आवडती नावडती अपत्य
"शेअर्स,म्यु.फंड, निवासी जागा व घरे आवडतीचि तर बॅंकातल्या ठेवी नावडातीचि अपत्ये आहेत,काय?"
शेअर्स,म्यु.फंड, निवासी जागा व घरे यावर मिळणारि य:चयावत उत्पन्ने या ना त्या स्वरुपात इन्कम टॅक्स फायदे
मिळवण्यास पात्र असतात.उदा.शेअर्स,म्यु.फंड, यावरील लाभांश ,धारकाच्या हाती, करमुक्त येतो तर एक अथवा
तीन वर्षाची भांडवली वाढ एकतर १०० टक्के करमुक्त असते किंवा इंडेक्ससेशन बॅनिफीट ला पात्र असते.राहत्या
घरावरील उत्पन्नावर ३०टक्के सरसकट सूट असते. या बाबी मी त्रोटक लिहील्या आहेत.
आता उलटपक्षी बँकांतल्या सर्व ठेवीवर म्हणजे फिक्स्ड डिपाँझिट, रिकरिंग,(१०,०००रु.सोडता)सेव्हिंग्ज वरहि
इन्कमटॅक्स लागतो.
ठेवी वरील सर्व व्याज चलनवाढ खावून टाकते,सेव्हिंग्ज वरील ठेवीवर तर निगेटिव रिटर्न मिळते.सेव्हिंग्ज खात्यावर
मिळणार्या ३टक्के अशा भुर्ट्या व्याजातहि शासन मन दाखवते .१रु. व्याज मिळाल्या स शासन त्यातले३० पैसे( max.rate)
व सर चार्ज मागते.मिळणारे व्याज हे जेमतेम मुद्दल शाबूत राखण्यास मदत करते.मग अन्यत्र मिळणारा इंडेक्ससेशनचा
बेनि फिट मुदत ठेविच्या व्याजाला कां नको?
उत्तर ठरलेलं आहे, तहहयात हे असंच चालू आहे व दुसरं प्रगत राष्ट्रात ते तसं नाही.
निव्रुत्त सरकारी नोकर ,बॅंका ,एल,आय,सी, ज.इन्शु. या सर्वाना दर सहा महिन्यानी पेन्शन वाढते हे स्पेशल
लोक सोडूनही भारतात शेतकरी,शेत मजूर ,औ.कामगार ,किरकोळ सेल्फ एंम्पॉइड लोक राहतात,त्यांचं काय?
हातावर पोट आहे त्यांचं काय? जे निव्रुत््त व्याजावर गुजराण करतात त्यांचं,काय?
एकीकडं महागाई वाढते ,दुसरीकडं ठेवीवरचं व्याज घटतं. त्यानी कमी होणार व्याज डोळे,भरून पाहायचं.
टॅक्सेबल असो नाही तर नसो, TDS द्यायचा पुन्हा परत न मिळण्यासाठी.
आमच्या धूणां भांडी वाल्या भाईचे बँकेत लाख दीड लाख आहेत, त्याच्या व्याजावर परवा TDS झाला.ती
अंगठा बहाद्द्र बाई तिला १५जी भरायला सांगितला ,नाही तर रिटर्न भरा ,म्हणून सांगीतलं ,त्या म्हणाल्या त्यापेक्षा
मी दोन कामं जास्त करते.
म्हणून मी म्हणतो
१) सर्व सेव्हिंज खात्यावरील व्याज टॅंक्स फ्री करावे.
२) मुदत ठेवीच्या व्याजाला इंडेक्सेशन बेनिफीट द्यावा.
३) महागाई भत्ता वाढतो तसे व्याजाचे दर वाढावेत.
४)बिगर निव्रुत्ती धारकांचा डेटा बेस तयार करून फ क्त त्यांच्यासाठी महागाई संलग्न
डिपॉझिट स्किम आणावी.
चर्चा व्हावी.
मी कोणी अर्थ तद्न्य नाही , पण या विषयात सजगता नक्कीच बाळगतो.दिल्लीतल्या बाबू लोकाना अशा गोष्टी कधी
जाणवत नसतील काय हा कायम मला पेच पडतो.
गुंतवणुकीत धोका आणि फायदा हे एकमेकाचा हात धरून वर-खाली जातात.हे तत्व "लहान सहकारी बँका व त्यांचे १-२% जास्त व्याज" आणि "मोठ्या सरकारी/खाजगी बँका व त्याचे तुलनेने कमी व्याज" यासाठीही लावा.