Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काल दुपारी....

ज — जव्हेरगंज, Sat, 10/31/2015 - 15:38
काल दुपारी मी जेव्हा झाडाखाली बसलो होतो एक शेंबड पोर गाढवाच्या शेपटाला डबडं बांधुन खेळत होतं बिचारं गाढव कान हलवत नुसतचं ऊभं होतं शेंबड पोर चड्डी वर खेचत डबड्याला काठीनं बडवत होतं मी गाढवाकड बघत होतो, गाढव खाली बघत होतं आणि ते शेबडं पोर डबड्याकड बघत होतं कंटाळुन शेंबड्यानं डबड्यात पाणी वतलं काठीच्या दोन धपक्यात डबडं एकाकी तुटलं मग ते शेंबड पोर शेपटालाच बडवत बसलं गाढव पण हळुहळु पुढे सरकत चाललं जेव्हा एक फटका गाढवाच्या जिव्हारी बसला तसा त्याचा एक पाय शेंबड्याच्या कपाळी गेला शेंबड्याला दोन टाके पडले म्हणे...

प्रतिक्रिया द्या
1466 वाचन

💬 प्रतिसाद (2)
च
चांदणे संदीप Sun, 11/01/2015 - 08:32 नवीन
मस्तच कविता! मस्त हसलो! अशी कविता बरेच दिवस वाचनात नव्हती आली. तसे मिपावर अद्धून मद्धून साखरे ऐवजी गूळ घातलेले धागे येतच असतात त्यांनाच गोड मानून हसावे लागते! Sandy
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sun, 11/01/2015 - 08:49 नवीन
ख्या ख्या ख्या. सुरवातच मस्त केलित. हलक फूलक. दुपारी दुकानात बसून हसायला मज्जा आली. पुलेशु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा