वाटतो
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 11/06/2015 - 15:32 नवीन
कांदा ज्या जाळीत येतो त्या जाळीत जर ओला भाजीचा कचरा जसे कोबी फ्लावर ची पाने , कांद्याची साले , भाज्याची साले व् देठ इत्यादी टाकून गच्चीवर वा छपरावर वाळवला तर दोन दिवसात उत्तमपैकी वाळतो. आणि कचरा इथे तिथे जाऊन त्रास ही होत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Wed, 11/25/2015 - 19:07 नवीन
कार वायपर्स,बॅटरी व टायमर्स वापरुन कुंड्यांना पाणी घालण्याची अॅटोमॅटीकयंत्रणा कोणी करुन देईल का? खर्चाचा अंदाज कळावा.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Wed, 11/25/2015 - 19:08 नवीन
कार वायपर मोटर्स म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 11/25/2015 - 21:10 नवीन
चांगला धागा... उत्तम चर्चा. प्रयोग करणार्‍यांनी अधिक माहिती चित्रांसह टाकायला हवी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा