Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मूर्ती तुम्हीपण

भ
भंकस बाबा
Sat, 10/31/2015 - 22:08
🗣 135 प्रतिसाद
खरोखर आता तर वाटायला लागले आहे की अल्पसंख्यकावर खुपच अत्याचार होउ लागले आहेत. अगदी मोदी त्या आबु बाकर नामक क्रुरकरम्याचा भारतीय अवतार आहेत की काय अशी शंका आमच्या छोट्याशा भेजात घुसु लागली आहे. निमित्त आहे नारायण मुर्तिनी केलेले भाष्य. मूर्ति साहेब एकतर तुम्ही मालवणी , भेंडीबाजार, बेहरामपाड़ा, अशा वस्तीत राहात नाहीँ. सहिष्णुता ही फ़क्त हिन्दुनि दाखवायची वस्तु आहे ऎसे वाटते का तुम्हाला? किलोच्या मापाला २५ ग्राम कमी पडली की तुम्ही ग्राहक कोर्टात खेचनार का हिंदुत्ववादी संघटनाना ? साहेब या एरियात येऊन बघा एकदा . अज़ान चा टायमाला युद्धात जसे भोंगे वाजतात तसे हे बोम्बलत असतात. बकरी ईद ला नदया वहाव्यात ऐसे रक्ताचे पाट रस्त्याने वाहत असतात. झोपड़पट्टित चार माळ्याचि इमारत बांधून त्याच्या बाजूला एखाधी मशिद बांधली की पूर्ण वस्ति untouchable होते. अर्जुनाला बघायला महाभारतात जायला नको , इथेच जमिनित भोंके पाडून महापालिकेच्या पाइपातुन अवैध पाणीपुरवठा घेतला जातो. कारण मशीदित वजू साठि चोवीस तास पाणी लागते ना? आमच्या मुस्लिम बन्धुचि कुरानावर अपरम्पार श्रद्धा असते. त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार ही त्यांच्यात खाजगी बाब असते. एखाद्या स्त्रिला न्याय मिळत असेल तर कायदे बदलले जातात. लवकरच सर्व जग इस्लाम स्वीकारणार आहे हयावर मियाभाईची अतोनात श्रद्धा असते. त्यामुळे घटस्फोटासारखे मामले शरीयत नुसार सोडवण्याकडे भर असतो पण चोरीच्या मामल्यात मात्र इंडियन पीनल कोड चालतो. मूर्तिसाहेब याचं धर्मांधानि आज़ाद मैदानावर हैदोस घातला होता. तेव्हा रमझान् चा महीना असल्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई केली नव्हती. पण मावळ प्रांतात मात्र शेतकर्यावर गोळीबार करताना सरकार जराहि कचरले नव्हते ते का? तेंव्हा मात्र तुम्ही विचारवंत समाधि लावुन बसला होतात. मूर्तिसाहेब हां आक्रोश आहे हिंदुत्वाचा ! एका अखलाख साठी इतके तांडव पण हजारो काशमीरी पंडित मेले , लाखो देशोधड़ीला लागले त्यासाठी उवाच् नाही. साहेब दूसरे करतात म्हणून नको तुमच्या मनाला विचारा . मगच योग्य टिप्पणी द्या.
वर्गीकरण
काठ्यकुट

प्रतिक्रिया द्या
21831 वाचन

💬 प्रतिसाद (135)
स
संदीप डांगे Wed, 11/04/2015 - 18:02 नवीन
प्यारेदा... आवडला प्रतिसाद.. +१००००००० काहिंना चिखलात लोळायला आवडतं, काहींना गगनात भरार्‍या घ्याव्याश्या वाटतात. चिखलात लोळणारे म्हणतात, आम्हाला पंख असते तर आम्ही गगनात भरार्‍या मारल्या असत्या. त्या गरुडांना काय कळतं, वैगेरे गप्पा समविचारींसोबत मारतात, झालं. गरुडांना फुरसत नसते, ते भरार्‍या घेतात. उंच उंच. चिखलातले फक्त चिखलात अजून रुतत जातात. जैसी जिसकी सोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 11/05/2015 - 06:26 नवीन
गरुडांना फुरसत नसते, ते भरार्‍या घेतात. उंच उंच. चिखलातले फक्त चिखलात अजून रुतत जातात. जैसी जिसकी सोच.
सहमत आहे. नारायणमूर्ती स्टॅनफर्ड आणि व्हार्टन बिझनेस स्कूलच्या तसेच कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या बोर्डावरही होते. अशा विद्यापीठांमध्ये विद्यार्थी म्हणून शिकता येणे खूपच दूर राहिले ही विद्यापीठे नुसती बाहेरून बघता आली तरी मी स्वतःलाच कृतकृत्य समजेन. अशा विद्यापीठांनी आपल्या बोर्डावर स्थान दिलेल्या व्यक्तीला आपले कर्तुत्व सिध्द करायची गरजच नाही. भले नारायणमूर्तींची काही मते पटत नसली तरी त्यांच्या कर्तुत्वावर टिप्पणी करायची माझी तरी लायकी नाही. इतरांचे माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/05/2015 - 06:48 नवीन
तुम्ही द्विरूक्ती करत आहात अर्धवटराव. केजरीवाल म्हटले की ***** वृत्ती बाय डिफॉल्ट आलीच की.
साहेब, तुमचाच हा प्रतिसाद बघावा. केजरीवाल स्वता सुद्धा प्रचंड हुशार आहे आणि स्वताच्या हिकमती वर मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ठरवले असते तर मूर्तीं सारखी कंपनी काढुन चालवणे काही अवघड गेले नसते. तरी तुम्ही त्यांच्या वर खालच्या पातळीवरच्या कॉमेंट करता आहातच. मुर्तींनी कंपनी काढताना काय रिस्क घेतली होती? नसती चालली कंपनी तर अमेरिकेत नोकरी करायला गेले असते. अश्या रीस्कफ्री आणि स्वताच्या स्वार्थ साधणार्‍या गोष्टींना आपण कीती महत्व द्यायचे? हे काही अजीत डोवल नाहीत, सीमेवर लढणारे जवान नाहीत किंवा इस्त्रो, बार्क मधले शास्त्रज्ञ. ह्या लोकांना अमेरीकेत १०० पट पगार मिळत असताना ते थांबले इथे सरकारी नोकरी करत. पुण्याच्या ससून, मुंबई मधे कुपर,केइअएम, जेजे मधे कीतीतरी सर्जन सरकारी नोकरांचा पगार घेउन अत्यंत अवघड सर्जरी करत आहेत. हीच सर्जरी जर बाहेर केली तर एका सर्जरी मधे त्यांना महीन्याचा पगारा इतकी कमाई मिळेल. ही आणि अशी हजारो लोक कर्तृत्ववान आहेत. मूर्ती यशस्वी आहेत ह्यात शंकाच नाही, पण त्यामुळे आरत्या ओवाळायचे काहीच कारण नाही. उलट स्वताला डावे म्हणणारे मूर्ती प्रायव्हेट कंपनी काढतातच कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्यारे१ गुरुवार, 11/05/2015 - 07:05 नवीन
प्रसाद राव, केजरीवाल नसते करु शकले असं नम्रपणे म्हणावंसं वाटतं. तो शाहिद अफरीदी आहे ना. भरपूर गुणवत्ता असून संयम नाही. मोठ्या खेल्या करायची कुवत असूनही बेजबाबदार पणा. मोठ्या खेळया करायला खेळपट्टीवर उभं राहावं लागतं. केजरीभौ असलं लॉन्ग रन वालं नाही करु शकत. बाकी मूर्तिनी आपलं काम केलं आहे. इनिंग संपली आहे. कधीतरी प्रसिद्ध व्हावं नंतर असंही वाटत असेल. टाकला एक खड़ा. चालतंय की. आणि कंपनी सुरु करण्या आधी लेफ्टिस्ट की एक्सट्रेमिस्ट वगैरे नाही विचारत बहुतेक. लेफ्टिस्ट असल्यानं कदाचित बरोबरच्या काम करणारान्ना व्यवस्थित मानधन सोयी मिळायला मदत झाली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 11/05/2015 - 07:06 नवीन
blockquote>मुर्तींनी कंपनी काढताना काय रिस्क घेतली होती? नसती चालली कंपनी तर अमेरिकेत नोकरी करायला गेले असते. कमाल आहे. मला पामराला वाटत होते की स्वतःचा बिझनेस काढायचा म्हणजे रिस्क घ्यावी लागते. मला असेही वाटत होते की बहुतांश वेळा हिर्‍याला पैलू पडताना नक्की कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते हे जगाला समजत नाही पण तो हिरा जगापुढे आला की लोकांना वाटते--अरे हा किती लकी माणूस!! माझे असले गैरसमज दूर केल्याबद्दल आभारी आहे.
अश्या रीस्कफ्री आणि स्वताच्या स्वार्थ साधणार्‍या गोष्टींना आपण कीती महत्व द्यायचे?
लोकशाही आहे. तुम्हाला महत्व द्यायचे नसेल तर नका देऊ.
ही आणि अशी हजारो लोक कर्तृत्ववान आहेत.
आहेतच ना. कोण नाही म्हणत आहे.पण इतर लोक कर्तुत्ववान आहेत म्हणून नारायणमूर्तींच्या कर्तुत्वाविषयी ऑ वाटू नये असे थोडीच आहे?
मूर्ती यशस्वी आहेत ह्यात शंकाच नाही, पण त्यामुळे आरत्या ओवाळायचे काहीच कारण नाही.
मी जे काही लिहित आहे त्याला आरत्या ओवाळणे म्हणायचे असेल तर तसे खुशाल म्हणा.
स्वताला डावे म्हणणारे मूर्ती प्रायव्हेट कंपनी काढतातच कसे?
हा आक्षेप माझाही आहे. पण म्हणून त्यांचे कर्तुत्व खुजे कसे काय ठरते? कोणाला माहित काही लोक नारायणमूर्ती डावे असणे आणि प्रायव्हेट कंपनी काढणे याला डाव्या विचारांचा पराभव असेही समजत असतीलच. ते जे काही आहे ते आहे. नारायणमूर्तींची काही मते पटत नाहीत, ते डावे आहेत आणि डाव्यांचे नाव ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते वगैरे वगैरे सगळे मान्य. पण तरीही त्यांनी खूप काही केले आहे. ते मिसळपाववर टाईमपास करत राहिले नाहीत तर एक मोठी कंपनी उभारली आणि आज दीड-दोन लाख घरे त्यामुळे चालत आहेत. तुम्ही काहीही म्हणा पण मला तरी हे अफाट कर्तुत्वच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्यारे१ गुरुवार, 11/05/2015 - 07:10 नवीन
दीड दोन लाख घरं थेट. त्या दीड दोन लाख लोकांनी घेतलेली घरं आजूबाजूला निर्माण झालेल्या इतर सुविधा याचा विचार करता ही संख्या कोटीच्या (लोकांची संख्या घरं नव्हे) घरात जाऊ शकेल असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/05/2015 - 07:18 नवीन
अहो मालक, इंफोसिस नी नस्त्या नोकर्‍या तयार केल्या तर दुसर्‍या कंपनी ने केल्या असत्या. हे म्हणजे मारुती ने गाड्या नाही तयार केल्या तर भारतात कार चा दुष्काळच पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
संदीप डांगे गुरुवार, 11/05/2015 - 07:25 नवीन
असे आहे प्रसादजी की जर मूर्थींनी भाजपसरकारसमर्थनार्थ वक्तव्य केले असते तर आता त्यांच्या लंगोटाला हात घालू पाहणारे त्यांच्या आरत्या ओवाळता थकले नसते. तुम्ही वर ज्या गोष्टी निगेटीवली मांडत आहात त्याच पॉझिटीवली मांडून "एवढा मोठा माणूस आहे तो बोलेल ते चुकीचं कसं असेल" हा स्टँड घेतला असता. "असहिष्णुतेचं वातावरण नाही" असा स्टँड घेणार्‍यांच्या वस्त्रहरणाला वा लायकी काढायला आता कुणालाच वेळ नाही. त्यांची वक्तव्ये कशी चापलूसीची असू शकतात हे कुणीच रंगवून रंगवून सांगणार नाही. कमल हसन पासून सगळेच आता दिग्गज आणि माननीय आहेत कारण ते सरकार समर्थनार्थ बोलतायत. आता ते कितीही साधारण असले तरी ते श्रेष्ठच असणार. जर शाहरूख सारखे कमल हसननेही वक्तव्य केले असते तर कमल हसन कसा टीनपाट अभिनेता, काँग्रेसचा चापलूस आहे ह्यावरही निबंध लिहिले गेले असते. ही एक विशिष्ट प्रवृत्ती आहे. ज्याच्यावर टिका केली जात आहे त्यां सुर्यांना अशा थुंकणार्‍यामुळे फरक पडत नाही. थुंकणार्‍यांनीच दिशा बदलणे उत्तम. बाकी जैसी जिसकी सोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 11/05/2015 - 07:30 नवीन
अहो, मला मूर्तींबद्दल काही राग वगैरे नाही, ते यशस्वी आहेत हे ही मान्य आहे. मी त्या बद्दल काही लिहायला पण गेलो नसतो. पण उगाचच त्यांच्या कर्तृत्वाचा ऊदो ऊदो चालू झाला म्हणुन हे लिहीले. तुम्ही म्हणता तसे इथे कोणीही भाजप नी पप्पु यादवला बरोबर घेतल्या मुळे मी भाजपला मत देणार नाही असे म्हणत नाहीये. असाच विचार सुजाण मतदार करत असतील तर लालू प्रसाद ला वाईट म्हणुन हिणवण्यात काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/05/2015 - 07:39 नवीन
कर्तुत्वाचा उदोउदो करु नये, कि मूर्तींना कर्तुत्ववान समजु नये, कि मूर्तींचं कर्तुत्व उदोउदो करण्याच्या लायकीचं समजू नये ? आणि लालूंबद्दल म्हणाल तर त्यांचही कर्तुत्व कुणी नाकारत नाहि आहे. एरव्ही "कौन जात ?" या प्रश्नानेच सुरु होणारा बिहारी समाज व्यवहार लालूंमुळे बराच सुधारला. "कौन जात" प्रश्नाने खाली जाणारी मान लालूंमुळे ताठ झाली. प्रॉब्लेम सुरु झाला जेंव्हा अग्नीबाण स्वत:ला उपग्रह समजुन सत्तेभोवती फेर्‍या मारण्याचा अट्टहास करु लागला. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/05/2015 - 16:26 नवीन
+९९९९९९९९९९९९..... इथे काही जणांनी मूर्तींची लायकी काढलेली पाहून का कोणास ठाऊक पण "पुणेकर की मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या लेखातील महापालिकेतील उंदीर मारण्याच्या विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍याची आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विकास Wed, 11/04/2015 - 22:33 नवीन
एकंदरीत ते स्वतःला कायम लेफ्ट टू द सेंटर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. त्याचे मूळ या लेखात काही अंशाने तरी पहाता येईल...
