Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्रीमी लेयर आणि आरक्षण : एक चर्चा

अ
अस्वस्थामा
Wed, 10/28/2015 - 12:28
🗣 148 प्रतिसाद
मला माहीत आहे की आरक्षण हा बर्‍यापैकी चर्चिलेला विषय आहे. पण असं वाटतं की बर्‍याचदा ही बाब भावनिक पद्धतीने मांडली जाते. म्हणजे असं की आरक्षणाचे हेतू तर नाकारता येत नाहीत, त्याचबरोबर त्या ध्येयाकडे जाताना थोडी दिशा भरकटलेली आहे हे ही तितकंच खरं आहे. आज हा विषय आठवायचे कारण म्हणजे, आज लोकसत्तामध्ये एक वाचण्यात आली ते अशी : ओबीसी नेत्यांच्या मुलांना आरक्षण नको! यावरुन असं वाटलं की आरक्षणावर समग्र विचार व्हायला हवा. आधीच्या चर्चा आणि त्यावरुन बनवलेल्या काही मतांवरुन "काय असावे" अशी मांडणी करुन बघायचा हा प्रयत्न आहे. हे मान्य की लगेच कोणी या बाबी अमलात आणायला जात नाही परंतु एक सर्वसमावेशक धोरण म्हणून, समाजहितासाठी म्हणून आरक्षण कसे असेल अशी चर्चा अपे़क्षित आहे. प्रथमतः एक मान्य बाब म्हणजे आऱक्षण कोठेही जात नाही आणि एक समाज म्हणून पुढील काही काळासाठी ते राहणार आहे हे इथे स्वीकारलेले आहे. त्यास सामाजिक, आर्थिक आणि राजकिय कारणे असतील पण ते राहू नये आणि समाजात किमान समतोल साधावा हाच त्यचा हेतू असेल हे महत्वाचं. १. जात ही फक्त जात प्रमाणपत्रावर नोंदलेली असावी. इतर ठिकाणी (शाळेचा दाखला इ. इ.) फक्त त्या प्रमाणपत्राचा नंबर वापरावा फारतर. पण कोठेही जातीचा उल्लेख हा जातीयता जिवंत ठेवण्यास मदतच करेल. (जातीप्रमाणेच धर्माचाही उल्लेख सरकारी कागदपत्रातून कमी झालेला पहायला आवडेल पण ते अवांतर इथे. ) २. सर्व आरक्षण प्रवर्गांसाठी क्रीमी लेयर ही अधोरेखित व्हावी. वरच्या बातमीनुसार ओबीसी या प्रवर्गासाठी क्रीमी लेयरची प्रस्तावित अट ही वार्षिक १० लाख उत्पन्नाची आहे (किती उत्पन्नाची अट हा वेगळा मुद्दा आहे आणि इथे त्यावर चर्चा अपेक्षित नाही. मुद्दा सर्वच प्रवर्गांसाठी ही क्रीमी लेयर लागू व्हावी हा आहे). ३. खुल्या प्रवर्गासाठी इबीसी ही एक रेखा आहे (जी क्रीमी लेयरपेक्षाही दारिद्र्य रेषेच्या जवळ जाणारी संकल्पना आहे) त्यांना ओबीसी अंतर्भूत करावे. ४. एकाच घरातील तीन पिढ्यांनंतर नोकरीतील आऱक्षण व उच्च शिक्षणासंदर्भातील आरक्षण व सवलती यांवर मर्यादा याव्यात (जर क्रीमी लेयर हा मुद्दा लागू होत नसेल तर). हे सहज आठवलेले आणि सुचलेले मुद्दे. अजून काही मुद्दे असतील तर स्वागत आहे. फारसं अवांतर, विखारी जातीय चर्चा होऊ नये व झालाच तर या संदर्भात दृष्टीकोन अजून स्पष्ट व्हायला मदत व्हावी ही अपेक्षा.

प्रतिक्रिया द्या
34633 वाचन

💬 प्रतिसाद (148)
ब
बॅटमॅन Fri, 10/30/2015 - 09:51 नवीन
इंडीड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
श
शब्दबम्बाळ Fri, 10/30/2015 - 11:04 नवीन
तुमच्या "पहिला ओपनसाठीची फेरी होते आणि ती संपल्यावर मग आरक्षित जागांसाठी फेरी होते?" या वाक्यासाठी काही संदर्भ असला तर द्या... मी अजूनपर्यंत तरी कुठलाही SC ST मधला मुलगा खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेऊन आलेला पहिला नाहीये, मुळात तो खुल्या प्रवर्गातून आला तर त्याला कुठलीही शैक्षणिक सवलत मिळणार नाही!(हे तुम्ही जास्त योग्यपणे सांगू शकाल असे वाटतंय!) कारण सवलत हि आरक्षित जागांसाठी आहे खुल्या प्रवर्गासाठी नाही... म्हणजे तो फी माफी आणि अनेक गोष्टींपासून दूर होईल, मला सांगा कोण आणि किती लोक असे करतील? आणि असे करणार्यांचे सध्य परिस्थितीत मी अभिनंदनही करू शकत नाही(माफ करा!) कारण असे केल्याने खुल्या प्रवर्गामधील एक जागा विनाकारण वाया गेली आणि राखीव कोट्यामधल्या जागा मात्र रिकाम्या राहत आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
क
कानडा Fri, 10/30/2015 - 11:25 नवीन
तुमच्या "पहिला ओपनसाठीची फेरी होते आणि ती संपल्यावर मग आरक्षित जागांसाठी फेरी होते?" या वाक्यासाठी काही संदर्भ असला तर द्या...
http://www.dtemaharashtra.gov.in/fe2015/StaticPages/HomePage.aspx हे महाराष्ट्र सरकार चे DTE चे प्रथम वर्ष अभि. साठीचे होम पेज. डाव्या बाजुला Information brochure ची लिंक आहे. ते brochure डाऊनलोड करा. त्याच्या पेज नं. २५ वर 7.1.3 Logic for Allotment: हे दिले आहे ते वाचा.
मी अजूनपर्यंत तरी कुठलाही SC ST मधला मुलगा खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेऊन आलेला पहिला नाहीये, मुळात तो खुल्या प्रवर्गातून आला तर त्याला कुठलीही शैक्षणिक सवलत मिळणार नाही!(हे तुम्ही जास्त योग्यपणे सांगू शकाल असे वाटतंय!) कारण सवलत हि आरक्षित जागांसाठी आहे खुल्या प्रवर्गासाठी नाही... म्हणजे तो फी माफी आणि अनेक गोष्टींपासून दूर होईल, मला सांगा कोण आणि किती लोक असे करतील?
तुमची दोन मुद्द्यांची सरमिसळ होतेय. जर विद्यार्थ्याने अर्ज राखीव जागेसाठी केला असेल तर त्याला कुठलीही जागा मिळाली तरी त्याला त्याच्या Original category नुसार सर्व सवलती मिळतात. त्याला फक्त open seat allot होते त्याची category बदलत नाही.
राखीव कोट्यामधल्या जागा मात्र रिकाम्या राहत आहेत!
सिलेक्टीव्ह कोट केल्याबद्दल क्षमस्व. पण राखीव कोट्यामधील जागा जरी रिकाम्या राहिल्या तरी त्या नंतर ओपन केल्या जातात. --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Sun, 11/01/2015 - 13:57 नवीन
संदर्भासाठी धन्यवाद! Information brochure वाचतोय! इंजिनीरिंगला प्रवेश घेतानासुद्धा प्रवेश प्रक्रियेचा इतका अभ्यास केला नव्हता! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
च
चंद्रनील मुल्हेरकर Sun, 11/01/2015 - 07:54 नवीन
याचाच अर्थ ४९ टक्के जागांसाठी स्पर्धक मात्र १००%>>>>>>>>>>>>प्रसाद बुवा, एकदा अर्ज करताना कॅट्यागिरी मेन्शन केली तर ती पुन्हा बदलता येत नाही, एक अर्ज कॅट्यागिरीतुन व लगेच दुसरा ओपन मधून असे होत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 11/02/2015 - 05:48 नवीन
२. ओपन सीट ऊपलब्ध असेल तर अर्ज जरी कुठल्याही कॅटेगरी मधुन केला असेल तरी ती त्या विद्यार्थ्याला मिळते. या केस मधे खुली सीट घेणे ही विद्यार्थ्याची चॉईस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
ए
एस Wed, 10/28/2015 - 20:24 नवीन
आरक्षणनिर्मूलनाप्रमाणेच एकदा जातनिर्मूलनावर चर्चा झालेली पहायची आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 04:47 नवीन
हिंदुस्तानी माणसांचे स्वभाव बघता.... कठिण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नाव आडनाव गुरुवार, 10/29/2015 - 05:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अस्वस्थामा गुरुवार, 10/29/2015 - 11:05 नवीन
जात ही फक्त जात प्रमाणपत्रावर नोंदलेली असावी. इतर ठिकाणी (शाळेचा दाखला इ. इ.) फक्त त्या प्रमाणपत्राचा नंबर वापरावा फारतर. पण कोठेही जातीचा उल्लेख हा जातीयता जिवंत ठेवण्यास मदतच करेल. (जातीप्रमाणेच धर्माचाही उल्लेख सरकारी कागदपत्रातून कमी झालेला पहायला आवडेल पण ते अवांतर इथे. )
पहिला हाच मुद्दा आहे. बर्‍याच जणांना त्यांची "जात" आणि तिचा significance पहिल्यांदा अ‍ॅडमिशनच्या बाजारात कळतो. आपण कुठल्या कॅटेगरीत येतो ते कळते. आमचा एक मित्र एका प्रथितयश डॉक्टरचा मुलगा म्हणून सगळे ओळखत होते शाळेच्या वर्षात. बारावीनंतर अ‍ॅडमिशनच्या वेळेस त्याला आणि इतरांनाही कळाले (खरंतर) सरकारने कळवले की त्याची जात काय आहे. हे इतरांपेक्षा त्याला स्वतःलाच खूप त्रासदायक होते ते ही चूकच (अर्थात त्याने म्हणून अ‍ॅडमिशन सोडली नाही हा भाग अलाहिदा. :) ). क्रिमी लेयर आणि जातीचा उल्लेख काढून टाकणे याचे दूरगामी परिणाम जात निर्मूलनासाठीच फायदेशीर राहतील असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
द
दिवाकर कुलकर्णी Wed, 10/28/2015 - 20:34 नवीन
शिक्षण ,नोकरी आणि समाजकारण या तिन्ही मध्ये स्वताच्या सोईन समाज त्याला वाकवतो,निवडणूक म्हणजे समाजकारण यात,क्रीमि लेअर हिशोबात घेतला जात नाही जातीचा शिक्का खरा खोटा पैदा करून तो गरजेप्रमाणं वापरायचा, इतके वर्षं रॉयल फ़ैमिली तल्याना आता क़ुणबी असल्याचे साक्षात्कार होतात, आरक्षणाची ऐंशी कि तैंशी होते मरतुकड्या घोड्यानी क़ायम मागंच रहायच असत
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 10/29/2015 - 06:17 नवीन
आरक्षण हे जातीय निकषावर न देता आर्थिक निकषावर द्यावे. म्हणजे त्याचा लाभ सर्व धर्माच्या व जातीच्या लोकांना होईल.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर गुरुवार, 10/29/2015 - 06:49 नवीन
आजकाल कोणालाही म्हणजे अगदी नवकोट नारायण श्रीमंत व्यक्ती जरी असेल तर त्याला एक लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळतो. आता हे आर्थिक निकष कोण ठरवणार? निकष ठरवणारेच विकले जातील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
स
सुबोध खरे गुरुवार, 10/29/2015 - 07:22 नवीन
योर्कर साहेब जो माणूस सरकारी नोकरीत आहे तो आपले उत्पन्न लपवणे शक्यच नाही. बाकी खाजगी नोकरीत किंवा व्यवसायाचे वेळेस आपण आज वार्षिक उत्पन्न एक लाखा पेक्षा कमी दाखवले तर ते आयकर विभागाकडे पाठवले जाईल. आणी मग २ वर्षांनी दोन कोटीचं घर घेतलं कि आयकर विभागाच्या डोळ्यात येइलच. एकदा चौकशी सुरु झाली कि सर्व घाण बाहेर येतेच. सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात निस्संदिग्ध शब्दात निकाल दिला आहे कि खोट्या प्रमाणपत्रावर मिळवलेला प्रवेश अवैध आहे आणि त्यातून मिळवलेली पदवी अवैध आहे. (यात जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्याने एका डॉक्टरची एम बी बी एस ची पदवी अवैध ठरवली गेली आहे) त्या डॉक्टरच्या वकिलाने आता पदवी मिळाली आहे तर ती असू द्यावी अशी विनंती केली होती ती न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळून लावताना काही मार्गदर्शक तत्वे उद्धृत केली आहेत. तेंव्हा खोटे प्रमाणपत्र मिळवुन आपण एखादी पदवी मिळवली तर ती २० वर्षांनी सुद्धा अवैध ठरण्याची शक्यता आहे. तेंव्हा लोक असे धंदे करताना दोनदा विचार करतील. याने हे सर्व थांबेल असा अंध विश्वास मला नाही पण त्याला काही प्रमाणात आळा नक्की बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर गुरुवार, 10/29/2015 - 07:41 नवीन
जातीचे माहित नाही पण उत्पन्नाचे खोटे दाखले तर लाखो जण काढून घेतात. आयकर विभागास हे माहित होणे अशक्य वाटते,मग कारवाई तर दूरच. आणि कारवाई झालीच तर 80% लोक्स सापडतील,उत्पन्नाचे खोटे दाखले असणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बबन ताम्बे गुरुवार, 10/29/2015 - 08:04 नवीन
मी हे ग्रामीण भागात पाहीले आहे. काहींच्या घरची बागायती शेती आहे. सधन आहेत.पण शाळेपासून ते इंजीनियरींग पर्यंत उत्पन्नाचे खोटे दाखले देऊन मुलांना इ.बी.सी. सवलत घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
स
सुबोध खरे गुरुवार, 10/29/2015 - 08:34 नवीन
योर्कर साहेब उत्पन्नाचा खोटा दाखला दाखविल्यास मिळालेल्या उत्पन्नावर कर आणी दंड भरून सुटता येते पण आपल्या मुलाची पदवी रद्द झाली तर आयुष्यातिल काही किंवा बरीच वर्षे पूर्ण फुकट जाऊ शकतात हे लोकांना समजल्यावर लोक थोडे तरी कचरतील. निर्ढावलेल्या लोकांना कशाचाच फरक पडत नाही ती गोष्ट वेगळी. शिवाय आज सरकारी नोकरीत गुणवत्ता नसूनहि आरक्षणामुळे बरेच लोक "वर" चढलेले आहेत ते सर्व यातून वगळले जातील. खाजगी नोकर्यात आरक्षण बढती साठी चालत नाही तेथे आपल्याला काम करावेच लागते. तेंव्हा तेथे असलेले (मागासवर्गीय) लोक हे बरेचसे अंगभूत गुणांमुळेच टिकून आहेत. पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा फायदा घेत राहिल्याने त्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 12:04 नवीन
खरेसाहेब, जिथे कुठल्याही व्यक्तिच्या हातात सरकारी अधिकार असतात तिथे भ्रष्टाचार हा ठरलेलाच. उत्पन्नाचे खोटे दाखले देणारे सरकारी अधिकारी आहेत म्हणून खोटे दाखले मिळतात. तेच मिळाले नाही तर प्रश्नच मिटतो ना? पदवी रद्द वैगेरे होणे ही फार पुढची आणि कठीण गोष्ट आहे, परत हेही कुणातरी माणसाच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून असेल. तो भ्रष्टच असेल तर न्याय्य वागणूक कशी मिळेल? यावर काहीतरी तांत्रिक उपाय हवा. त्याचाही कितपत उपयोग होइल देवजाणे. जसा रेल्वे रिझर्वेशन ऑनलाइन बूक करता येते. पण त्यातही लोक सिस्टममधे घोळ करून मलिदा कमावतातच. ऑनलाइन टेंडर पद्धत निघाली, त्यालाही योग्य पद्धतीने चुना लावण्यात आला. भारतीय माणूस हवे ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते (नियमबाह्य) करेल. पण नियमात बसणारे करण्यास लागणारे कमी कष्ट करण्यास तयार होत नाही. त्यांच्यासाठी सिस्टमला वाकवण्याचा कैफ काही औरच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 10/30/2015 - 05:23 नवीन
असेही उत्पन्नाचे दाखले खोटे मिळवणारे लोक जातीचेही दाखले खोटे मिळवतातच की लोक नियम मोडतात म्हणून नियम बनवाय्चेच नाहीत का? त्याची अंमलबजावणी कडक करा म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे गुरुवार, 10/29/2015 - 06:49 नवीन
मूळ मुद्दा हा आरक्षण कुणासाठी आहे. एखादा माणूस एका जातीचा आहे म्हणून कि तो मागासलेला आहे म्हणून? माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे अंत्योदय हा तळागाळातील लोकांसाठी असावा हि मूळ संकल्पना आहे. आता १५ लाख रुपये ( सव्वा लाख रुपये महिना मिळवणारा) उत्पन्न मिळवणारा तळागाळातील कसा? हेच मला कळेनासे झाले आहे.जिथे खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची फी वर्षाला १ लाख आहे तिथे सव्वा लाख रुपये महिना मिळवणारा माणूस मागासवर्गीय म्हणून आरक्षण घेतो. सरकारी कोलेजात मिळाली नाही तरी खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेऊन रुपये १०,०००/-( दहा हजार) फी भरतो बाकी सर्व फी सरकार भरते.( यावर खेडूत यांनी प्रकाश टाकणारी मालिका लिहिली आहेच) उदा. देवयानी खोब्रागडे ज्यांचे वडील आय ए एस अधिकारी होते. जिचे वडील आय ए एस अधिकारी आहेत ती मागास कशी? तिने आरक्षणातून एम बी बी एस केले त्यानंतर आरक्षणातून आय एफ एस केले. याच ऐवजी जर सर्वच मागास वर्गीयात अगोदर असलेला क्रिमी लेयर लावला (म्हणजे वार्षिक उत्पन्न ६ लाख किंवा महिना ५०,०००/-) तर जे खरोखर त्या जातीत मागास आहेत त्यांनाच या जागा मिळतील. हे वरच्या मलई स्तरातील सरकारी जावई त्यांच्याच जातीच्या जागा अडवून मागास असलेल्याना मागासच ठेवण्यास कारणीभूत ठरतात. बाकी सांख्यिकी काय दाखवायचे आहे त्यावर ती कशी सादर करायची ते ठरवता येते. उदा. आपले डोके भट्टीत ठेवले आणि पाय बर्फात ठेवले तर सरासरी तापमान २३ अंश सेल्सियस असल्यामुळे आपल्याला आल्हाद दायक वाटते हे म्हणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 07:01 नवीन
सहमत आहे. बाकी सांख्यिकी काय दाखवायचे आहे त्यावर ती कशी सादर करायची ते ठरवता येते. हे तर आल टायम फेवरिट वाक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तुषार काळभोर गुरुवार, 10/29/2015 - 07:27 नवीन
त्यातून जे दिसतं ते सूचक असतं अन् जे दिसत नाही ते महत्वाचं असतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अजया गुरुवार, 10/29/2015 - 13:19 नवीन
डाॅ खरेंच्या प्रतिसादाला तीव्र सहमती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अस्वस्थामा गुरुवार, 10/29/2015 - 10:47 नवीन
डॉक, हाच तर मुद्दा क्र. २ आहे.
हे वरच्या मलई स्तरातील सरकारी जावई त्यांच्याच जातीच्या जागा अडवून मागास असलेल्याना मागासच ठेवण्यास कारणीभूत ठरतात.
अगदी अगदी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
होबासराव गुरुवार, 10/29/2015 - 07:04 नवीन
उदा. आपले डोके भट्टीत ठेवले आणि पाय बर्फात ठेवले तर सरासरी तापमान २३ अंश सेल्सियस असल्यामुळे आपल्याला आल्हाद दायक वाटते हे म्हणण्यासारखे आहे. डॉक रॉक्स :))
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 10/29/2015 - 08:15 नवीन
नॉनक्रिमीलेयरसाठी १५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न? 'मागास' ह्या शब्दाच्या संकल्पना फारच पुढारलेल्या दिसताहेत आपल्या देशात.. डॉ. खरेंच्या प्रतिसादाशी सहमत.. नॉनक्रिमीलेयरची मुदत १५ लाखापर्यंत नेणे, हा मुर्खपणा आहे.. ह्या हिशोबाने माझा पगार दुप्पट होईपर्यंत माझी मुलगी ओबीसी (नॉनक्रिमीलेयर)मध्ये येऊ शकते, आणि ते चुकीचे आहे..
एकाच घरातील तीन पिढ्यांनंतर नोकरीतील आऱक्षण व उच्च शिक्षणासंदर्भातील आरक्षण व सवलती यांवर मर्यादा याव्यात (जर क्रिमी लेयर हा मुद्दा लागू होत नसेल तर).
माझ्यामते दोन पिढ्या पुरेश्या आहेत.. स्वसुत्रजाहीरात
  • Log in or register to post comments
य
यमगर्निकर गुरुवार, 10/29/2015 - 08:58 नवीन
फुकट ते पोष्टिक अशी सगळ्या भारतीयांची मानसिकता आहे. आणि ह्याच मानसीकतेचा राजकरन्यांनी पुरेपुर उपयोग करुन घेतला आहे. जे फुकट मिळते ते न घेणारा आपल्या समाजात मुर्खच समजतात. इतके दिवस ओपन वर्गातिल लोक आरक्षणा विरोधात गळे काढत होते ते सुध्दा आरक्षन घोषित झाल्यावर जातिचा दखला मिळवन्यासाठि गर्दि करत होते. आणि मागास वर्गातिल लोक आम्हि किति मागास आहोत हे दाखऊन आरक्षनाचे फायदे मिळवत आहेत यावरुन सगळ्या भारतीयांचि मानसीकता एकच आहे हे सिध्द होते. तसेच लोकशाहिला स्वतःचि काहि तत्वे आहेत कि नाहित माहित नाहि पण लोकशाही म्हणजे फक्त आणि फ़क्त आकड्यांचा खेळ किंवा वोट बँकेचा खेळ वाटतो आहे. भारतात ५१% लोकांना आरक्षन आहे आणि ते बंद करने म्हनजे सत्तेपसुन वंचित होणे. या एकाच गोष्टिवर आरक्षनाचि दुकाने चालु आहेत. आणि एकंदर परिस्थीती पहाता हा प्रकार एव्हड्या सहजासहजि बंद होने अशक्य आहे. त्यामुळे आरक्षनाच्या मागे शक्ति खर्च न करता त्याचे मुळ म्हणजेच हिंदुधर्मातील जातिव्यवस्था आहे त्यावर प्रहार केला तर. जर हिंदु धर्मात सतिचि परंपरा, बालविवाह बंद होऊ शकतात तर हिंदु धर्मात जात का बंद होऊ शकत नाहि? जर लोकांना जातच राहिलि नाहि तर घटनेनुसार लोकांना आरक्षन कोणत्या मुद्यावर देणार? त्यामुळे आरक्षनाचि पिडा आपोआपच रद्द होईल, पण एव्हडा बदल करन्याचि हिंदुधर्मियांचि मानसीकता आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/29/2015 - 09:06 नवीन
दोघेही गरजवंत आहेत. आरक्षण देणारे आणि मिळणारे. तेरी भी चुप मेरी भी चुप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर
अ
अभ्या.. गुरुवार, 10/29/2015 - 09:47 नवीन
फुकट ते पोष्टिक अशी सगळ्या भारतीयांची मानसिकता आहे.
असे नाही म्हणता येणार. नाहीतर झेडपीच्या शाळा ओस पडल्या नसत्या. कमालीचा दांभिकपणा हे खरे उत्तर आहे. स्वतःपुरते भागतेय ना मग कशाला दुनियेचा विचार करायचा. आजचे होतेय ना. मग उद्या कुणी बघीतलाय असे केले के हेच फळ पदरात पडणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/29/2015 - 09:26 नवीन
१५ लाख उत्पन्न असलेला माणुस मागास???? म्हणजे २-३ लाख उत्पन्न नसलेला ब्राह्मण उच्चजातीचा (म्हणुन आरक्षण नाही) आणि १२-१४ लाख घेणारा इतर जातीचा म्हणुन आरक्षण घेणार? कोणत्या मुलाला जास्त संघर्ष असेल आयुष्यात नक्की? आणि शेवटी पैसा हाच निकष असेल तर सरसकट आर्थिकच आरक्षण का देत नाही????
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 10/29/2015 - 09:43 नवीन
आरक्षण बकवास आहे. या कुबड्या ताबडतोब फेकून द्यायला हव्यात. आंबेडकर आरक्षणाच्या विरोधात होते. तरीपण आग्रहाखातर घटनेत फक्त दहा वर्षांसाठी आरक्षणाची सोय ठेवली. मृत्यूपूर्वी त्यांनी (१९५५/५६ साली) आरक्षणाच्या विरोधात जोरदार मतप्रदर्शन केलं होतं. त्यामुळे आज आरक्षण नकोच. -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 10/29/2015 - 09:47 नवीन
+१ आंबेडकर आरक्षणाच्या विरोधात होते. तसेच आंबेडकर जातीव्यवस्थेच्या विरोधात पण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
शलभ गुरुवार, 10/29/2015 - 13:40 नवीन
फक्त दहा वर्षांसाठी आरक्षणाची सोय ठेवली
मला वाटतं हे फक्त राजकीय आरक्षणासाठीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/29/2015 - 10:30 नवीन
व्हॉट्सॅपवर फिरणारा एक संदेश इथे देण्याचा मोह आवरत नाही... भारत हा जगातला एकुलता एक देश आहे जेथे विविध सामाजिक गटांमध्ये आपण इतरांपेक्षा किती जास्त मागासलेले आहोत हे दाखविण्यासाठी चढाओढ चालली आहे. पण त्याबरोबरचे दुसरे सत्य असे आहे की ते मागासलेपण दूर व्हावे याची कळकळ तर नाहीच पण मागासलेपणा व त्यामुळे मिळणारे फायदे अनंत काळपर्यंत चालू रहावे हीच प्रबळ इच्छा आहे. "तुम्हाला विकसित सामाजिक गट बनवण्याची प्रणाली अमलात आणू. मग तुम्ही स्वतःच्या बळावर स्वतःचे योग्य स्थान मिळवू शकाल." असे म्हणणारा उमेदवार निवडणूकीत हमखास हारेल अशी परिस्थिती आहे. सद्या चालू असलेल्या बिहारच्या निवडणूकीच्या प्रचारात राखीव जागांचे जे राजकारण चालले आहे ते याबाबतीत पुरेसे दिशादर्शक आहे. राखीव जागांचा मुद्दा पुढे आला की, तथाकथित बिमारू बिहार असो किंवा तथाकथित पुढारलेला महाराष्ट्र असो, विचारांत फार फरक पडत नाही ! :(
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 11:56 नवीन
दुसर्‍या बाजूची (आरक्षण समर्थक) लोकं नाहीत का इकडे मिपावर..?
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 10/29/2015 - 18:08 नवीन
आरक्षण ही सामाजिक समता निर्माण व्हावी म्हणून केलेली तरतूद आहे. देश स्वतंत्र होईपर्यंत उच्च शिक्षण ही काही जातींची मक्तेदारी होती. हा समाज प्रगत झाला परंतु बहुसंख्य निम्न जातीतला मानला गेलेला समाज शिक्षण, सुविधा ह्या पासून बराच दूर होता. त्यामुळे कनिष्ट समजली गेलेली सर्व कामे ह्या बहुतांशी निम्न जातीतल्या लोकांनी करायची असे भेदक वास्तव निर्माण झाले. ह्या वर्गाचे सामाजिक स्थान हे खालचे मानले गेले होते आणी अजूनही बर्याच ठिकाणी मानले जाते आहे. अशा वर्गाला पण चांगले शिक्षण मिळावे, चांगल्या नोकर्या मिळाव्यात ज्यामुळे तो समाज अन्य पुढारलेल्या वर्गाच्या लेवल ला पोचेल आणी त्यातून सामाजिक समता निर्माण होईल असा आरक्षणाचा उद्देश होता. आर्थिक निकषावर आरक्षण ही गोष्ट सांगायला कितीही सोपी असली तरी फार कठीण गोष्ट आहे. एखादा माणूस आज श्रीमंत आहे म्हणून त्याला आरक्षण नाकारले आणी २ वर्षानी काही कारणाने तो गरीब झाला तर? किंवा एखादा गरीब आज आरक्षणाचा लाभ घेत आहे आणी तो अचानक श्रीमंत झाला तर? कुणाचीही आर्थिक स्थिती कधीही बिघडू किंवा सुधारू शकते. त्यामुळे हे वाटते तेवढे सोपे नाही. एखादा श्रीमंत गरीब झाला तर तो लगेच आरक्षण मागेल पण एखादा गरीब जर श्रीमंत झाला तर प्रामाणिकपणे आरक्षण नाकारण्या एवढा प्रामाणिकपणा भारतीय जनतेत आहे असे मला वाटत नाही. दुसरी गोष्ट एखादा माणूस आर्थिक दृष्ट्या श्रीमंत आही म्हणून त्याचे सामाजिक स्थान सुधारले आहे असे होत नाही. मी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात बर्याच गावानमधून फिरलो आहे. ह्या निम्न मानल्या गेलेल्या लोकांची वस्ती ही मुख्यत्वे गावाच्या बाहेरच असते. आणी पुढारलेला मानला जाणारा समाज ह्या जातीतल्या लोकांचा (भले मग तो माणूस कितीही उच्च पदावर पोचलेला असो) कसा उल्लेख करतो हे देखील ऐकलेले आहे. त्यामुळे जोपर्यंत सामाजिक समता निर्माण होत नाही तो पर्यंत आरक्षण हे राहणारच. ह्यावर उपाय म्हणजे प्रत्येकाने वैयक्तिक रित्या जात पात न मानता आपल्या वागण्यातून सामाजिक समता कशी निर्माण होईल हे पाहणे आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 10/30/2015 - 02:31 नवीन
तुम्ही उत्तम मराठी लिहिता हो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
उ
उगा काहितरीच गुरुवार, 10/29/2015 - 18:16 नवीन
यासंदर्भात एक प्रश्न आहे माझा... समजा मी उच्च वर्णीय आहे , आणि माझ्या इच्छेने मी धर्म बदलला व ज्या धर्मातल्या लोकांना आरक्षण मिळते अशा धर्मात प्रवेश केला तर मला आरक्षण / अल्पसंख्यांक असल्याचे फायदे मिळतील का नाही ?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 18:37 नवीन
धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत नाही बहुतेक. कुठल्यातरी खटल्यात आईची जात मागासवर्गीय आहे म्हणून मुलाला तीच जात लावण्याबद्दल कोर्टाने मनाई केली होती. मुलाची जात ही वडीलांचीच जात असेल व आईच्या जातीशी त्याचा काहीही संबंध नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले होते असे काहीसे अंधुक आठवते. त्यामुळे धर्म कितीही बदलले तरी जातीचे निकष बदलत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच गुरुवार, 10/29/2015 - 19:00 नवीन
टु बी व्हेरी स्पेसिफीक... १)समजा मी ब्राह्मण आहे , आणि बौद्ध धर्मात प्रवेश केला तर मला आरक्षण मिळणार का नाही. २) समजा मी ब्राह्मण आहे , आणि मुस्लिम/जैन/ ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला तर अल्पसंख्यांकाचे फायदे मिळणार का नाही. (या प्रश्नाच्या उत्तरावर दुसरे प्रश्न अवलंबून आहेत. त्यामुळे जाणकारांच्या प्रतिक्षेत...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/29/2015 - 19:16 नवीन
विकिच्या ह्या आर्टीकलवर जरा माहिती मिळेल... जाणकार उत्तर देतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/29/2015 - 21:03 नवीन
हम्म, मी आरक्षणाच्या अगदीच विरोधात वगैरे नाही पण एकंदरीतच आरक्षण, जागा आणि लोकसंख्या यांच्या गुणोत्तर समजायला किचकट दिसत आहे. मी हि थोडा प्रयत्न करून पाहतो मांडायचा. चुका झाल्या तर दुरुस्त करा! तर पहिल्यांदा १०० लोक आणि १०० जागा आहेत असे मानू. आता हे हिंदू आहेत हे मानून मी लिहित आहे जर गृहीतक बरोबर निघाले तर व्याप्ती वाढवता येईल. Religion/Caste SCs STs OBCs Forward Caste/Others Hinduism 22.2% 9% 42.8% 26% संदर्भ आता आरक्षण पाहूया आरक्षण SC SC & SC converts to Budhhism अनुसुचीत जाती 13% 59 Castes ST ST (Incl outside specified areas) अनुसुचीत जमाती 7% 47 Tribes OBC OBC -Other Backward Class : इतर मागास वर्ग 19% 346 Castes SBC SBC - Special Backward Class : विशेष मागास प्रवर्ग 2% 7 Castes VJ (Vimukta Jati /Denotified Tribes) भटक्या जमाती - अ 3% 14 Tribes NT-B (Nomadic Tribes - B) भटक्या जमाती - ब 2.5% 28+7 Tribes NT-C Dhangar - (Nomadic Tribes-C) भटक्या जमाती - क 3.5% 1 Caste NT-D Vanjari - (Nomadic Tribes-D) भटक्या जमाती - ड 2% 1 Caste Total 52% संदर्भ म्हणजे लोकसंख्येच्या २२.२% SC हे १३% जागांसाठी स्पर्धा करतात (जर सवलती मिळवायच्या असतील तर!) लोकसंख्येच्या ९% ST हे ७% जागांसाठी स्पर्धा करतात (जर सवलती मिळवायच्या असतील तर!) लोकसंख्येच्या ४२.८% OBC हे 19% जागांसाठी स्पर्धा करतात (जर सवलती मिळवायच्या असतील तर!) यावरून हे दिसते कि सवलती मिळवायला देखील स्पर्धा आहेच. आता असे म्हणू शकाल कि या लोकांना खुल्या प्रवर्गातूनसुद्धा प्रवेश घेत येइलच कि! पण नीट पाहिल्यावर लक्षात येईल कि यांच्या आरक्षित जागासुद्धा भरू शकत नाहीयेत! मग हे लोक जातात कुठे? आणि जर आरक्षित जागाच भरत नसतील तर खुल्या प्रवर्गातून हे कसे येऊ शकतील आणि मुळात सवलती सोडून का येतील?? म्हणजे अजूनही बरेच लोक सवलतीपासून दूर आहेत, मागासलेलेसुद्धा म्हणू शकतो आपण... त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हवे असे मला तरी वाटत.. अरे हो खुला प्रवर्ग राहिलाच कि... लोकसंख्येच्या 26% Forward Caste हे ४८% जागांसाठी स्पर्धा करतात. म्हणजे अगदीच वाईट परिस्थिती नाहीये!! आता इथे मुलींसाठीचे आरक्षण मध्येच आणू नये. लोकसंख्येच्या जवळपास अर्ध्या मुली पकडल्या तर पुन्हा ५०% मुलींसाठी ३०% आरक्षण आहे! म्हणजे खुल्या प्रवर्गातील उरलेल्या १३% मुलांसाठी ३३.६% जागा तरीसुद्धा आहेतच...
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/30/2015 - 04:23 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
सुबोध खरे Fri, 10/30/2015 - 05:49 नवीन
साहेब आपल्या संख्यीकीबद्दल -- माझ्या अल्पमती प्रमाणे मला जे समजले ते असे मुंबईत रेल्वेच्या लोकलच्या १२ डब्यांपैकी ३ डबे महिलांसाठी राखीव आहेत. महिलांचे प्रमाण लोकसंख्येत ५० टक्के असूनही त्यांना फक्त २५ % आरक्षण आहे. हा अन्याय दूर करायला हवा आणी एकूण ६ डबे महिलांसाठी २४ तास राखीव असायला हवेत. नाही का? काही तरी गडबड आहे. काय आहे ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Fri, 10/30/2015 - 10:52 नवीन
माझ्या उदाहरणात जागांच्या ऐवजी लोकलचे डबे म्हणायला पाहिजे होते बहुतेक! ;) मुळात इथे अल्पमती वगैरे शब्द वापरण्याचे कारण काही कळाले नाही पण असो! आता क्रमानुसार जाऊ, धाग्याचा विषय जातीनिहाय आरक्षणाबद्दल आहे त्यामुळे त्याचा प्रथम विचार करू... १. माझ्या उदाहरणात जातीनिहाय आरक्षणाचे काही संदर्भ दिले आहेत मुळात ते तुम्हाला मान्य झालेत का? त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत! मान्य झाले नसतील तर त्याच्यावर प्रथम चर्चा करू शकतो... २. मुलींचे आरक्षण हे प्रत्येक वर्गाच्या कोट्यामध्ये केलेले आहे. म्हणजे जर SC साठी १३% आरक्षण असेल तर त्याच्या ३०% जागा या मुलींसाठी आरक्षित आहेत! म्हणजे जो सरसकट ३०% आरक्षणाचा बाऊ केला जातोय त्यात म्हणावं असे तथ्य नाही. In continuation of the existing provisions already mandating reservations for scheduled caste and scheduled tribes, one-third of such SC and ST candidates must be women. संदर्भ २. शिक्षणामध्ये मुलींना आरक्षण देण्याची तुलना लोकलशी करणे सपशेल चुकीच आणि दिशाभूल करणारे आहे. आणि आरक्षण वाढविले पाहिजे असे मी कुठेच म्हणालो नाहीये त्यामुळे स्त्रियांसाठी १२ पैकी ६ डबे आरक्षित असावेत असे म्हणण्याला ना काही आधार आहे ना गरज... लोकलमध्ये आरक्षण हे स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि त्यासाठी त्यामध्ये प्रवास करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर विचारात घेतले असेल(जाणकारांनी सांगावे) सगळ्या लोकसंख्येच नाही!! लोकल जेमतेम मिनिटभर थांबते अशावेळी पुरुषांशी धक्काबुक्की करून चढणं किती स्त्रियांना सोयीस्कर असेल? आणि अशा परिस्थितीचा फायदा घेणारे लोक आपल्या समाजात नसतीलच हे आपण सांगू शकतो का? किती स्त्रिया गर्दीच्या वेळी एकट्या असताना जनरल डब्याने प्रवास करायचा विचार करतील? त्यामुळे विषयाशी निगडीत गोष्टींवर चर्चा करूया, म्हणजे कदाचित काही नवीन मुद्देही समोर येऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बबन ताम्बे Fri, 10/30/2015 - 15:27 नवीन
शब्दबम्बाळ साहेब, वरती कानडा साहेबांनी स्पष्टीकरण दिलेय की खुल्या वर्गातून जरी प्रवेश घेतला तरी त्या आरक्षीत जातीला लागू असलेल्या इतर सवलती मिळतात म्हणून ... त्यामुळे "मुळात सवलती सोडून का येतील " हा मुद्दा बरोबर वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
क
कानडा Sat, 10/31/2015 - 05:19 नवीन
दोन गोष्टी लक्षात घ्या - १. खुल्या वर्गातुन प्रवेश घेणे. यासाठी (कुठल्याही जाती-धर्माच्या) विद्यार्थ्याने अर्ज करतांनाच खुल्या वर्गातुन करणे. या केस मधे खुली सीट घेणे ही विद्यार्थ्याची चॉईस आहे. २. ओपन सीट ऊपलब्ध असेल तर अर्ज जरी कुठल्याही कॅटेगरी मधुन केला असेल तरी ती त्या विद्यार्थ्याला मिळते. या केस मधे खुली सीट घेणे ही विद्यार्थ्याची चॉईस नाही. पहिल्या केस मधे विद्यार्थ्याला कुठलीही जातीवर आधारीत सवलत मिळणार नाही. दुसर्‍या केस मधे त्याला त्याच्या जातीच्या/कॅटॅगरीच्या सर्व सवलती मिळतील. त्यामुळे "मुळात सवलती सोडून का येतील" हा मुद्दा बरोबर आहे. --- कानडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
म
मोगा Fri, 10/30/2015 - 01:53 नवीन
पेमेंट सीट हेही धनदाम्डग्याम्साठीचे आरक्षणच अहे , तेलोकाना चालते. पण जातीच्या अधारावर अरक्षण कुणी घेअले तर त मात्र नको म्हणे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 10/30/2015 - 05:46 नवीन
जगभरात ( भारत सोडुन ) ह्या पेयमेंट सीट मुळेच कॉलेज आणी युनिव्हर्सिटी काही पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देऊ शकतात. ह्या पेमेंट सीट नसतील तर सर्वांनाच फी द्यायला लागेल, पात्र पण गरीब लोकांना पण. अंबानी चा मुलगा हावर्ड ला गेला की एका विद्यार्थ्याला स्कॉलरशीप मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
सुबोध खरे Fri, 10/30/2015 - 05:56 नवीन
ओ हितेस भाऊ तुम्हाला विस्मरणाचा आजार झाला आहे का? ( ALZEIMER) मागे एकदा मी तुमच्याच प्रतिसादावर लिहिले होते कि तुम्ही शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकता, पैसे उधार घेऊ शकता आणी पेमेंट सीट घेऊ शकता आणी पैसे मिळू लागले कि ते फेडू शकता. संपत्ती हि कर्माधीष्ठीत आहे आरक्षणात तसे नाही. आरक्षण जन्माधिष्ठित आहे. केवळ तुम्ही एका जातीत जन्मला म्हणून तुमच्या कडे गडगंज पैसा असेल तरीही तुम्ही सरकारी जागांवर आरक्षित आणी फुकट शिक्षण घेऊ शकता आणी तुमच्याच जातीतील एका जास्त गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाच्या संधी पासून दूर ठेवू शकता. याला SELECTIVE AMNESIA असेही म्हणतात. जिज्ञासूनी गुगलून पाहावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा