Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कौतुक

व — विशाल कुलकर्णी, Sat, 10/31/2015 - 06:44
माझा हात अलगद सोडवून तू जायला निघतेस उन्हं डोक्यावर येतात सावल्या ... फेर धरून गोळा होतात माझ्याभोवती ! वेशीपाशी तू थबकतेस मनमोर नाचायला लागतो "सावली मागेच राहिली रे" तू कसंबसं हसून सांगतेस सावलीचा हात धरून पुन्हा चालायला लागतेस तिच्या पदराचा शेव... माझ्या छातीपाशी अडकलेला तू तशीच.... नेटाने चालत राहतेस कशाचं कौतुक करू ? तिच्या ओढीचं ... किं... तुझ्या नेटाचं .... ? विशाल

प्रतिक्रिया द्या
3370 वाचन

💬 प्रतिसाद (18)
प
पैसा Sat, 10/31/2015 - 12:34 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/31/2015 - 12:52 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 10/31/2015 - 12:56 नवीन
वा! तरल!!!!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 10/31/2015 - 13:08 नवीन
कौतुक सगळ्याचंच. सुंदर.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 10/31/2015 - 22:51 नवीन
गूढ वाटते मला. खूप वेळा वाचूनही पूर्ण कळली असं वाटत नाहीये. पण भाव छान उतरला आहे कवितेत. :)
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Sun, 11/01/2015 - 06:22 नवीन
मला पण नव्ह्ती झेपली पहिल्यांदा वाचुन. गुढ उकलुन दाखवल्याने रसभंग होत असेल तर कृपया संमंने माझा प्रतिसाद उडवुन टाकावा. आणि अजुन काही दुसराच अर्थ निघत असेल तर विशालदांनी तो उलघडुन दाखवावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Sun, 11/01/2015 - 17:41 नवीन
ओह म्हणजे सावली त्याच्यात गुंतलीय आणि ती लांब चाललीये असं आहे का? मस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
इ
इडली डोसा Sun, 11/01/2015 - 06:18 नवीन
पहिल्या वाचनात कळलीचं नाही ...पुन्हा वाचल्यावर गुढ उकललं. अवांतरः तुम्हाला सगळं असं मिस्टेरिअरचं आवडतं का? स्पर्धेतला फोटो पण तसाचं आहे तळ्याचा.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/01/2015 - 07:55 नवीन
फारच छान!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 11/01/2015 - 08:22 नवीन
सुंदर! आवडली!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/02/2015 - 08:00 नवीन
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! मिस्टेरियस असं काही नाहीये त्यात. सावली हे गतकाळातील आठवणींचे, त्यांच्या पडछायांचे , गुंतलेल्या भावनांचे प्रतिक मानले जाते. ती सोडून तर चाललीय खरे, पण त्याच्यात गुंतलेल्या तिच्या भावना, त्या सगळ्या गतकाळातील जुन्या आठवणी अजुनही त्याच्याभोवतीच रेंगाळताहेत. देहाने ती दूर जातेय पण मन अजुन तिथेच घुटमळतेय....
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 11/02/2015 - 12:00 नवीन
सुरेख. आता अर्थ लागतोय. फारच सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
र
रातराणी Mon, 11/02/2015 - 19:11 नवीन
वा! आता अजून आवडली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
म
मंदार दिलीप जोशी Mon, 11/02/2015 - 11:57 नवीन
छान !
  • Log in or register to post comments
ए
एस.योगी Mon, 11/02/2015 - 13:22 नवीन
कशाचं कौतुक करू ? तिच्या ओढीचं ... किं... तुझ्या नेटाचं .... ? ------------------- दंडवत .... _/\_
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/02/2015 - 16:05 नवीन
धन्यवाद दोस्लोग्स _/\_
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/02/2015 - 17:15 नवीन
कोण कुलकर्णी का?
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 11/03/2015 - 08:44 नवीन
आले का राजकुमार परतोनी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा