काही लोक्स नशीबवान असतात..
काही लोक्स नशीबवान असतात...
माझ्या ओळखीचा एक जोशी आहे(नाव बदलले आहे)
ह्या माणसाने आयुष्यभर काहि केले नाही...
टिवल्या भावल्या..हा व्यवसाय कर तो कर..नोकरी करायची नाही..कारण कुणाची गुलामी नको..
मात्र पत्नी सुरेख मिळाली..न्याशनलाईज ब्यांकेत नोकरी..
निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या
बायकोच्या जिवावर २ वेळची मंम्म नाश्ता चहा चालू होता..
मुली हुशार निघाल्या ..
दोघींना अमेरिकेतील नवरे मिळाले व अमेरिकेत स्थायिक झाल्या..
आता हा ६ महिने ह्या तर ६ महिने त्या मुलीकडे राहतं असतो...
निम्मे आयुष्य बायकोच्या जिवावर ऐष उरलेले मुली व जावयाच्या जीवावर ...
काही लोक्स नशीबवान असतात...
💬 प्रतिसाद
(82)
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 04:56
नवीन
@.न्याशनलाईज
ब्यांकेत नोकरी.. >> दिवंगत झालो आहे.
@निसर्ग नियमा प्रमाणे २ मुली झाल्या>>
मग बाकिच्यांना कोणत्या नियमानी होतात हो.. अ.कु. ???
काय ह्ये!?
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 10/31/2015 - 05:52
नवीन
न्याशनलाईज
मी ही त्याच शब्दाला ठेचकाळलो होतो.
इंग्रजी शब्दांचा हव्यास. 'राष्ट्रीयकृत बँक' हा शब्द सुचू नये हा दैवदुर्विलास.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 08:39
नवीन
ज्या नियमाने वैजूवैनींना जुळे झाले त्याच नियमाने =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 12:51
नवीन
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 12:57
नवीन
हरामी???? शोभत नाही हो....मला =))
ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊ
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 13:15
नवीन
दांडुआत्रुप्त-धुबुक्कटक्कू

- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 10/31/2015 - 04:59
नवीन
असेल ज्यांच्या नशीबात त्यांनी खुशाल ऐश करावी. काही वावगे नाही त्यात. असे भाग्य प्रत्येकाला लाभो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/31/2015 - 05:35
नवीन
हायला
काय नशिब आहे त्याचं.
माझी इच्छा होती कि बायकोनं भरपूर कमवावं आणि आपण थंड बसून मिपा मिपा खेळावं.
आमच्या बहिणीनं विचारलं कि मग बायको काम करीत असेल तर तू घरकाम करशील का?
मी तिला सहज म्हणालो-मी कशाला काम करू? जी बायको नवर्याला पोसते ती एक मोलकरीण नाही का ठेवू शकणार?
यावर घरात मोठा वाद झाला.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 10/31/2015 - 05:54
नवीन
बायको नोकरीवर गेली की तुम्ही आणि मोलकरीण दोघेच घरात हा केव्हढा मोठा धोका आहे. असे प्रस्ताव कधीच मंजूर होत नाहीत.
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Sat, 10/31/2015 - 07:34
नवीन
दूरदृष्टी की चाणाक्ष बुद्धी?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 08:41
नवीन
ठ्ठो
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 08:40
नवीन
माझे पण असेच स्वप्न आहे =))
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sun, 11/01/2015 - 09:18
नवीन
माझे पण. बहुतेक मिपा वरच्या सर्व विवाहित पुरुषांचे हेच मत असेल.
- Log in or register to post comments
आ
आनंदराव
Sat, 10/31/2015 - 07:16
नवीन
पेठ्कर काकांचा षटकार !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/31/2015 - 07:19
नवीन
काय पेठकर साहेब
सगळ्यांनाच काय "शांताबाई" मिळते काय?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 10/31/2015 - 08:29
नवीन
अरेरे उगाच आठवण करून दीलीत :)
शांताबाई...
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sat, 10/31/2015 - 13:00
नवीन
म्हणजे हवी तर असते. (मन में दूसरा लड्डू फुटा).
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 13:13
नवीन
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 10/31/2015 - 07:32
नवीन
च्च सी सी टी व्ही चा शोध लागला असावा !!!
असा कयास आहे नक्की विदा नाही लगेच मागू नये !!
खुलासे दार नाखु
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/31/2015 - 07:47
नवीन
हो ना !
म्हणूनच त्याला सी सी (बघा, बघा, काय चाललंय !) टी व्ही म्हणतात ! ;)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 10/31/2015 - 07:35
नवीन
अशा माणसाला तुम्ही नशीबवान म्हणता? कमाल आहे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 10/31/2015 - 07:36
नवीन
या धाग्यावर सगळ्या ज्येष्ठांनी आपापले 'मनसुबे' जाहीर करायचे असं ठरलंय काय?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/31/2015 - 08:07
नवीन
मग तुम्ही पण करा. तरुणांना कोणी मनाई केलीये का?
होऊ द्या खर्च
मिपा आहे घरचं
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/31/2015 - 07:54
नवीन
काही लोक्स नशीबवान असतातच..... त्यात त्यांचे कर्तुत्व असो अथवा नसो.....
मुंबईला जायचं असेल तर काहींना घ्यायला एसी गाडी येते.... तासाभरात मुंबई !!
त्याच प्रवासासाठी दुसरा एखादा ठाण्याहून रेल्वे पकडतो...ती घाटकोपरला बंद पडते.....तिथून बस पकडली की ती कुर्ल्याला पंक्चर होते... तिथून टॅक्सी पकडायची ती सिग्नलला अडकते मग पायपीट करत पुढे.....
पोहोचतो तोही तिथेच मुंबईला पण अडीच तीन तासांनी...घामाच्या धारा पुसत.....
- Log in or register to post comments
'
'पिंक' पॅंथर्न
Sat, 10/31/2015 - 08:40
नवीन
काही लोक्स फारच नशिबवान असतात ..
त्यांना दोनवेळचं पोटभर जेवण मिळतं.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 10/31/2015 - 08:43
नवीन
जन्मापासून मरणापर्यंत सगळा नशीबाचाच खेळ चाललेला असतो...
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 10/31/2015 - 10:37
नवीन
हो ना! त्यांच्या धाग्यांवर प्रतिसाद येतात! ते पण वीस वीस!(पु.लं.ना आठवून!)
- Log in or register to post comments
च
चिनार
Sat, 10/31/2015 - 11:02
नवीन
काही लोक्स नशीबवान असतात…. त्यांच्या आया ,बहिणी, बायका झी मराठी बघत नाहीत
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Sat, 10/31/2015 - 12:34
नवीन
+१ . "त्यांच्या आया ,बहिणी, बायका झी मराठी बघत नाहीत"
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 12:38
नवीन
बायका???? कि बायको???? कि नक्की बायकाच म्हणायचे होते???? =))
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Sat, 10/31/2015 - 12:47
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 10/31/2015 - 12:46
नवीन
काही लोक्स नशीबवान असतात...
जोशी नाव असणे हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
भावल्या शब्द काळजास भिडला.
न्याशनलाईज शब्द काळजास भिडला. पत्नी सुरेख मिळाली हे त्याचे नशीब, की लेखकाची जळजळ?
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
मंम्म याचा उच्चार कसा करायचा? नाश्ता चहा चालू होता. हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
यात जोशाचे नशीब काय?
यात जोशाचे नशीब काय?
हे नशीबवान असल्याचे लक्षण आहे का?
वरीलप्रमाणे. हे जोशाचे नशीब की लेखकाची जळजळ?
असो. परा असता तर एक डायरी नक्की मिळाली असती. एवढं कुठलं आमचं नशीब?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 10/31/2015 - 12:58
नवीन
हा हा हा. आता यापुढे फार काही लिहायची गरजच राहिलेली नाही :)
तरीही थोड्या सिरिअस नोटवर-- काहीही न करता इतरांच्या जीवावर आयुष्यभर जगणे याला नशीबवान असणे कसे म्हणता येईल हे मला अजूनही समजलेले नाही. मी तर म्हणेन असा मनुष्य फुटक्या नशीबाचाच असला पाहिजे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 13:13
नवीन
@ पत्नी सुरेख मिळाली हे त्याचे नशीब, की लेखकाची जळजळ? >>
संपूर्ण प्रतिसाद ही अ.कुं.ची अंत्ययात्रा आहे.. 
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 10/31/2015 - 13:25
नवीन
साष्टांग _/\_ !!!!!
(फक्त शेवटच्या वाक्याचा संदर्भ कळला नाही..)
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 10/31/2015 - 13:39
नवीन
पराचा संदर्भ तुम्हाला माहीत नसणार. परिकथेतील राजकुमार ऊर्फ परा हा डायरीसदृश लिखाण आले की नव्या वर्षाची डायरी धागाकर्त्याला भेट द्यायचा. सध्या परा येत नाही ना, म्हणून म्हटले, "तेवढं कुठलं आमचं नशीब?"
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 10/31/2015 - 13:43
नवीन
:-))
डायरीसदृश लेखन!!! कहर आहे!!
(बाकी परा म्हणजे परीकथेतील राजकुमार तेवढं वळक्लेलं.)
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sat, 10/31/2015 - 12:53
नवीन
"अकु" नशीबवान!!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 10/31/2015 - 13:28
नवीन
लै भारी!
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Sat, 10/31/2015 - 13:40
नवीन
काय फालतूपणा आहे हा? आमच्या बार मधे कोणी नवटाक झोकून ही असले बोलत नसेल! नाहीच!!
(शिस्तप्रिय बारमालक) नाना
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 10/31/2015 - 13:43
नवीन
थारे बार का नाम झम झम बार हे के ?
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Sat, 10/31/2015 - 14:05
नवीन
म्हंजी? मला फ़क्त लस्सी (वोडका मिसळून) पिण्याइतकीच पंजाबी येते, ;)
बाकी आमच्या अंदाजाप्रमाणे आपण आमच्या बार चे नाव विचारीत असल्यास ते
"नाना साहेब ह्यांचे मेनकाभुवन मदिरालय" असे सुटसुटीत हाय :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 14:07
नवीन
तिथे मेनका मदिरा ग्लासात ओतते का?
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Sat, 10/31/2015 - 14:19
नवीन
आपला अपेक्षाभंग केल्या बद्दल माफ़ी पर असले नाही होत आपल्या बार वर , नॉर्मल बार हाय
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 19:29
नवीन
मेनकेने मदिरा ग्लासात ओतावी हि अपेक्षा मी कधी केली हो? उग्गीच कैच्याकै
- Log in or register to post comments
स
सायकलस्वार
Sat, 10/31/2015 - 14:37
नवीन
नाही, भुवन ओततो.
मेनका आत ग्लास विसळते.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Sat, 10/31/2015 - 14:44
नवीन
तुमचे वर्णन आमच्या होमडिलीवरी वाल्या सोबत मॅच होते बहुतेक!
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Sat, 10/31/2015 - 14:45
नवीन
चेष्टा आहे हो कृपया हलके घेणे
- Log in or register to post comments
स
सायकलस्वार
Sat, 10/31/2015 - 14:53
नवीन
आम्ही नेहमी हलकीच घेतो.
हेवी झेपत नाय आजकाल.
(ड्रिंक्सबद्दल बोलतोय हो!)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 10/31/2015 - 14:55
नवीन
ही वर्गिकरणाची नविन पद्धत दिसते. जरा खुलासेवार लिहाल का याबद्दल?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »