Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तृतीय विश्वयुद्ध होणार का?

उ
उडन खटोला
Sun, 10/25/2015 - 18:38
🗣 66 प्रतिसाद
सीरिया मधील कलहात रशियाने उडी घेतल्याने आधीच चिघळलेली मध्यपूर्वेतील परिस्थिति स्फोटक बनली आहे . ज्या वेगाने रशियन सैन्य आणि रशिया-समर्थित बंडखोर आयसीस चा खातमा करीत आहेत ते पाहता आजतागायत " अमेरिका म्हणजे जगाचा तारणहार /रखवालदार " या भूमिकेला धक्का बसला आहे . किंबहुना अमेरिकेला खरोखरच इस्लामिक दहशतवाद संपवायची प्रामाणिक इच्छा आहे? की फकी दाणे टाकून कोंबड्या झुंजवत ठेवून तेल-उत्पादक देशांवर आपले व्यापारीक वर्चस्व राखायचे आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ... एकीकडे अमेरिका आणि रशिया एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुंतागुंतीच्या क्षेत्रीय हितसंबंधा मुळे या युद्धाचे स्वरूप अमेरिका विरुद्ध रशिया असे बनेल की काय ? अशी भीती वाटते . त्यातच इस्लामीक राष्ट्रांकडील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडणे आणि विश्वायुद्ध भडकल्यास दक्षिण कोरियाची आणि चीनची भूमिका काय असेल ? भारतावर या सगळ्याचा काय ,कसा व किती परिणाम होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ... आपणास काय वाटते ? खरोखर तिसरे विश्वयुद्ध होऊ शकते का?

प्रतिक्रिया द्या
12109 वाचन

💬 प्रतिसाद (66)
म
मदनबाण गुरुवार, 10/29/2015 - 02:41 नवीन
As China Warns Of War With US Over South China Sea, Australia Debate Naval Patrols In Support Of Freedom Of Navigation Australia delays naval exercise with China amid South China Sea escalation Australia Considering South China Sea Sail-Through Indo-Pacific security links: South China Sea, Asian missile race, Abe abroad and more US and Chinese navy chiefs to discuss South China Sea tensions – US official

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Truly Madly Deeply :- Savage Garden
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
पगला गजोधर Tue, 10/27/2015 - 10:48 नवीन
नही कुछ है होता…. और कुछ भी होना । तो गाओ खुशिसे, बजाकरके विना ।।
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 10/27/2015 - 14:22 नवीन
एकदा होउन जाउ दे तेज्यायला. त्यानिमित्ताने जगाची इकॉनॉमी जरा बुस्ट अप होईल. -_-
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 10/28/2015 - 11:48 नवीन
पूर्वीचे चिंतोपंत "द्या २-४ अणुबाँब टाकून" असे म्हणायचे त्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 10/28/2015 - 14:15 नवीन
तु टेक्नॉलॉजीचा इतिहास किती वाचतोस माहिती नाही पण एक गोष्ट सांगतो. जगातल्या मेजर शोध युद्ध संशोधनातुन लागलेले आहेत. आधी युद्धात आणि नंतर विधायक कार्यामधे वापर सुरु झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 10/30/2015 - 06:35 नवीन
माझा प्रतिसाद पहिल्या वाक्यासाठी होता
एकदा होउन जाउ दे तेज्यायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 10/29/2015 - 06:41 नवीन
हा आयसीस खुप कृर आहे असे वाचुन आहे.. ति लोक्स मुंडकी वगैरे उडवतात... त्याण्ची प्रेरणा घेत पुण्यात एकाने बायकोचे मुंडके उडवले व ते घेवुन तो रस्त्यात फिरत होता... हा आयसीस खुप कृर आहे असे वाचुन आहे..
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 10/29/2015 - 07:07 नवीन
हो ना अकुकाका. वाचून फार प्रेरणा घेतात लोक्स. तुमचे परमेशवराचे सुखद चमत्कार वाचायला द्यायला पाहिजेत खरेतर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
त
तुडतुडी गुरुवार, 10/29/2015 - 17:37 नवीन
भंकस बाबा म्हन्तायेत ते बरोबर वाटतंय असं म्हणायचं होतं हो
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/29/2015 - 18:53 नवीन
काय ठरलं मग? कधी करायचे सुरु?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 10/29/2015 - 22:14 नवीन
अरे यार प्रोजेक्टचं टेंडर फ़ायनल करायचं आहे. पुढच्या आठवड्यात पण नाही जमायचं. त्यापुढच्या आठवड्यात दिवाळी. नंतर लग्नाच्या वाढदिवसाला असलं काही नको,बायको मारेल. डिसेम्बर मध्ये सगळे क्रिसमस आणि न्यू इयर. जानेवारी पहिल्या नको दुसऱ्या आठवड्या आधी बोलू नकोस अज्जीबात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि Sat, 10/31/2015 - 12:55 नवीन
मी पण बघायला येणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ट
टवाळ कार्टा Sat, 10/31/2015 - 13:13 नवीन
मी पॉपकॉर्नचे दुकान लावणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्यारे१ Sat, 10/31/2015 - 13:38 नवीन
घ्या. हे आले लढाईच्या आधी राजीनामा देणारे शेंदाड शिपाई. तुम्च्या भरवश्यावर जानेवारी दुसरा आठवडा बोललो तर..... आता नवं कुणी रिक्रूट करावं लागेल, ट्रैन करावं लागेल... . ऑल मुसळ वेन्ट इन्टू द केर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
'
'पिंक' पॅंथर्न गुरुवार, 10/29/2015 - 21:02 नवीन
मी तुनळी वर रोज "X22 Report " असा एक साधारण ४० ते ४५ मिनिटाचा एक न्युज रिपोर्ट बघत/ऐकत असतो. हा रिपोर्ट "इकॉनॉमिकल कोलॅप्स" आणि "जीओपोलिटीकल न्युज" अशा दोन भागात असतो. रिपोर्ट सांगणारा " हाय माय नेम इज डेव्ह..... " अशी सुरुवात करुन अगदी जगाच्या कानाकोप-यातील घडामोडी सांगत असतो. त्या बातम्या आणि त्या डेव्हचे ते त्वेषाने सांगने ऐकुन रोज हा रिपोर्ट संपता संपता कदाचित तिसरे महायुद्ध सुरु होईल काय असं वाटायला लागतं. गेली दोन वर्षे हा रिपोर्ट मी रोज ऐकत आहे. पण एकंदर एकुणच परिस्थिती दिवसेदिवस स्फोटक बनत चालली आहे याची खात्री मात्र होते.. कालचा रिपोर्ट हा तिस-या महायुद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करणाराच होता... https://youtu.be/BMg92QkDoTM
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/30/2015 - 02:20 नवीन
अजुन एक त्याचा चॅनल आहे तो म्हणजे :- X22Report Spotlight मी सुद्धा काही काळा पासुन हा महाशय काय सांगतो ते अधुन मधुन सांगतोय ते ऐकत असतो. त्या बातम्या आणि त्या डेव्हचे ते त्वेषाने सांगने ऐकुन रोज हा रिपोर्ट संपता संपता कदाचित तिसरे महायुद्ध सुरु होईल काय असं वाटायला लागतं. हा.हा.हा... हे मात्रं खरंय. ;) काल त्याचे X22Report Spotlight मधले काही रिपोर्ट ऐकले, ते उत्तम वाटले आणि इथे दिले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Get Down :- Backstreet Boys
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा