सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील.
साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण.
कृती: धने, जीरे, ओवा वेगवेगळे खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. तीनही गोष्टी एकत्र करा, त्यात हिंग, सुंठ्पावडर, शेंदेलोण, पादेलोण मिक्स करा. परत एकदा सगळे मिश्रण मिक्सरला फिरवून नीट मिक्स करा. मसाला थोडा खारट लागला पाहिजे म्हणजे ताकात घातल्यावर चव बरोबर लागते. चवीनुसार दोन्ही मीठांचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. पाचक म्हणूनही ताकात घालून घेता येईल.
आज आत्ता ताबडतोब करण्याची
आज आत्ता ताबडतोब करण्याची पाकृ! धन्स गं सुगरणे :)
मस्तच गं अनन्न्या.नक्की करणार
मस्तच गं अनन्न्या.नक्की करणार.
वाह मस्तच गं, मीही करुन पाहते
वाह मस्तच गं, मीही करुन पाहते.
अरेवा..
हा छान दिसतोय मसाला. मी समाधानचा घेऊन येते भारतातून येताना. आता असा करून पाहिन.
स्वाती
मी केला ता तर अर्धी vaticha
मी केला ता तर अर्धी vaticha करुन बघेन.
मस्तच, यात पुदिना घातल्यावर
मस्तच, यात पुदिना घातल्यावर छान चव लागेल, पुदिना वाळलेला असला तरी चालतो
झकास पाकृ.
झकास पाकृ.
यातलं पादेलोण म्हणजे काळं मीठ पण शेंदेलोण म्हणजे नेमकं काय? मला आधी दोन्ही एकच वाटायचं. कारण शेंदेलोण हा शब्द सैंधव वरुन आलाय.
शेंदेलोण म्हणजे सैंधव: पांढरे मीठ
हे उत्तम प्रतीच औषधी मीठ असत. ते पाचक, त्रिदोषनाशक व आरोग्यकारक असत. जर इतर मीठ वर्ज्य केले असेल तर सैंधव खायला हरकत नाही. ( आंतरजालावरून साभार.)
धन्यवाद.
हे ही खनिज मीठच ना?
हो हो
खनिज मीठच!
ओके.
ओके.
मस्तच
लगेच करून बघते आता...
लगेच करून बघते.
लगेच करून बघते.
बेस्ट!
बेस्ट!
आमचे बुवा कुठे गेले? ताकाचं भांडं द्या ओ बुवा.
मस्त !
मस्त !
मस्त. यावेळी भारतातुन आणला
मस्त. यावेळी भारतातुन आणला आहे, तो संपला की या पद्धती ने करेन.
मला खरे तर प्लेन ताकच आवडते.
मला खरे तर प्लेन ताकच आवडते. ते सुद्धा घरी मी स्वता बनवलेले.
पण घरच्यांना मसाला ताक आवडते, बाहेरचे घेण्यापेक्षा त्यांना हा घरच्याघरी बनवायला हा फॉर्मुला सांगायला हवा.
व्वा...मस्स्स्त!
व्वा...मस्स्स्त!
अरे वा! असाही मसाला घरी करता
अरे वा! असाही मसाला घरी करता येतो हे समजले. ग्रेटच!
Wah! Sugaran taaincha ajun ek
Wah! Sugaran taaincha ajun ek chavishta dhaga
झकास.
झकास.
हात्तेचा!
एवढेच मसाले असतात काय त्यात! कृती छान सुटसुटीत!
केला मसाला ! मस्त झालाय !!!!
केला मसाला ! मस्त झालाय !!!!
धन्यवाद गं :)
धन्यवाद!
लगेच करून पाहिल्याबद्दल!
वाह!
वाह!
मी स्वतः हा मसाला करून पाहीला
मी स्वतः हा मसाला करून पाहीला,अप्रतिम झालाय,ओवा कमी वेळात परतावा लागतो हे नंतर लक्षात आले. सौ. कुठलाही मदत घेतली नाही . बाजारातील किंमती पेक्षा 1/5 किंमत पडते .
अरे वा!
हे छान झाले, सौ.खूश आणि स्वत: केल्याचा आनंद काही औरच!
करून पाहिल्या जाईल!
करून पाहिल्या जाईल!
(ताक आणि भांडेप्रेमी) बॅटमॅन.
मस्तं मसाला. करून पाहीन.
मस्तं मसाला. करून पाहीन.
त्याच दिवशी केला.रोज वापरते
त्याच दिवशी केला.रोज वापरते आहे.धन्स गं.पोरगं ताक प्यायला लागलं! मसाला घालुन टेस्टी लागतं म्हणतोय :)
अनन्न्या छान आहे पाकृ
अनन्न्या छान आहे पाकृ मसाल्याची, मी नक्की बनवणार :)
पोरगं ताक प्यायला लागलं... हे झकास झालं.
मसाल्याची पाकृ. दिल्याचं सार्थक झालं, मुलांचे फार नखरे असतात. पण एकदा चव आवडली की मग प्रश्न नाही.
सर्वांचे आभार. यावेळी लगेच करून पाहणारेही असल्याने खरच खूप आनंद झालाय!
काल केला ताकाचा
काल केला ताकाचा मसाला १-१ वाटीचाच केला
खूप छान झालाय आणि अगदी १०-१५ मिनिटात बनवला
उनाळा लई व्हाडलाय !!
उनाळा लई व्हाडलाय !!
म्हणूनशान हा धागा वर काडला बघा.
आता बिगी बिगी ताक करा बघू.