... "My father was a staunch Nehruvian and I was strongly leftist," says Murthy. "At the dining table, he would talk optimistically about the progress the country was making under Nehru. The quality of politicians and bureaucrats was very high. The IITs and Institute of Medical Science were being built. We were all anti-US and pro-USSR because Russia had built a steel plant in India, while America had refused to help." ...Still, Murthy held on to his leftist ideology till fairly late in life and it played a part in the decision to return to India after his France project in 1975, though there were ample opportunities in Europe for people with his skills...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
राही Tue, 11/03/2015 - 10:17 नवीन
मूर्तींनी फक्त आपल्या क्षेत्रापुरते बोलावे. चित्रकारांनी फक्त " " " " " लेखकांनी " " " चित्रपटकारांनी " " " अभिनेत्यांनी " " " वैज्ञानिकांनी " " " राष्ट्रपतींनी " " " उद्योजकांनी " " " मूडीने " " " नेत्यांनी " " " " " " राजकारण्यांनी " " पक्षापुरते " " " " विचारवंतांनी तर बोलूच नये. सामान्य माणसांनीही तेच. विरोधी नेत्यांनीही तेच. मग आता बोलावे कोणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्यारे१ Tue, 11/03/2015 - 10:27 नवीन
तुम्ही टाकलेल्या अवतरण चिन्हांबद्दल तुमचा निषेध. बाकी मागे आणीबाणी सॉरी अनुशासन पर्वाबद्दल एक खरड टाकली होती त्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 11/03/2015 - 13:20 नवीन
अवतरण चिह्नांचा निषेध का बुवा? तेच शब्द पुन्हा पुन्हा लिहायला लागू नयेत म्हणून 'डिट्टो' या अर्थाने टाकली होती ती चिह्ने. अनुशासनपर्व या शब्दावरून निषेधपर्व असा एक शब्द सुचतोय. जो तो निषेधच करतोय. मुळात निषेध, मग या निषेधाचा निषेध, आता तर चिह्नांचाही निषेध. निषेधच निषेध. बिचार्‍या चिह्नांना वेठीस धरल्याबद्दल आणखी एक निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 11/04/2015 - 09:24 नवीन
कसला तरी निषेध करावा लागतोच ओ. तुमच्या प्रतिसादाचा निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/03/2015 - 10:45 नवीन
मूर्तींनी (किंवा अन्य कोणीही) त्यांना पाहिजे असेल त्या क्षेत्रात बोलावे. पण त्यांचे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रातील त्यांच्या बोलण्याला त्यांच्या क्षेत्रातील विधानाला मिळेल तितकेच महत्व मिळेल अशी अपेक्षा करू नये आणि इतर क्षेत्रांमधले त्यांचे (किंवा कोणाचेही) विधान अंतिम शब्द म्हणून गणला जाणार नाही एवढे साधे म्हणणे आहे. एकूणच काय की एवढ्या साध्या म्हणण्याचा विपर्यास करून "मूर्तींनी बोलूच नये" असे मला म्हणायचे आहे असा अर्थ काढण्यामागचे प्रयोजन कळले नाही. असे करणार्‍यांना (विशेषतः तिकडे) विचारवंत वगैरे म्हटले जात असेलही. इकडे तसे काही होणार नाही अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अनुप ढेरे Tue, 11/03/2015 - 11:40 नवीन
एकूणच काय की एवढ्या साध्या म्हणण्याचा विपर्यास करून "मूर्तींनी बोलूच नये" असे मला म्हणायचे आहे असा अर्थ काढण्यामागचे प्रयोजन कळले नाही.
हेच बोल्तो. मूर्तींना विरोध केला/त्यांच्या विधानांशी असहमती दर्शवली की त्यांना बोलू दिलं जात नाही हा निष्कर्ष कसा निघतो? कलाकार/उद्योजक राजकारणात आल्यावर त्यांना कलाकाराचाच मान मिळावा ही अपेक्षा अवाजवी आहे. उघड राजकीय भूमिका घेतल्यावर राजकारणाचे नियम लागू होणारच. तुमच्या लॉयल्टीची चर्चा होणारच. अवांतरः जो उठतो तो मोदींना हुकूमशहापासून हिटलर पर्यंत काहीही म्हणतो. जिथे दिसेल तिथे सरकार आणि मोदींना श्या घालतात तरी देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात अशी ओरड कशी होते देव जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बॅटमॅन Tue, 11/03/2015 - 11:54 नवीन
जो उठतो तो मोदींना हुकूमशहापासून हिटलर पर्यंत काहीही म्हणतो. जिथे दिसेल तिथे सरकार आणि मोदींना श्या घालतात तरी देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात अशी ओरड कशी होते देव जाणे!
अतिप्रचंड सहमत!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
वॉल्टर व्हाईट गुरुवार, 11/05/2015 - 00:12 नवीन
प्रतिसादाच्या मर्माशी जरी सहमत असलो तरी "अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येतेय" अशी टिका आहे, व्हेअर एज "हवे ते लिहिता न येणे" हे "अभिव्यक्तिस्वातंत्र्य नसण्याचे" उदाहरण आहे असा आक्षेप टेक्निकली घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/03/2015 - 12:21 नवीन
जो उठतो तो मोदींना हुकूमशहापासून हिटलर पर्यंत काहीही म्हणतो. जिथे दिसेल तिथे सरकार आणि मोदींना श्या घालतात तरी देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात अशी ओरड कशी होते देव जाणे!
मग काय. दिवसरात्र विविध चॅनेलवर व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असल्याचे चर्वितवर्चण चालू असते. तो अरणब गोस्वामी बोंबा मारत असतो.विविध लोक व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे असे लेख लिहित आहेत. समजा खरोखरच व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असते तर असे लेख लिहिता आले असते का, अशा बोंबा मारता आल्या असत्या का एवढा साधा प्रश्न कसा पडत नाही यांना हेच समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
विनोद१८ Tue, 11/03/2015 - 13:40 नवीन
'व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात असणे व व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होणे' हे वाक्प्रचार घेउन आज जे बोंबलतायत ते आणिबाणीत काय करत होते ?? तेव्हा हे कावळे काव-काव करणेच् विसरले हेते, आता निदान खोटी कावकाव तरी करता येतेय. मुळात ह्या सगळ्यांचे सरकारपुरस्क्रुत 'दाणापाणी' मिळणे बंद झाले, त्याचा राग ते काढताहेत. हे करण्यामागचे यांचे खरे हेतू वेगळेच असावेत अशीच शंका येते, अगदी ठरवून केलेला देशहित्शुन्य अपशकूनी उध्योग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ज
जातवेद Tue, 11/03/2015 - 10:46 नवीन
किंबहुना कोणी बोलल्यावर त्याची कुंडली न काढता त्यांना गंभिरपणे घेतले जाईल असे विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/03/2015 - 10:52 नवीन
किंबहुना कोणी बोलल्यावर त्याची कुंडली न काढता त्यांना गंभिरपणे घेतले जाईल असे विचारा.
एकूणच पुरस्कार परत करणार्‍या अशोक वाजपेयींचा आणि इतर काहींचा ढोंगीपणा उघडकीला आणलेला बराच लागलेला दिसतोय. असो. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
ज
जातवेद Tue, 11/03/2015 - 11:09 नवीन
अहो काय लागायचे त्यात. ढोंगी ते ढोंगी. बाकी प्रश्नाचे उत्तर नाहि दिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Tue, 11/03/2015 - 16:05 नवीन
मूर्तींनी फक्त आपल्या क्षेत्रापुरते बोलावे. चित्रकारांनी फक्त " " " " " लेखकांनी " " " चित्रपटकारांनी " " " अभिनेत्यांनी " " " वैज्ञानिकांनी " " " राष्ट्रपतींनी " " " उद्योजकांनी " " " मूडीने " " " नेत्यांनी " " " " " " राजकारण्यांनी " " पक्षापुरते " " " " विचारवंतांनी तर बोलूच नये. सामान्य माणसांनीही तेच. विरोधी नेत्यांनीही तेच. मग आता बोलावे कोणी?
कोणीही कोणाला बोलायला, स्वत:चे मत प्रकट करण्याला, सरकारचा किंवा कोणाचाही निषेध करायला, सरकारवर किंवा इतर कोणावरही टीका करायला घोषित अथवा अघोषित अशी कोणतीही बंदी नाही. असल्यास उदाहरणे द्या. हे तथाकथित रोज सरकार व मोदींवर यथेच्छ टीका करीत आहेत, मोदींच्या राजवटीत न घडलेल्या घटनांचे पाप त्यांच्या माथी मारत आहेत, संभाविताचा आव आणून साळसूदपणे पुरस्कार परत करण्यासारखी नौटंकी करीत आहेत, विविध वाहिन्यांवर रोज चर्चासत्रे घडत आहेत, वर्तमानपत्रात रकाने भरून यांचे लेख आहेत, कोणताही पुरावा मिळालेला नसताना हे फक्त मोदी सरकारलाच दोषी ठरवित आहेत, कोणाचीही मुस्कटदाबी झालेली नाही, देशात असहिष्णुतेचे अजिबात वातावरण नाही .... असे असताना तुम्हाला वरील प्रश्न का पडावा? मी आधीच्या प्रतिसादातच लिहिले आहे की मूर्ती किंवा राष्ट्रपतींना आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे व ते तो अधिकार व्यवस्थित वापरत आहेत. परंतु त्यांच्यावर टीका करण्याचा व त्यांच्या मतावर आपले मतप्रदर्शन करण्याचा इतरांना अधिकार आहेच ना. मूर्तींनी राजकीय विधाने सुरू केली तर त्याला प्रत्युत्तर येणारच. त्यात एवढे चिडण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/03/2015 - 16:29 नवीन
मूर्तींनी राजकीय विधाने सुरू केली तर त्याला प्रत्युत्तर येणारच. त्यात एवढे चिडण्यासारखे काय आहे?
हो ना. विचारकलहाला का भिता असे आगरकरच १८९१ साली बोलून गेले आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भंकस बाबा Wed, 11/04/2015 - 18:43 नवीन
काही दिवसांपूर्वी आपल्या भारतातून इराकला इसीस मधे सामिल झालेला एक तरुण परत आला. तेव्हा या तथाकथित विचारवंतांनी नाही आवाज़ उठवला की याला फाशी द्या . तो काय तिकडे सत्यनारायणाची पूजा घालायला गेला होता? त्याच्या गुन्हाची तपासणी होणार मग निकाल लागणार तोपर्यंत इसिसची विल्हेवाट लागून त्याबदल्यात दहाबारा अजुन दहशतवादी संघटना निर्माण झाल्या असतील. जैसे लश्कर ए तोयबा जाऊन जमात उल दावा आली. वाघ म्हटले तरी खाणार वाघोबा म्हटले तरी खानारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
A
amit_m Mon, 11/02/2015 - 12:31 नवीन
योग्य मुद्दा..
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 11/03/2015 - 04:44 नवीन
घ्या आता शाहरुख़ पण आला. त्यात काही आश्चर्यजनक नाही. कारण चित्रपटसृष्टीत अंडरवर्ल्ड चा पैसा येतो हे काही गुपित नाही. आणि सध्या अंडरवर्ल्ड दाऊद चालवतो यात पण काही नविन नाही. खाल्ल्या मिठाला जागल पाहिजे की नाही?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/03/2015 - 09:28 नवीन
शाहरूखला अचानक कंठ का फुटला त्यामागचे कारण खालील बातमीत आहे. http://www.dnaindia.com/money/report-shah-rukh-khan-gets-third-summons-from-ed-2138946
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
श
श्रीगुरुजी Wed, 11/04/2015 - 19:01 नवीन
शाहरूखच्या या अचानक कंठ फुटण्याने मूर्तींशी संबंधित एक जुनी अशीच गोष्ट आठवली. शाहरूखला २८ ऑक्टोबरला ईडीची नोटिस जाणे आणि त्याला लगेचच १ नोव्हेंबरला कंठ फुटणे हा योगायोग नाही. पूर्वी २००१-०५ या दरम्यान मूर्ती आयआयएम (अहमदाबाद) चे संचालक होते. भारतातील बर्‍याच आयआयएम संस्थांनी बर्‍याच वर्षात आपले वार्षिक ताळेबंद सरकारला सादर केले नव्हते. वाजपेयी सरकारने आयआयएम ची वार्षिक फी दीड लाख रू. वरून तीस हजार रू. इतकी कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मूर्तींनी विरोध केला होता. या संस्थांना आर्थिकदृष्ट्या आपल्यावर अवलंबून ठेवण्यासाठी फी कमी केली जात आहे व सरकारला त्याद्वारे या संस्थांवर नियंत्रण ठेवायचे आहे असा त्यांचा आरोप होता. "सरकार आमच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहे" असाही आरोप मूर्तींनी केला होता. याविरूद्ध ते न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले होते. याविषयी खालील बातमी वाचा. http://www.telegraphindia.com/1040217/asp/frontpage/story_2904623.asp
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 11/05/2015 - 06:17 नवीन
पूर्वी २००१-०५ या दरम्यान मूर्ती आयआयएम (अहमदाबाद) चे संचालक होते. भारतातील बर्‍याच आयआयएम संस्थांनी बर्‍याच वर्षात आपले वार्षिक ताळेबंद सरकारला सादर केले नव्हते.
इतर आय.आय.एम चे माहित नाही पण आय.आय.एम अहमदाबादचे सर्व वार्षिक रिपोर्ट आणि ताळेबंद सादर झाले होते.१९६२ च्या पहिल्या वार्षिक रिपोर्टपासून सगळे रिपोर्ट इथे बघता येतील.
वाजपेयी सरकारने आयआयएम ची वार्षिक फी दीड लाख रू. वरून तीस हजार रू. इतकी कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मूर्तींनी विरोध केला होता. या संस्थांना आर्थिकदृष्ट्या आपल्यावर अवलंबून ठेवण्यासाठी फी कमी केली जात आहे व सरकारला त्याद्वारे या संस्थांवर नियंत्रण ठेवायचे आहे असा त्यांचा आरोप होता. "सरकार आमच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहे" असाही आरोप मूर्तींनी केला होता.
२००८ मध्ये सर्व आय.आय.एम ने आपली फी वाढवली होती. २००७-०९ च्या बॅचला ४ लाख फी होती ती २००८-१० च्या बॅचला ११.५ लाख झाली. नारायणमूर्तींनंतर विजयपत सिंघानिया हे बोर्ड ऑफ गव्हर्नरचे संचालक होते.त्यांनी पुढील शब्दात या फीवाढीचे समर्थन केले --- "The IIMs should not be financially supported by anyone. Recently, IIT Bombay had to ask the government for funds, which was a shameful state of affairs. I do not want this to happen to IIM-A. IIMs should not be dependent on outside resources. IIM-A is capable of standing on its own feet. I am not supporting profiteering in educational institutes. But creating surplus is important. The government (HRD Ministry) needs to give more autonomy to such institutes that create a great tomorrow. If the government interferes in the institute's affairs, the basic foundation of the institute will be shaken." तेव्हा त्याच कारणावरून नारायणमूर्तींनी फी कमी करायला विरोध केला असायची शक्यता आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/05/2015 - 16:39 नवीन
मी दिलेल्या वृत्तातील पहिलेच वाक्य असे आहे. The Supreme Court today said the Indian institutes of management cannot be only for the “elite”, asking for documents on their fee structure and the balance sheets of the last 10 years. काही आयआयएम्सनी अनेक वर्षात आपले वार्षिक ताळेबंद सादर न केल्याचे त्यावेळी वाचले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारने त्यांना सर्व प्रलंबित ताळेबंद देण्यास सांगितले आणि तिथेच पहिली ठिणगी पडली. २०१४-१५ मध्ये एनजीओंना प्रलंबित ताळेबंद देण्यास सांगितल्यावर "असहिष्णुता", "असहिष्णुता" असा गटाणा करून काही मंडळी कशी नाटके करीत आहेत ते आपण पहात आहोतच. साधारणपणे तसेच त्यावेळी झाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अर्धवटराव Tue, 11/03/2015 - 08:01 नवीन
मोदि साहेबांविरुद्ध दशकभर राळ उडवुन त्यांना सतत प्रकाशझोतात ठेवलं त्यांच्या विरोधकांनी. क्लायमेक्स आला आणि या सगळ्या विरोधाची हवा काढुन विकास नावाचं गाजर दाखवत मोदिंनी सत्ता मिळवली. तिच चुक विरोधक परत करताहेत. मोदिंविरुद्ध हजार कांड्या पिकवतील हे पब्लीक. त्यातल्या टोप टेन गोष्टी खोट्या आहेत असं मोदि सहज सिद्ध करतील (किंवा आपल्या मिडीया सेल मार्फत तसं भासवतील) सोबत असेल त्यांची औद्योगीक क्षेत्रातली पाठीराखी फौज जे आर्थीक क्षेत्रा अच्छे दिन आले म्हणुन वातावरण निर्माण करतील. तोपर्यंत केजरीवाल, नितीशबाबु,वगैरेंनी भ्रमाचे भोपळे फोडले असतील (राहुलबाबांच्या बाबतीत आता फार काहि बोलण्यासारखं राहिलं नाहि). शरद पवारांची छानशी सोय झाली असेल... कदाचीत सुप्रीयाताईंची पण. आणि अच्छे दिन पार्ट-२ सुरु होईल. येकदम टकाटक.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Tue, 11/03/2015 - 11:27 नवीन
आजपर्यंत हिंदूंनी धर्मनिरपेक्षता पाळली म्हणू हा देश धर्मनिरपेक्ष राहिला आहे . मुळात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ? धर्मनिरपेक्षतेच्या कसोट्या मुस्लिमांना लावल्या तर मुस्लिम कधीही धर्मनिरपेक्ष ठरत नाहीत .जगात कुठलंही मुस्लिम बहुल राष्ट्र धर्मनिरपेक्ष नाहीये . धर्मनिरपेक्षतेचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाहीये . जगात फक्त भारतातच सगळ्यात जास्त लाड अल्पसंख्यांकांचे होतात .तरीही त्यांच्यावर अन्याय होतो म्हणू बोंबा मारतात .त्या मूर्तींना म्हणावं भारता शेजारच्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये हिंदुंवर काय अत्याचार होतात ते बघा जरा. आपलाच धर्म संपवायला निघालेले मुर्तींसारखे मूर्ख हिंदू जगात दुसर्या धर्मात सापडायचे नाहीत .
विचारवंतांनी तर बोलूच नये.
विचारवंत म्हणजे नक्की कोण ? काहीही पिंका टाकून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीच प्रदर्शन करणार्यांना हल्ली विचारवंत म्हणतात .
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 11/03/2015 - 11:42 नवीन
तुडतुडी.. आपल्या वाक्य वाक्य शी सहमत. अश्या या मूर्ख आणि बेअक्कल लोकांनी त्यांचे असहिष्णुतेचे धडे हिंदूंना शिकवू नयेत, एवढाच जर पुळका आला असेल तर खुशाल दाढ्या वाढवा,.. आणि गल्लो गल्ली दिवसातून ५ वेळा सुगम संगीताचा आस्वाद घ्या. पण आमच्या भारतात नको. भरपूर पर्याय आहेत. जा तिकडेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
य
याॅर्कर Tue, 11/03/2015 - 11:45 नवीन
हिंदूधर्मरक्षक ,अखंड हिंदू धर्माच्या एकमेव कैवारी,हिंदूस्थान हिंदू . . कु/सौ .तुडतुडी ताई आल्या आहेत हो................. .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
य
याॅर्कर Tue, 11/03/2015 - 11:48 नवीन
या इकडे तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
भ
भंकस बाबा Tue, 11/03/2015 - 12:15 नवीन
तीनेक वर्षापुर्वी फेसबुकवर कोणी मोहमंद पैगबराविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. तीन मिनिटांत ती पोस्ट उड़वाली गेली पण संधिसाधुना खबर लागली. मी माझ्या मुलासह (वय वर्षे 3)दुचाकिवरून घरी परतत् होतो. अचानक अल्लाह हो अकबर ही आरोळी व् त्या आरोळीच्या दिशेने एक भला मोठा दगड आला. तो माझ्यासाठी नव्हता पण माझ्या डोक्यावरून पलीकडे गेला. जिव मुठित घेऊन मी पळालो. घरी येऊन मी माझ्या बाजूच्या मियाभाई ला विचारले . त्याचे उत्तर त्याच्याच शब्दात लिहित आहे." वो मज्दीद की दीवार पर किसीने नबी के बारे में गलत लिख दिया था. मौलवी ने वो मिटा दिया पर हम उस कुत्ते को छोड़ेंगे नहीं" ही मानसिकता असलेल्या लोकाकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? पण हे पण तितकेच खरे की जेव्हा त्याला कळले की मी बचावलो तर त्याचा चेहरा अपराधी झाला होता .तो स्वतः तिथे नव्हता पण अफवा कशी पसरते व् तिला धार्मिक रंग दिला की कशी आग घेते याचा हां उत्तम नमूना
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 11/03/2015 - 12:34 नवीन
दादुस फुजी यांची आठवण झाली :( कुठे गेले ते हुतात्मे :(( या धाग्यावर त्यांची लेखणी नाचली असती.
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Tue, 11/03/2015 - 12:41 नवीन
अरेरे, काय दिवस आले. प्रतिवादी कमी होत चालल्याची ही लक्षणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
इ
इरसाल Tue, 11/03/2015 - 12:43 नवीन
दादुस मोदींची गाय बनुन दुसर्‍या धाग्यावर सेकंड होमच्या विवंचनेत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
काकासाहेब केंजळे Tue, 11/03/2015 - 13:34 नवीन
नारायण मुर्ती हा व्यवसायिक माणुस आहे, मुस्लिमांचा मुलतत्ववाद त्यांना ठाउक नसेल असे नाही, ज्या देशात पराकोटीचे धार्मिकीकरण वा धृविकरण होते अशा देशात गुंतवणुक करायला जग तयार होत नाही वा तिथे कायम दबावाखाली काम करावे लागते.त्यामूळे असे वातावरण देशाला परवडणारे नाही असेच त्यांना सूचीत करायचे आहे.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Tue, 11/03/2015 - 13:54 नवीन
....बरोबर आहे तुमचे, जे खरे नाही तेच खरे मानुन 'भुई धोपटणे' चालु आहे, देशाबाहेरील गुंतवणूक्दारांमध्ये नकारात्मक संदेश जाण्यासाठी, हे कशासाठी व कोणासाठी ? हाच काळीचा प्रश्ण आहे. केवळ मत्सरी भावनेच्या अधिन जाउन चालले आहे, मला वाटते हे एव्हाना लक्शात आले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
श
श्रीगुरुजी Tue, 11/03/2015 - 15:39 नवीन
काकासाहेब केंजळे आणि नानासाहेब नेफळे!
बरंच साधर्म्य आहे. दोन्ही साहेब 'ळे'कारांती आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
श
श्रीगुरुजी Tue, 11/03/2015 - 15:40 नवीन
चुकलो. नानासाहेबांच्या मागे 'पै.' ही उपाधी लिहायचे विसरलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
होबासराव Tue, 11/03/2015 - 17:20 नवीन
ओ गुरुजी खाली उतनाईच नई, ये देखो ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , काकासाहेब केंजळे - Mon, 02/11/2015 - 15:46 ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , फुलथ्रॉटल जिनियस, हितेश, दादा दरेकर यांचा वावर अतिशय मुद्देसुद आणि नेमका होता, जागोमोहनप्यारे यांचे टायमिंग तर अफलातून असायचे ,कुठे गेली हि सर्व मंडळी????? मिपावर सध्या माइसाहेबांचे प्रतिसाद उत्तम असतात,त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत,त्यांचे पती माझे चांगले मित्र आहेत. माई नि माई मुंडेर पे तेरे...लेकीन यहा तो बहोत सारे कागे है.. तेरा क्या होगा माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 11/04/2015 - 09:45 नवीन
नानांनी मिपावर नवीन अवतार धारण केलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 11/03/2015 - 16:47 नवीन
पुण्यात..्चितळ्यांच्या दुकानात फुल २ गर्दी..तुळशीबाग पाय ठेवायला जागा नाहि..चालत चालत लक्ष्मि रोड वर आलो ...रोड फुललेला..खरेदी ची एकच झुंबड..वातावरण एकदम प्रसन्न..रस्तावर आकाश कंदिल टांगलेले... कुठे हि असहिश्णुतेचे वातावरण नाहि... . राजकिय नेते का मार्च काढत राष्टपतिना दिवाळीचा त्रास देत आहेत ते समजत नाहि...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा