एक पहाट गावाकडची ………
चमकून गेली वीज, भिजवून गेल्या सरी
माळरानांनी पांघरली हिरवी शाल अंगावरी
पक्षांची किलबिल कोकिळेची शीळ, निसर्गाच संगीत लई भारी
उडती पक्षी एकामागून एक, आभाळी जशी पंढरीची वारी
सारं गाव जाग करी भूपाळीन, वासुदेवाची स्वारी
मधुर स्वरांना साथ चिपळीची, घेऊन चालली दारोदारी
बुजगावण्याच्या भेटीला चालला शेतात शेतकरी
वाऱ्यासंगे झुले किती तांदूळ अन बाजरी
घंटानाद आला कानी, पोहचला देवपूजेला पुजारी
भगवा झेंडा फडकत आहे राउळाच्या कळसावरी
लाल रंग वाढला समोर पूर्वेच्या क्षितीजावरी
दिसे एका अंगणात कोणी सूर्याला अर्घ्य करी
💬 प्रतिसाद
(5)
द
दमामि
गुरुवार, 10/29/2015 - 03:42
नवीन
छान!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 10/29/2015 - 10:29
नवीन
सुरेख. साध्या सरळ पण चित्रदर्शी शैलीतील कविता. आवडली.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 10/29/2015 - 16:35
नवीन
हे झेपले नाही! कुठल गाव हे?
- Log in or register to post comments
ए
एकप्रवासी
गुरुवार, 10/29/2015 - 17:06
नवीन
माझ्या माहिती नुसार बाजरी ही शेती नाशिक, पुणे, धुळे, जळगाव व अजून काही ठिकाणी तांदळा बरोबर केली जाते, तरी आपल्या निरिक्षणा बद्दल आभारी आहे.
- Log in or register to post comments
ए
एकप्रवासी
गुरुवार, 10/29/2015 - 17:09
नवीन
बाजरी आणि तांदूळ ह्या दोन्ही पिकांचा वाढीचा हंगाम हि जवळ जवळ सारखाच असतो.
- Log in or register to post comments